"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*23/09/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *23. सप्टेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━           
भाद्रपद कृ.६,पक्ष :कृष्ण पक्ष,  ,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~सिद्धि, करण ~वणिज,
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:33,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

23. *ट्यालेंट सगळ्यांत असत, त्यानुसार जगण्याच धेर्य मात्र सगळ्यात नसत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

23.   *आंधळा मागतो एक डोळा,
     देव देतो दोन डोळे*
            ★ अर्थ ::~
   अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

23. *सुखार्थिन: कुतो विद्या ।*
       ⭐अर्थ ::~ सुखाची इच्छा करणाऱ्याला विद्या कोठून मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 23. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २६६ वा (लीप वर्षातील २६७ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : ’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.
●१८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
●१८४६ : अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५७ : कूमार सानू – पार्श्वगायक
◆१९४३ : तनुजा - चित्रपट अभिनेत्री
◆१९१९ : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी
◆१९०८ : रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
◆१९०३ : युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल – जादूगार
●२००४ : डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
●१९३९ : सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक
●१८७० : प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
●१८५८ : ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

23. *✸ जय जवान जय किसान✸*
     ●●●●००००००●●●●
एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !

अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !

शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

23.  *✹धार वज्राची मिळू दे !✹*
    ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

23.  *❃❝ गरुड झेप..!! ❞❃*
   ━═•●◆●★●◆●•═━
    एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.

    त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'

     हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.

    शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला..!!
   त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"

   तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"
   आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात..!!
     मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!

     अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!

   ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!
मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

23. *मन ओळखणारयांपेक्षा मन*
     *जपणारी माणसं हवीत...*
          'कारण, ओळख ही
     क्षणभरासाठी असते तर
   *जपवणूक आयुष्यभरासाठी!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

23. *✿ भारतातील पहिले ✿*
  ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
■ *पहिले जलविद्युत यंत्र-
    ➜ *दार्जिलिंग (१८९७-९८)*

■ *पहिला आकाशवाणी केंद्र-
    ➜ *मुंबई (१९२७)*

■ *पहिला बोलपट-
    ➜ *आलमआरा (१९३१)*

■  *पहिली पंचवार्षिक योजना-
    ➜ *१९५१*

■  *पहिल्या सार्वत्रिक निवडणुका-
    ➜ *१९५२*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

23. *❒ ♦राव तुलाराम सिंह♦❒* 
                  (राव बहादुर)
     ━═•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ ९ डिसेंबर १८२५
            (रामपुरा, रेवाडी, पंजाब)
●मृत्यु :~ २३ सप्टेंबर १८६३
            ( काबूल, अफगानिस्तान)

◆वडिल : राव पुरण सिंह
◆आई : राणी ज्ञान कौर

       राव तुला राम सिंह हरियाणाचे जहागीरदार होते. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होते. त्यांना हरियाणा राज्यातील 'राज नायक'  मानले जाते. त्यांनी नसिबपुर येथे इंग्रजांसोबत लढाई केली. यामध्ये पाच हजारांहून जास्त सैनिक मारले गेले. त्यानंतर नवराने येथे इंग्रजांशी दुसरी लढाई केली पण पराभवच पदरात पडला. पुढील रणनीती आखण्यासाठी तात्या टोपे यांच्या भेटीला गेले पण त्यांना इंग्रजांनी बंदी बनविल्यामुळे त्यांनी दुसऱ्या देशातील शासकांशी संपर्क साधला. १८५७ चा हरियाणाच्या दक्षिण-पश्चिम भागातील संपूर्ण ब्रिटिश राजवटीला तसेच दिल्ली शहरातील विद्रोही सैनिकांना युद्धसामग्री पुरविण्याचे श्रेय त्यांना जाते.  १८५७ लढ्यात भाग घेतल्यामुळे इंग्रजांनी  १८५९ मध्ये राव तुला राम सिंह यांची रियासत जप्त केली. परंतु त्यांच्या दोन्ही पत्नींचा संपत्तीवरील अधिकार कायम ठेवला. भारत मातेला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने इंग्रजांसोबत युद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांसह सहाय्यता मागण्यासाठी इराण व अफगाणिस्तान येथील शासकांची  भेट घेतली. रशियाच्या जार सोबत संपर्क करण्याची त्यांची योजना होती पण या प्रयत्ना दरम्यानच २३  सप्टेंबर १८६३ ला काबूल येथे त्यांचे निधन झाले. अफगान सरकारने त्यांना मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. १८७७  ला त्यांचे पुत्र राव युधिष्ठिर सिंह यांना प्रमुख पदी बसवून त्यांची उपाधी परत करण्यात आली.
      २३ सप्टेंबर २००१ मध्ये भारत सरकारने महाराजा राव तुलाराम सिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिकीट जारी केले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार ~23/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment