*22/11/24 शुक्रवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22. नोव्हेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.७, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~आश्लेषा,
योग ~ब्रह्म, करण ~बव,
सूर्योदय-06:50, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
22. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *वारा पाहून पाठ फिरवावी –*
★ अर्थ ::~ वातावरण पाहून वागावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
22. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ :: ~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 22. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★आंतरराष्ट्रीय संगीत दिवस
★हा या वर्षातील ३२६ वा (लीप वर्षातील ३२७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
●१९६३ : थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन
●१९५६ : ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९४८ : मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३९ : मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री (मृत्यू-१०/१०/२०२२)
◆१९१३ : डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत
◆१९०९ : द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार
◆१८८० : केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत,
अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते
●२००० : डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक
●१९८० : मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती
●१९५७ : पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
22. *✸आला किनारा आला किनारा*
●●●●००००००●●●●
आला किनारा, आला किनारा
निनादें नभीं नाविकांनो इशारा
उद्दाम दर्यामधे वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा
प्रकाशें दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्या-लाल हिंदोळती
तमाला जणु अग्नीचा ये फुलोरा
जयांनी दलें येथ हाकारली
क्षणासाठी या जीवनें जाळली
सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा
तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी
उभे अंतीच्या संगरा राहुनी
किनार्यास झेंडे जयाचे उभारा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
22. *❂ देशकार्यि विरमु दे ❂*
==••◆◆●★●◆◆••==
अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे
येत शरण तव पदांसि देशकार्यि विरमु दे॥
उमलतिल ह्या कळया हळूहळूंचि पाकळ्या
तत् सुगंध तुजसमान सर्वदूर पसरु दे॥१॥
पुष्पफले नको आम्हासि अर्पु दे तुझ्या पदांसि
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेचि होउ दे॥२॥
आम्हासि तूच ध्येय देव सेवु धरुनि भक्तिभाव
पूजने तुझ्या आम्हास देवरुप होउ दे॥३॥
अससि भव्यदिव्य दीप तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही ह्रदयांतरि उजळु दे॥४॥
करुनिया तुझ्यासमान होउ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतिचे संरक्षणचि होउ दे॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
22. *❃❝ मैत्री दोन वाघाची ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
एका जंगलात दोन वाघ असतात.
दोघेजण अगदी जवळचे मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-कानून समजवून घेतले, एकत्र शिकार केली...
एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होते आणि दोघे वेगळे होतात.
बरीच वर्षे जातात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो तर काही कुत्र्यांनी त्या वाघाच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो...
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?".
वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण बळ येईल"
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू.. जेणेकरून कुत्र्यांना पण बळ येईल."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
22. *वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोका कड़े लक्ष्य देऊ नका...*
*पण ज्यांनी वाईट वेळेची चांगली वेळ आणून दिली,*
*त्यांचे मोल कधी विसरु नका...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
22. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ द्विदल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात ?
➜ सहजीवी
✪ कोणत्या पिकाच्या मुळांवर गाठी असतात ?
➜ हरभरा
✪ एका झाडाच्या अन्नरसावर जगणा-या दुस-या झाडास काय म्हणतात ?
➜ परजीवी.
✪ बहुतेक वनस्पतींना त्यांचे बरेचसे अन्न कशाद्वारे मिळते ?
➜ सूर्यप्रकाशाद्वारे
✪ दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
➜ प्राणवायू. ( ऑक्सिजन )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
22. *❒♦वीरांगणा झलकारी♦❒*
━═•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ २२ नोव्हेंबर १८३०
(भोजला - झांसी)
●वीरमरण :~ ४ एप्रिल १८५८ झांसी
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक स्त्रियांनी पराक्रम गाजविला होता. त्यात झलकारी या तरुणीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ती राणी लक्ष्मीबाईची दासी नव्हे तर सहकारी होती. राणी लक्ष्मीबाईने तयार केलेल्या महिला सेनेची ती प्रमुख होती. आपल्या राणीला वाचविण्यासाठी तिने आपल्या प्राणांचे बलिदान करून झाशीला वेढा देणाऱ्या सर ह्यू रोज ला सुद्धा चकित केले होते.
मूलचंद ने आपल्या लेकीला तिरंदाजी, घोडेस्वारी, शस्त्र संचालन चांगल्या रीतीने शिकविले. ती शरीराने दणकट व धाडसी होती. आकर्षक डोळे, सुंदर चेहरा, भव्य कपाळ यामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसायचे. त्यांनी आपल्या लाडक्या मुलीचे पालन-पोषण मुलासारखेच केले. जंगलात स्वैरपणे हिंडणे, फुले, फळे, सरपण आणणे तिला आवडायचे. शिकार करण्यासाठी ती पटाईत होती.
एके दिवशी झलकारी गाईगुरांना जंगलात चरायला घेऊन गेली होती. अचानक जंगलातून एका चीत्त्याने तिच्यावर झडप घातली. तिने बाजूला होऊन आपल्याला लाठीने चीत्त्याच्या नाकावर जोरात टोला हाणला. त्यासरशी तो चिता बेशुद्ध होऊन पडला. झलकारीने चित्त्याला आपल्या काठीने इतके बदडून काढले की त्या माराने तो मरण पावला. या घटनेने जो तो तिचे कौतुक करू लागला.
एके रात्री गावच्या मुखियाच्या घरावर चोरांनी दरोडा घातला. लोक आरडाओरडा करू लागले. ते ऐकून झलकारी आपली लाठी घेऊन धावून गेली. चोरांच्या पाठीवर जोरजोराने लाठीने रट्टे लगावले. तेव्हा लोकही धावून आले. चोर जीव घेऊन पळून गेले. मुखीयाने तेव्हापासून झलकारीला आपली मुलगीच मानले. तिच्या बहादुरीची चर्चा सर्वत्र होऊ लागली.
राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील तरुण गोलंदाज पूरणचंद याने झलकारीशी लग्न करायचे असे तिच्या वडिलांना सांगितले. तो सुद्धा उमदा व सुंदर तरुण होता. झलकारीच्या आई-वडिलांना तो पसंत पडला. त्याच्याशी लग्न झाले. गावच्या मुखीयाने तिच्या लग्नात गाव भोजन दिले. पुरणचंद झलकारीला घेऊन राणी लक्ष्मीबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी राणीच्या महालात गेले. दोघांना आशीर्वाद व भेटही दिली. राणीला झलकारी पसंत पडली. झलकारी ला राणीने आपल्या महालात नोकरी दिली. राणीच्या इतर दासींनी राणीला झलकारीच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. राणीने झलकारीला स्त्रियांची सेना उभारण्यास व त्यांना शस्त्र संचालनाचे प्रशिक्षण देण्यास सांगितले. झलकारीच्या प्रयत्नाने राणीचे स्त्री सैन्य उभे राहिले. तेच राणीचे *'दुर्गा दल'* होय.
राणीचे पती गंगाधरराव यांनी त्यांच्या निधनापूर्वी दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला होता. तो इंग्रज सरकारने नामंजूर केला व झांशीचे राज्य खालसा करण्यासाठी इंग्रज अधिकारी पाठविला. तेव्हा त्याला राणीने स्पष्ट शब्दात सांगितले "मै मेरी झांसी नही दुंगी." तो अधिकारी परत गेल्यावर इंग्रजांनी आक्रमण करून झाशीचा किल्ला ताब्यात घ्यायचे ठरविले. सर ह्यू रोज हा मोठा सैनिक घेऊन आला व त्याने झाशीच्या किल्ल्याला १९ मार्च १९५८ रोजी वेढा दिला. त्या आधी राणीने युद्धाची तयारी करूनच ठेवली होती. वेढा पडल्याचे पाहून राणीने किल्ल्याच्या व शहराच्या तटावर जातीने फिरून युद्धाचा बंदोबस्त केला.
२३ मार्च १८५८ रोजी इंग्रजांनी किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. किल्ल्याच्या तटावरून राणीचे गोलंदाज आपल्यात तोफांतून इंग्रज सैन्यावर आग ओतू लागले. दुलाजी ठाकूर हा गोलंदाज इंग्रजांना फितूर झाला. तो इंग्रज सैन्यावर गोळाबारी न करता मोकळ्या जागांवर तो तोफगोळे सोडू लागला. शहराच्या तटांच्या गुप्त वाटाही त्याने इंग्रजांना दाखवील्या. इंग्रजांच्या तोफगोळ्यांनी शहरात ठिकाणी आगी लागल्या. दुलाजी ठाकूरची फितुरी व करतूत झलकारीने राणीच्या कानावर घातली. अटितटीचा प्रसंग पाहून राणीने आपल्या सैन्यातील प्रमुख योध्द्यांची बैठक घेतली. पुढे काय करावे ? हा गंभीर प्रश्न होता. त्या बैठकीत झलकारी आली. तिने फितुरी झाल्यामुळे इंग्रज सैन्य शहरात शिरले आहे. ते किल्ल्यात शिरले तर समोरासमोर लढावे लागेल. त्यात आपला निभाव लागणार नाही असे सांगितले.
राणीने झलकारी ला विचारले, "आता यावर उपाय काय? तेच तर ठरवायचे आहे." त्यावर झलकारी म्हणाली, "बाईसाहेब, अशा परिस्थितीत तुम्ही किल्ल्याबाहेर निघून गेले पाहिजे. शत्रुला चकविण्यासाठी मी तुमचा वेष अंगावर घालून काही शिपायांसह किल्ल्याच्या बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीन. शत्रू मला राणी समजून माझ्या पाठीमागे धावेल. तुम्ही दुसऱ्या बाजूने गुप्तपणे सैन्याच्या तुकडीसह किल्ल्यातून निघून जावे आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन पुन्हा नव्याने सैन्य संघटीत करावे.
सर्वांना योजना पसंत पडली व तिच्या बुद्धीचे कौतुकही वाटले. झलकारीने राणीचा वेष धारण केला व घोड्यावर स्वार होऊन काही सैनिकांनीशी ती किल्ल्याबाहेर पडली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई निवडक योद्ध्यांसह किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने साधारण वेशात काल्पीच्या मार्गाने निघून गेली. झलकारीला इंग्रज सैन्याने राणी समजून घेरले. दुलाजी ठाकराच्या एका माणसाने तिला लगेच ओळखले. तिने त्याच्या अंगावर आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. घोडा हल्ल्याने नेम चुकला व त्या गोळीने एका इंग्रज सैनिकांचे प्राण घेतले. सर ह्यू रोजला त्या फितुराने सांगितले की, ही राणी नसून तिची दासी झलकारी आहे. तेव्हा रोज ने तिला दम देत म्हटले, " तू राणीचा वेष घेऊन आम्हाला धोका दिला आहेस. आमच्या एका सैनिकाला तू मारले आहेस. मी तुला जिवंत सोडणार नाही." नंतर झलकारी ने बेधडकपणे रोज ला सांगितले," मार मला गोळी, मी तयार आहे." तेव्हा एक इंग्रज अधिकारी म्हणाला, "पागलच दिसत आहे." त्यावर ह्यू रोज गंभीरपणे उत्तरला, "भारतात जर अशा एक टक्का स्त्रीया असल्या तर सर्व इंग्रजांना या देशातून पळून जावे लागेल." ह्यू रोजने झलकारी ला एका तंबूत सक्त पहा-यात ठेवले. पण ती वाघीण पिंजऱ्यात कशी राहणार? रात्री सारे पहारेकरी झोपले. तेव्हा हळूच ती तंबू बाहेर पडून किल्ल्यात चपळाईने निघून गेली.
सकाळी लवकर उठून जनरल आपल्या दुर्बिणीतून किल्ल्याच्या तटावरील तोफांच्या मोर्चा कडे पाहिले. तेव्हा तो अतिशय आश्चर्यचकित झाला. एका बुरुजावर झलकारी तिच्या नवऱ्याबरोबर तोफा व्यवस्थित लावत होती. त्याने लगेच त्या तंबूत जाऊन पाहिले. तो सारे शिपाई झोपलेले असून झलकारीचा तंबूत मागमूसही नव्हता.
लगेच युद्ध सुरू झाले. काही वेळाने एक गोळी सूं सूं करीत आली व पूरणचंदच्या छातीतून आरपार निघून गेली. पूरणचंद खाली कोसळला. तेव्हा झलकारीने तोफेतून गोळा सोडला. त्याने अनेक इंग्रज सैनिक ठार झाले. इंग्रज सेनेतून एक गोळा आला आणि त्या गोळ्याने झलकारीच्या शरीराचे तुकडे-तुकडे होऊन वर उडाले. रक्ताचा सडा पडला. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी धैर्याने, प्राणपणाने लढणारी एक मागासवर्गीय तरुणी इतिहासात आमर झाली. या वीरांगनेला अंतःपूर्वक प्रणाम !
*धन्य ती वीरांगना झलकारी..!!*
झलकारी बाईची महानता पाहून त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या नावावर भारत सरकारने २२ जुलै २००१ रोजी डाक तिकिट जारी केले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*◆शुक्रवार~22/11/2024◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment