"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*23/02/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *23. फेब्रुवारी:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.14, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~आश्लेषा,
योग ~शोभन, करण ~वणिज
सूर्योदय-07:02, सूर्यास्त-18:41,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

23. *आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

23. *कामपुरता मामा ताकापुरती मामी *     *★ अर्थ ::~*
   - गरजेपुरता गोड बोलणारा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

23.  क्षणश: कणशश्चैव विद्याम्
      अर्थम् च साधयेत् |
        क्षणे नष्टे कुतो विद्या,
      कणे नष्टे कुतो धनम् ||
⭐अर्थ ::~ क्षणोक्षणी मिळवा विद्या,
        कणाकणानी संपदा
        क्षण सरता कुठे विद्या,
        कण सरता कुठे धन?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *23. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ५४ वा दिवस आहे.
★संत गाडगे महाराज जयंती

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकामधे आग लागली.
●१९५२ : संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
●१९४७ : आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना
●१४५५ : पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर
◆१९१३ : प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
◆१८७६ : देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●२००० : वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
●१९६९ : मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री
●१९०४ : महेन्द्र लाल सरकार – होमिओपाथीच्या प्रसारक, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✸ स्मृती तुझीच जागु दे ✸*
     ●●●●●००००००●●●●●
चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागु दे॥धृ॥

गती मती द्युती तुझी आमुच्यात येउ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको अम्ही असू सदा खडे॥१॥

पाहुनी सभोवती दुःख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागिलीस संपदा
दंभ मोह् लाजले पाहता तुझ्याकडे॥२॥

चरण धुंद चालु दे वेग त्यास येउ दे
ध्येयमंदिरावरी दृष्टि अढळ राहु दे
कवच घालुनी स्मृती सिध्द संगरा खडे॥३॥

धूलिच्या कणांतुनी घोष हा उठे महा
स्पर्श होउनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूति सापडे॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

23.*❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

23. *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃*
          ••◆•◆•◆★◆•◆•◆••
     *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले.
          घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्‍याने पाहणार्‍या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्‌गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्‍याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.'
            ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्‍याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

23. प्रगती अशी करा की...
          भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल..!!
     आणि एकमेकांना सहकार्य
  इतकं करा की....
    आपल्या जीवनाचं सार्थक होईल...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

23. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  चौधरी चरणसिंह यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
➜ किसान घाट.

✪  राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
➜ ११ मे.

✪  भारतातील सर्वांत पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?
➜ ताजमहल.( मुंबई )

✪  अरूणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?
➜ इटानगर.

✪  मौर्य घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव काय होते ?
➜ बृहद्रथ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23.    *❒ गाडगे महाराज  ❒*
     ━━═•◆●★◆★●◆•═━━
     *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
    🌷🍁🌹🌼🌹🍁🌷
      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
      *तेथे कर माझे जुळती ..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*🔸जन्म:~ २३ फेब्रुवारी १८७६*
शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र
🔹मृत्यू :~ २० डिंसेंबर १९५६
      वलगांव (अमरावती)

  *💥गाडगे महाराज ऊर्फ💥*
        *☀डेबूजी झिंगराजी जानोरकर*
    🔶हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.   

    🔷सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला.

    🔶दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले.

    🔷समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

    🔶त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

   🔷 महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

   🔶अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे.गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शुक्रवार~23/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment