◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *23. डिसेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.८, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~उत्तराफाल्गुनी,
योग ~सौभाग्य, करण ~कौलव,
सूर्योदय-07:08, सूर्यास्त-18:07,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
23. *सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
23. उंटावरून शेळ्या हाकणे –
*★ अर्थ ::~*
आळस, हलगर्जीपणा करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
23. *योजकस्तत्र दुर्लभ: ।*
⭐अर्थ :: ~ योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
🛡 ★ 23. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ राष्ट्रीय किसान दिन
★ हा या वर्षातील ३५७ वा (लीप वर्षातील ३५८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
●१९५४ : डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
●१९४० : वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
●१९२१ : शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०२ : चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक
●१८९७ : कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
◆१८५४ : हेन्री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक
●२०१० : ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक.
●२००४ : नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१)
●१९९८ : रत्नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य ,पद्मश्री, खासदार
●१९७९ : दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
23. *✸ अमुचा भारत देश महान ✸*
●●●●००००००●●●●
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार
स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !
स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !
या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !
गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
23.*❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━
23. *❃❝ आत्मविश्वास...!! ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता.
धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावत होते.
असाच तो एका बगिच्यातील बेंचवर हातांनी डोके धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे
त्याला खूप वाटत होते.
अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर
उभा राहिला.
मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, तो म्हणाला. मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.
व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक.
या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला.
आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने
तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला.
त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर
करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले.
काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.
बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन
आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशोगाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स
तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुम्हाला मी पकडलेच! व्यावसायिकाकडे बघून ती नर्स ओरडून म्हणाली. याने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात
असतो आणि लोकांना सांगत बसतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून.
असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले.
व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले
की, त्याचे आयुष्य बदलवून
टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वातच नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
23. *वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत*
*घट्ट रुजून राहायचं असतं,*
*ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात*,
*वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो*
*आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
23. *✿ महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
●भारतातील केशरचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
~ जम्मू काश्मिर.
● जगातील सर्वांत मोठे बेट कोणते ?
~ ग्रीनलँड.
● भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो ?
~ २४ डिसेंबर.
● संजय हे कोणाचे टोपणनाव आहे ?
~ माधव पंढरीनाथ शिखरे.
● भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
~ मोर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
23. *❒पी.व्ही. नरसिंहराव ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव◆
●जन्म :~ २८ जून १९२१
●मृत्यू :~ २३ डिसेंबर २००४
हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.
● व्यक्तिगत माहिती ●
राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अश्या तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांचे मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या.
● राजकारणात प्रवेश ●
त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
● पंतप्रधानपद ●
राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.
नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरूद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली.
तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले.
जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.
● विधानसभा निवडणुका ●
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले.
● भ्रष्टाचाराचे आरोप व सरकारची अधोगती ●
१९९४ मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरूद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरीसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरूद्ध जाऊ लागले.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचा इ.स. १९७७ पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला.
सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३ मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणुक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणुक झाली. तसेच जानेवारी, १९९७ मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वापासून अलग पडले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁सोमवार ~23/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment