"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

22/12/24 रविवारचा परिपाठ

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22. डिसेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.७, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~उत्तराफाल्गुनी,
योग ~आयुष्मान्, करण ~बव,
सूर्योदय-07:07, सूर्यास्त-18:06,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

22. *निसर्ग जितका कोमल तितकाच क्रूर आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22.   गाढवापुढे वाचली गीता,
     कालचा गोंधळ बरा होता
      ★अर्थ :~ मुर्ख माणसाला कितीही समजावुन सांगितले तरी त्याचे मुर्खतेचे आचरण बदलत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *क्षमा रूपं तपस्विनाम् ।*
   ⭐अर्थ ::~ तपस्वी लोकांची क्षमा हीच ओळख असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 22. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय गणित दिन
★ हा या वर्षातील ३५६ वा (लीप वर्षातील३५७ वा) दिवस आहे.
★ सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस
        
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
●१८५१ : जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८८७ : श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.
(मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
◆१६६६ : गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू: ७ आक्टोबर १७०८)

       ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते
●१९९६ : रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार
●१९८९ : सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक
●१९७५ : पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला.
●१९४५ : श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे  लावणीसम्राट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22.  *✸ गाउ त्यांना आरती ✸*
       ●●●●●००००००●●●●●
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाउ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाउ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्‍तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाउ त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाउ त्यांना आरती

देह जावो, देह राहो, नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाउ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाउ त्यांना आरती

नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृति, गा तयांची आरती."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *❂ तू अनश्वरातील अमरेश्वर ❂*
          ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी
मज देशील का तू दर्शन दिव्य प्रकाशी

तू चिरंतनातील ईश्वर असशिल का रे
हे दोन घडीचे वैभव नश्वर सारे
बरसती तुझ्यावर नक्षत्रांच्या राशी

का तुला न यावी करुणा माझी देवा
तू केवळ माझ्या सर्वस्वाचा ठेवा
दे मला आसरा तुझिया चरणापाशी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22.  *❃❝ स्वामी विवेकानंद ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.

    "अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे. आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील."

   तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो याची नाही.

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   "कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
*एका दिवसात यश प्राप्त होत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. मैत्री अशी करा की
      जग आपलं होईल,
      माणूस असे बना की
  माणुसकी नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
   आणि एकमेकांना सहकार्य
         इतके करा की
आपल्या जीवनाचे सार्थक होईल..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  भारतातील सफेद पाणी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
  ➜ सियाचीन.

✪  सध्या ड्रोन टॅक्सी सेवा कोठे सुरू आहे ?
  ➜ दुबई

✪  लक्षव्दीप समूहात किती बेटांवर मानवी रहिवास आहे ?
  ➜ १० बेटांवर.( एकूण ३६ बेट )

✪  संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना ( UNFAO ) कोणत्या शहरात आहे ?
  ➜ रोम.( इटली )

✪  सर्वांत मोठे ह्रदय कोणत्या प्राण्याचे असते ?
  ➜ देवमासा. ( ६० किलो )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22.  *❒ श्रीनिवास रामानुजन ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते.
  *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
    🌹🌷🌺🏵🌺🌷🌹

🔹पूर्ण नाव :~ श्रीनिवास रामानुजन
                         अय्यंगार
*🔸जन्म :~ २२ डिसेंबर १८८७*
    इरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
🔹मृत्यू :~ २६ एप्रिल १९२०,
        मद्रास, ब्रिटिश भारत
🔸कार्यक्षेत्र :~ गणित

            ◆श्रीनिवास रामानुजन◆

    🔶हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

         ◆ जन्म व संशोधन ◆
  🔷 या महान गणितज्ञाचा जन्म
22 डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडू तील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

    🔶रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

    🔷१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी  २६ एप्रिल १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
      *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार ~22/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment