"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*24/02/19 रविवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 24/02/2019 ❁*
      *🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *24. फेब्रुवारी:: रविवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             माघ कृ. ६
     तिथी : कृष्ण पक्ष पंचमी,
             नक्षत्र : स्वाति,
    योग : व्रुद्धी,  करण : तैतिल,
सूर्योदय : 07:01, सूर्यास्त : 18:42,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

24. *एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

24. *पळसला पाने तीनच*
      *★ अर्थ ::~*
- सगळीकडे सारखी परिस्थिती असणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

24.   *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ★अर्थ :~ सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

        🛡 *24. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★क्षयरोग निवारण दिन
★हा या वर्षातील ५५ वा दिवस आहे.
★जागतिक मुद्रण दिन
★इस्टोनियाचा स्वातंत्र्य दिन
★केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
●१९६१ : मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
●१९५२ : कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
◆१८२२ : जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
◆१९४८ : जे. जयललिता – राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री
◆१९२४ : तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा
१६७० : राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू: २ मार्च १७००)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक
●१९९८ : ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या
●१९३६ : लक्ष्मीबाई टिळक – ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे.
●१८१५ : रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *✸ उधळीत शतकिरणां ✸*
        ●●●●●००००००●●●●●
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया

थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी

चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

24. *❂ सर्वेश्वरा शिवसुंदरा ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना

सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना

श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना

न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

24. *❃ वानर व कोल्हा ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   *एकदा एक वानर व कोल्हा* यांची अरण्यात गाठ पडली तेव्हा वानर कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल.
      हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  *काही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपयोग घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो की, त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण दुसर्‍याला कधीही देणार नाहीत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
 ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

24. " जर विश्वास देवावर असेल ना ,
तर जे नशीबात लिहिलय ते नक्किच मिळणार ,

                      पण .....
    विश्वास स्वःताचा स्वःतावर असेल ना; तर देव सुध्दा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे ".
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

24. *✿ भारतातील सर्वात मोठे,*
          *उंच, लांब..... ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
★ सर्वोच्‍च नागरी सन्‍मान =
          ~ भारतरत्‍न
★  सर्वात मोठा घुमट =
           ~ गोलघुमट, विजापूर
★ सर्वात लहान जिल्‍हा =
           ~ गोरोहिल्‍स, मेघालय
★ सर्वात लांब कालवा =
       ~इंदिरा गांधी कालवा राजस्‍थान
                  【95 कि.मी.】
★ सर्वात मोठे वस्‍तुसंग्रहालय =
        ~ इंडियन म्‍युझियम, कोलकाता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

24.   *❒ ♦जयललिता♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्ण नाव जयललिता जयराम
●मुख्यमंत्री तामिळनाडू
●जन्म:~ २४ फेब्रुवारी १९४८
●मृत्यू:~  ५ डिसेंबर २०१६

◆ मुख्यमंत्री जयलितांचा जीवनप्रवास
     
     केवळ दक्षिणेकडेच नाही तर एकूणच भारतीय राजकारणात प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून मुख्यमंत्री जयललिता यांची ओळख आहे.  त्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळ्हघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या.

     जयललिता यांचा आजवरचा जीवनप्रवास नाट्यमय राहिला आहे. त्याविषयी ही खास माहिती.

  त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ ला तत्कालिन म्हैसूर राज्यात मेलूरकोट, ता. पांडवपुरा येथे एका अय्यर परिवारात झाला. त्या दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना घेऊन बंगलोर गाठले. तेथे त्यांच्या आईने ‘संध्या’ या नावाने चित्रपटांमध्ये कामाल सुरुवात केली. नंतर जयललिता यांनाही चित्रपटात काम करण्यासाठी आईने राजी केले.

    जयललिता यांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री हा प्रवास तसा संघर्षाचाच म्हणावा लागेल. आपल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. अण्णाद्रमुकचे संस्थापक नेते एम.जी. रामचंद्रन यांच्या त्या जवळच्या समजल्या जात.

      जयललिता यांनी वयाच्या १५ व्या वर्षी चित्रपट अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. विद्यार्थी दशेत शिक्षणाची त्यांना विशेष आवड होती.

      त्यांनी एमजीआर यांच्यासोबत २८ चित्रपटांत काम केले. एमजीआर तामिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार म्हणून ओळखले जात. तसेच ते प्रभावी राजकीय व्यक्तीमत्वही होते.  त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केलेला आहे.

     चित्रपटसृष्टीला राम राम करून जयललितांनी राजकारणाच्या जगात प्रवेश केला.  १९८३ मध्ये एम. करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाशी फारकत घेतल्यानंतर एमजीआर यांनी अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. त्यावेळेस जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच  राज्यसभेसाठीही त्यांचे नामांकन करण्यात आले. त्याच दरम्यान जयललिता यांचे एमजीआर यांच्याशी बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु १९८४ च्या पक्ष प्रचार अभियानाचे जयललिता यांनी नेतृत्व केले होते.

      जयललितांचा राजकारणात संपूर्ण उदय झाला, तो १९८७ ला. एमजीआर यांचे निधन झाल्यानंतर. एमजीआर यांच्या अंत्ययात्रेत त्यांची पत्नी आणि समर्थकांनी जयललिता यांच्यासोबत कथित गैरव्यवहार केल्याचे सांगितले गेले. त्यातून या पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले.

     मात्र त्यानंतर राजकारणात ठाम राहिल्याने आणि जनतेच्या मनातील राजकीय पकड घट्ट केल्यामुळे जयललिता १९९१ मध्ये पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. नंतर झालेल्या ९६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवला सामोरे जावे लागले. पण तोपर्यंत राजकारणातील ‘जानी मानी हस्थी’ म्हणून त्यांचे नाव झाले होते.

      २००१ मध्ये त्या पुन्हा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मात्र त्यानंतर थोड्याच कालावधीत त्यांना हे पद सोडावे लागले.

      पुढे २०११ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या त्यानंतर  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होत्या. २०१६ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या.

     उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर दोषारोपपत्र सिद्ध झाले. त्यानंतर २७ सप्टेंबर २०१४ मध्ये बंगळूरुच्या एका कोर्टाने त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांना शिक्षा झाल्यानंतर तामिळनाडूत भयानक हिंसा आणि अशांतता पसरली होती.

     मध्यंतरी जयललिता यांच्या अनुपस्थितीत पनीर सेल्वम यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून काम पाहिले. पण ते जयललिता यांच्याशी इतके एकनिष्ठ होते की त्यांनी त्यांचे कार्यालय किंवा विधानसभेतील खूर्चीचा कधीही वापर केला नाही.

    चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ५ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ रविवार ~ 24/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment