"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*23/04/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🟢🔵🟣
🍥 *23. एप्रिल:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र पौर्णिमा, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~पौर्णिमा, नक्षत्र ~चित्रा,
योग ~वज्र , करण ~विष्टि,
सूर्योदय-06:15, सूर्यास्त-18:58,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

23. *शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजोपयोगी विकास.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. *झाकली मूठ सव्वा लाखाची –*
         ★ अर्थ ::~ 
दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *वृक्षा: सत्पुरुषा इव ।*
        ⭐अर्थ ::~
वृक्ष हे सत्पुरुषांप्रमाणे असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 *★23. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक पुस्तक दिन
★ हा या वर्षातील ११३ वा (लीप वर्षातील ११४ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.
●१८१८ : दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९७ : लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते
◆१८७३ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४)
◆१८५८ : पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
◆१८५८ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)
◆१५६४ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ ◆१९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)

    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष
●२००१ : जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक
●२००० : मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन
●१९९२ : सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१)
●१९२६ : हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ
●१९५८ : शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक
●१८५० : विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे.
●१६१६ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५, पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २३ एप्रिल १५६४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✸अमुचा भारत देश महान..!*
           ●●●●●००००००●●●●●
अमुचा भारत देश महान
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार

स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !

स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
       अमुचा भारत देश महान !

या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !

गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *❂ शुभंकरोति म्हणा ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा

या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना

दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23.  *❃❝ गौतम बुद्ध ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, *"आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"*

    सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."

    यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो".

    यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.

    शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.
ते म्हणाले, *"जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात."*

    "आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"
असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले....

    "कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतंच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23.  कुणा वाचून कुणाचे काय
आडत नाही, हे जरी खरे आसले,
तरी कोण कधी उपयोगी पडेल,
         हे सांगता येत नाही
आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,
छोट्यांना कधी विसरु नका.
   कारण, जिथे सुईचे काम असते...
*तिथे तलवार कधीच चालत नाही..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?
➜ इंडियन एअरलाइन्स.

✪ भारतात चारमिनार कोठे आहे ?
➜ हैद्राबाद.

✪  गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?
➜ गांधीनगर.

✪  इंडिया गेट कोठे आहे ?
➜  दिल्ली.

✪ एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?
➜ अनंत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. *❒ विठ्ठल रामजी शिंदे  ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.
●मृत्यू - 2 जानेवारी 1944

1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.
'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.
जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

  ■ संस्थात्मक योगदान :~

1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.
18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.
1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.
द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.
अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.
23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.
1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.
1923 - तरुण ब्रहयो संघ.
1937 - बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
वृद्धंनसाठि संगत सभा.
लेखन :

प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.
1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.
1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.
Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.
Untouchable India,
History Of Partha,
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र

     ■ वैशिष्ट्ये :~

शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.
1904 - मुंबई धर्म परिषद.
1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.
1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.
1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.
1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁मंगळवार ~23/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment