"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*22/09/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22. सप्टेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद कृ.५,पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~कृत्तिका,
योग ~हर्षण, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:34,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

22. *गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

22. *पी हळद हो गोरी –*
  ★ अर्थ ::~ उतावळेपणा दाखविणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

22. *अलसस्य कुतो विद्या ।*
     ⭐अर्थ ::~ आळशी मनुष्याला विद्या कशी मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 22. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २६५ वा (लीप वर्षातील २६६ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●१९९८ : क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च सन्मान जाहीर
●१९९५ : घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्‍च न्यायालयाचा निर्णय
●१९८० : इराकने इराण पादाक्रांत केले.
●१६६० : शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९१५ : अनंत माने – मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक.
◆१९०९ : दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
◆१८८७ : *कर्मवीर भाऊराव पाटील* – शिक्षणतज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण
◆१८६९ : व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी,

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब
●१९९४ : जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार.
●१९७० : शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक
●१९९१ : दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. 
●१५३९ : गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले  गुरू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

22. *✸ 🚩नरसिंहाचा देश ✸*
     ●●●●●००००००●●●●●
हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश॥धृ॥

उसळले रक्त हे पुन्हा अगस्तिऋषिचे
सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्मभीमाचे
रसरसले तेजहि प्रताप गोविंदांचे
श्री शिवरायाचा दुमदुमला आवेश ॥१॥

हे उधाण आले पुनः शक्तिसिंधूला
धगधगल्या ह्रदयी स्वातंत्र्याच्या ज्वाला
प्रत्येक वीर प्रलंयकर रुद्रच गमला
प्रत्येक चढवितो रणवीराचा वेष ॥२॥

नेत्रातुन झडतो प्रलयीचा अंगार
अन् नसानसांतून बिजलीचा संचार
आकाशा चिरते विजयाची ललकार
मृत्युंजय सजले घ्याया रिपुचाघास॥३॥

निज शिरा घेउनी आपुल्याच हातात
आइस्तव लढते धडही संग्रामात
झुंजता रिपुंशी बनुनी झंझावात
मर्दाचा जोवर अखेरचा तो श्वास॥४॥

  सर्पांनो येथे गरुडसैन्य जमलेले
श्वानांनो येथे सिंहसैन्य सजलेले
गवतांनो येथे वणवे हे धगधगले
हे श्येन सुसज्जित करण्या कपोतनाश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *❂ अनंता तुला कोण पाहु ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.

तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसे,
"तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"

फुले सृष्टीची मानसा रंजिती,
घरी सोयरी गुंगविती मती,
सुखे भिन्‍न ही, येथ प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके ?

तुझे विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषू शके ?

नवी भावपुष्पे तुला वाहिली,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू ! कल्पना जल्पना त्या हरो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22.  *❃❝ विद्वान अर्थतज्ज्ञ ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती... तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशयतुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यातजास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..! माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!मुलगा म्हणालाराजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहेमी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातीलसारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातातसोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोरधरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..आणि मी चांदीचे नाणे उचलतो ..त्यामुळे तिथे असलेले सगळेमोठ्याने हसतात ...सार्यांना मजा वाटते .......असे रोज घडतेमुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतोचांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाहीन राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेलाकपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्यानाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला .. मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेलतर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही. मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा..!! काय वाटते ? समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात. मित्रांनो हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22.     *आनंद* शोधू नका
   *आनंद* निर्माण करा कारण *आनंद* निर्मीती वर GST *0%* आहे
      *स्वतःचा शोध स्वतःमध्ये घ्या*
   बाकी सगळ *Google* वर आहे...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *✿ भारतातील पहिले ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ *भारतातील पहिले क्षेपणास्त्र?
   ➜ *(पृथ्वी १९८८)*

■  *भारतातील पहिला उपग्रह?  
   ➜ *आर्यभट्ट (१९७५)*

■  *भारतातील पहिली अणुभट्टी? 
  ➜ *अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*

■  *भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?
    ➜ *दिग्बोई (१९०१)*

■  *भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?
    ➜ *दुल्टी (१८८७)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22. *❒भाऊराव पायगौंडा पाटील❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   *_शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण_*
   ◆यांचा आज जन्म दिवस◆
          त्यानिमित्त त्यांना
      *विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २२ सप्टेंबर १८८७
         कुंभोज, महाराष्ट्र
●मृत्यू :~ ९ मे  १९५९
◆पेशा :~ शिक्षण प्रसार

         *_कर्मवीर भाऊराव पाटील_*
     हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.

      रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी जैन कुटूंबात झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.

       *रयत शिक्षण संस्था*
पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.

    महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार ~22/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment