*23/11/24 शनिवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *23. नोव्हेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.८, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~मघा,
योग ~इन्द्र, करण ~बालव,
सूर्योदय-06:50, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
23. *दुसर्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दया.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
23. *आजा मेला नातू झाला*
*★ अर्थ ::~* एका हानीबरोबर दुसऱ्या गोष्टीचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
23. *चक्रवत् परिवर्तन्ते दु:खानि च सुखानि च ।*
⭐अर्थ ::~ सुखदु:खे चाकाप्रमाणे पालटत असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 23. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★संस्कृती एकता दिन
★हा या वर्षातील ३२७ वा (लीप वर्षातील ३२८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल ’अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान
●१९७१ : चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
●१९५५ : कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
●१९२४ : एडविन हबल यांनी ’देवयानी’ (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८४ : अमृता खानविलकर – अभिनेत्री
◆१९६७ : गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
◆१९२६ : सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू
◆१९२३ : नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक
◆१८८२ : वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक
●१९९९ : कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
●१९५९ : ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते
●१९३७ : जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
23. *✸ एक सुराने गाऊ ✸*
●●●●००००००●●●●
हिंदू , मुस्लिम , बौद्ध , ख्रिस्तीअन , सीख आपण भाऊ
या देशाचे भविष्य घडवू , एक जुटीने राहू ll धृ ll
काश्मीर ठेवे भाल उंच ते नंदनवन ही साजे
जलधि मधे चरण टाकुनी , कन्याकुमारी विराजे
हिमालयाची ढाल घेवूनी , फडकत ठेवे बाहु ll १ ll
या देशाचे .....
लाल , बाळ अन् पालही लढले , लढली राणी झाशी
लढले गांधी भगतसिंगही , हासत गेले फाशी
जालियनवाला बाग घातली , रक्तामधे न्हावू ll २ ll
या देशाचे .....
कलाम अब्दुल , मनमोहनजी सकलां येथे संथी
महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील , गुजराथ मधले मोदी
मंदिर मस्जिद गुरुद्वारा अन् बौद्ध विहारी जावू ll ३ ll
या देशाचे .....
ऑगस्ट पंधरा घेवून येई , स्वातंत्र्याचा उत्सव
जानेवारीची सव्वीस करते , गणराज्याचा महोत्सव
सर्व धर्म समभाव जागवू ,
एक सुराने गावू ll ४ ll
या देशाचे ...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
23. *❂ नमने वाहुनि स्तवने ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्तीला, त्या ज्ञप्तीला, वदती वागीश्वरी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
23. *❃❝ गरुड आणि घुबड ❞❃*
━━•●◆●★●◆●•═━
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले," गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखाद्या पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीती वाटते,"गरुड म्हणाला, " खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही." घुबड म्हणाले, " ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल. "
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही." असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, " गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते." गरुड म्हणाला, " मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
23. *बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं...*
*पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं...*
*एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा*
*एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा*
*कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,*
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
23 *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ?
➜ आयोडीनचे.
✪ कोयनेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळते ?
➜ सालीपासून.
✪ हायड्रोग्राफी हे शास्ञ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
➜ जलवनस्पती.
✪ एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात ?
➜ बुंद्यावरील वलये मोजून.
✪ आल्याचा खाण्यास योग्य भाग कशापासून मिळतो ?
➜ खोडापासून.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
23. *❒डॉ.(सर) जगदीशचंद्र बोस❒*
━━•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ ३० नोव्हेंबर १८५८
●मृत्यू :~ २३ नोव्हेंबर १९३७
नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ
🛡 वनस्पतीं मधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते.
पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. जगदीशचंद्र बोस यांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणा पासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा नकंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.
★ विद्युतशक्तीवरील संशोधन ★
प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युत शक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. यांनी १८९७ मध्ये बनविलेले मायक्रोवेव्ह निर्मितीचे उपकरण.
★वनस्पती शास्त्रातील संशोधन★
विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस ते वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे वनवून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिरा भिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून हि प्रक्रिया उलगडून दाखविली आहे. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*◆शनिवार ~23/11/2024◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment