"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*23/08/24 शुक्रवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/aqVKjN
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *23. ऑगस्ट:: शुक्रवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण कृ.४, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~रेवती,
योग ~शूल, करण ~बालव,
सूर्योदय-06:20, सूर्यास्त-19:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

23. *असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

23. *शेरास सव्वाशेर*
        *★अर्थ ::~*
- स्वत:स सामर्थ्यवान समजणाऱ्यास त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान भेटतोच
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

23. *गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः ।*
   ⭐अर्थ ::~ गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

     🛡 ★ 23. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २३५ वा (लीप वर्षातील २३६ वा) दिवस आहे.
★ राष्ट्रीय स्पेस डे   
    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
● २०२३: चांद्रयान-3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला.
●२००५ : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
●१९६६ : ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
●१९४२ : दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू
●१९४२ : मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : मलाईका अरोरा - खान – मॉडेल व अभिनेत्री
◆१९५१ : नूर – जॉर्डनची राणी
◆१९४४ : सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री
◆१९१८ : *गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर* – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. 
(मृत्यू: १४ मार्च २०१०)

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●१९९४ : आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू
●१९७५ : पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते.
●१९७४ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक.
●१९७१ : रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

23. *✸ देश हीच माता ✸*
   ●●●●●०००००●●●●
देश हीच माता, देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता

धर्म पंथ नाही आम्हां जात-गोत नाही
मुले माणसाची अम्ही, वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता

खुली ज्ञान-विज्ञानाची, कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा

विस्मरू न अम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हां यशोदाता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

23.     *❂ देह मंदिर ❂*
       ✶✶✹✹★★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्‍त आम्ही फक्‍त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

23.  *❃ कथा आईनस्‍टाईनची ❃*
   ━═•●◆●★★●◆●•━━
   अल्‍बर्ट आईनस्‍टाईन लहान‍पणी शिक्षणाच्‍या बाबतीत फारच विरक्त होते. त्‍यांना शाळेत जाणे आणि शिकणे अजिबात आवडत नव्‍हते. जेव्‍हा शाळेचे शिक्षक अल्‍बर्ट यांना एखाद्या विषयाबाबत आठवायला सांगत तेव्‍हा त्‍यांना तो विषय आवडत नसे. त्‍यांना तर चिंतन मनन करणे आवडायचे. एका विषयावर विचार करत असताना ते तासनतास घालवत असत. त्‍यावेळी त्‍यांना शिक्षकांच्‍या शिक्षेस सामोरे जावे लागत असे. एकेदिवशी अल्‍बर्टने आपल्‍या आईवडीलांना सांगितले की, मी आता शाळेत जाणार नाही. आईने कारण विचारले, तेव्‍हा छोटा अल्‍बर्ट म्‍हणाला,''आई तेथे शिक्षण नाही तर पोलिस शिकवतात, छोट्या छोट्या कारणावरून रागवतात, मला ते सहन होत नाही आणि गणित विषय हा तर मला खायला उठतो.'' तेथेच अल्‍बर्टचे काका जेकब बसलेले होते ते त्‍याची गोष्‍ट ऐकून म्‍हणाले,'' बेटा, हे काय सांगत आहेस की तुझे मन गणितात लागत नाही, मग तुझे खेळातही मन लागत नाही का.'' अल्‍बर्ट म्‍हणाला'' खेळात तर माझे मन लागते'' जेकब म्‍हणाले,'' तर ये मग, आपण चोर पोलीस खेळूया'' जेकबने काही रेषा काढल्‍या आणि गोटया सरकावू लागले. अल्‍बर्ट यांची खेळातली आवड आणि कौशल्‍य पाहून जेकब म्‍हणाले,'' हेच तर बीजगणित आहे त्‍यात संख्‍यांचा शोध घ्‍यावा लागतो.'' अल्‍बर्ट म्‍हणाला,'' काका, हेच गणित आहे, यात अवघड असे काहीच नाही, असे गणित जर असेल तर मी शाळेत जायला तयार आहे''

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    विषय सोपा करून सांगणे ही शिक्षकाची आवड असली पाहिजे. शिक्षकांनी सोपे करून सांगितल्‍यास विद्यार्थ्‍याना लगेच समजते. पालकांनीही मुलांच्‍या शिक्षणाकडे लक्ष दिल्‍यास मुले नवीन कल्‍पना स्‍वीकारू लागतात व त्‍यातून चांगला परिणाम मिळतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

23. "वेळ, तब्बेत आणि नाती ह्या    
        अशा तीन गोष्टी आहेत की,
   त्यांना किंमतीचे लेबल नसते...

  *"पण"ह्या हरवल्या की समजते,*
*त्यांची किंमत किती मोठी असते..!!*  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

23. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करीत असतो ?
  ➜ लहान मेंदू.

✪  मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते ?
➜  ३३.

✪  मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
  ➜ २४.

✪  शरीरातील सर्वांत लहान हाडाला काय म्हणतात ?
  ➜ स्टीरप.

✪  शरीरातील सर्वांत मोठ्या हाडाला काय म्हणतात ?
  ➜ फिमर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

23.  *❒ विंदा करंदीकर ❒* 
    ━═•●◆●★●◆●•═━
◆गोविंद विनायक करंदीकर
◆टोपणनाव :~ विंदा करंदीकर
*●जन्म :~ २३ ऑगस्ट १९१८*
             घालवण, सिंधुदुर्ग
●मृत्यू :~ १४ मार्च २०१०
             मुंबई,महाराष्ट्र.
●कार्यक्षेत्र :~ कवी, समीक्षक

     *गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'*

       हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.

          ◆ कौटुंबिक ◆
    विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासले पणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.

     विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ. जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. विंदांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

       ◆ पुरस्कार आणि पदवी ◆
•सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
•सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
•कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
•महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
•कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
•कबीर सन्मान १९९१
•जनस्थान पुरस्कार १९९३
•कोणार्क सन्मान १९९३
•साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
•महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
•भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
•डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
•ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार इ.स. २००३)
•केशवसुत पुरस्कार
•विद्यापीठांच्या डी.लिट्‌स

◆विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार◆
     महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शुक्रवार~23/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment