*23/01/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *23. जानेवारी:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.13, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~इन्द्र, करण ~कौलव,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:26,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
23. *हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे, परंतु एक- दोष दूर करणे कठीण.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
23. *वारा पाहून पाठ फिरवावी –*
*★ अर्थ ::~*
वातावरण पाहून वागावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
23. ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः ।
⭐अर्थ ::~ एकी (संघटितपणा) हे समाजाचे बळ असून ऐक्याच्या अभावी समाज दुर्बळ ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *23. जानेवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★'जागतिक हस्ताक्षर दिन'
★हा या वर्षातील २३ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७३ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
●१८४९ : डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.
●१७०८ : छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२६ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)
◆१९२० : श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक
◆१८९८ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,
◆१८९७ : *नेताजी सुभाषचंद्र बोस*
◆१८१४ : सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५९ : विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित
●१९१९ : राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत.
●१६६४ : शहाजी राजे भोसले यांचे अपघाती निधन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
23. *★ जिंकू किंवा मरू ★*
════════════
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
लढती सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू
देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू
हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
23. *✹ सत्यम् शिवम् सुंदरा ✹*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम् शिवम् सुंदरा
शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा
विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा
होऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
23. *मन मानसाचे अन डोके...*
*●≦≧●≦≧●✧●≦≧●≦≧●*
एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाचीघ सर्व कामे ते करू लागले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
माकड हे मानवी मेंदूचे प्रतिक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचांरानी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहिल. परंतू त्याला काही काम नसेल तर ,ते नकारात्मक विचार करू लागेल,हिंसक होईल, भरकटेल. त्यामूळेच म्हटले जाते की,रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
23. नियतीसमोर गुडगे टेकले तर
नियती तूम्हाला नेस्तनाबूत करते.
मात्र तूमच्या ध्येयासाठी
नियतीशी झुंजाल तर...
नियती सुद्धा नतमस्तक होते...!!
"जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆●★●◆◆◆••====
23. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ संविधान समितीची शेवटची बैठक कधी झाली होती ?
➜ २४ जानेवारी १९५०.
✪ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा संशोधन केंद्र कोठे आहे ?
➜ निफाड.
✪ नानासाहेब पेशवे यांचे सेनापती कोण होते ?
➜ तात्या टोपे.
✪ पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थांत होते ?
➜ ग्लुकोज.
✪ गोलघुमट कोठे आहे ?
➜ विजापूर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
23. *💎नेताजी सुभाषचंद्र बोस💎*
┄─┅━━●✹●━━┅─┄
*_"यांच्या जयंती निमित्त_*
*_विनम्र अभिवादन"_*
⚜🌷🔹🌼🔹🌷⚜
*दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
*तेथे कर माझे जुळती ..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
🔸टोपणनाव: नेताजी
🔹*जन्म :~ २३ जानेवारी, १८९७*
कटक, ओडिशा, भारत
🔸मृत्यू :~ १८ ऑगस्ट, १९४५
तैहोको, तैवान
🔹चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा
🔸संघटना : अखिल भारतीय काँग्रेस,
फॉरवर्ड ब्लॉक, आझाद हिंद फौज
🔹प्रमुख स्मारके: पोर्ट ब्लेर येथील स्मारक
*♦सुभाषचंद्र बोस♦*
🔷हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला *जय हिन्द* चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
🔶नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.
*💥स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य*
🔷१९३९च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित टोनी मित्रा कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
🔷 रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे २० जुलै १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.
🔷 १९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.
🔶 लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.
🔷१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली.
🔶 २६ जानेवारी १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
*💥फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना*
🔷 ३ मे १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.
🔶दुसरे महायुद्ध सुरू होण्या पूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.
*💥भारतरत्न पुरस्कार*
🔷 १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁मंगळवार~23/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment