"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*22/10/24मंगळवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22.ऑक्टोबर::मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.६, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~परिघ, करण ~गर,
सूर्योदय-06:35, सूर्यास्त-18:10
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

22. *स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

22.  *लेकी बोले सुने लागे*
           ★ अर्थ ::~
एकाला उद्देशून पण दुसऱ्याला बोलने
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

22.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
              ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *22. ऑक्टोबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २९५ वा (लीप वर्षातील २९६ वा) दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
●१९९४ : भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
●१९६३ : पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
●१९३८ : चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४७ : दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
●१९४२ : रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार
◆१९००: *अशफाक उल्ला खान –* भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक
●१८७३ : तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९९१ : ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
●१९७८ : नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते
●१९३३ : बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

22.     *■हे राष्ट्र देवतांचे■*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

22. *अमुचे जग गाइल जयगान*
   ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥

अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान॥१॥

ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान॥२॥

ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण॥३॥

स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान्॥४॥

आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

22.     *💠 उपकार 💠*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
    एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
    आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
     आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात. चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो. बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली

          *🌀तात्पर्य ::~*
   "उपकार पण वाघासारख्यावर करावेत उंदरा सारख्यावर नाही कारण असे लोक नेहमी ते विसरण्यात धन्यता मानतात आणि बहादूर लोक ते लक्षात ठेवतात"
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

22. "महत्वकांक्षा" असल्याशिवाय
                माणूस "मेहनत"
             करित नाही आणि
         "मेहनत" केल्याशिवाय
    "महत्वकांक्षा" पुर्ण होत नाही..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====

22. *■ महत्त्वाचे सामान्य माहिती*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
■ 'कमवा व शिका' या संकल्पनेचे जनक कोण ?
  ➜ कर्मवीर भाऊराव पाटील.

■ सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते ?
    ➜ इंग्रजी

■ विद्युत उपकरणात अर्थिंग ( Earthing ) का वापरतात ?
➜विजेचा धक्का लागू नये म्हणून

■ भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे ?
    ➜ ट्राॅम्बे. ( मुंबई )

■  होमिओपॅथीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
    ➜ डाॅ. सॅम्युअल हॅनिमन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

22. *❒ अशफाक उल्ला खान ❒* 
     ━━•●◆●★★●◆●•═━
  ★भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक...
      _यांच्या जयंती त्यानिमित्त_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २२ ऑक्टोबर १९००,
●स्मृतिदिन :~ १९ डिसेंबर १९२७

       ★ अशफ़ाक उल्ला खान ★
    भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि १९ डिसेंबर सन १९२७ ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. त्यांचे उर्दू मध्ये तखल्लुस,(टोपण नाव) हसरत हे होते . उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत .त्यांचे पूर्ण नाव अशफ़ाक उल्ला खान वारसी हसरत असे होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामच्या इतिहासामध्ये बिस्मिल आणि यांची भूमिका अतिशय महत्वाची मानली जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार ~22/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment