"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*24/04/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *24. एप्रिल:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र कृ.1, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~स्वाती,
योग ~सिद्धि, करण ~बालव,
सूर्योदय-06:15, सूर्यास्त-18:58,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

24. *हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

24. *एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे*-
    *★ अर्थ ::~* एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

24. *नास्ति चात्मसमं बलम् ।*
               ⭐अर्थ ::~
आत्मबलासारखे श्रेष्ठ दुसरे बळ नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★24. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जलसंपत्ती दिन
★ हा या वर्षातील ११४ वा (लीप वर्षातील ११५ वा) दिवस आहे.
जागतिक श्वान दिन

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.
●१९९० : डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.
●१९६७ : वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.
●१८०० : अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.
●१६७४ : भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न
◆१९७० : डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९४२ : बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका
◆१९२९ : राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
◆१९१० : राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
◆१८९६ : रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ’ त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या.

    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू
(जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
●१९९४ : शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ
●१९७४ : रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
●१९६० : लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील, महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक, केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते
●१९४२ : मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म: २९ डिसेंबर १९००)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *✸ उंच उंच गगनात तिरंगा ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारतीय सूर एक नांदतो ||धृ||
  उंच उंच गगनात तिरंगाssss

भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची
राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची
तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो ||१||
     उंच उंच गगनात तिरंगाssss

नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे
वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचे
आम्रतरु जणू वात्सल्याची नित्य सावली देतो||२||
     उंच उंच गगनात तिरंगाssss

मनमंदिरी स्थान आईला,नित्य आम्ही दिधले
उत्थानासाव भारतभूच्या जीवन वेचू आपले
तिची कस्तुरी गंधित माती ,भाळावर लावतो ||३||
     उंच उंच गगनात तिरंगाssss

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारतीय सूर एक नांदतो
      उंच उंच गगनात तिरंगाssss
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

24.*❂ शारदे हवे तुझे वरदान ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
मानवतेची गावी गाणी,
अशी आम्हा दे जिवंत वाणी l
अन्यायाचे दर्शन होता,उसळो त्वेष उधान ll१ll
   *शारदे हवे तुझे वरदान*

स्वतंत्र भारतभूचे वैभव ,सामर्थ्याने नटलेले नव,
उच्छवासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ll२ll
*शारदे हवे*.......

मराठीयेची नगरी आम्ही शिल्पकार की रचनाप्रेमी
जीवन मंदीर उभवू सुंदर हा अमुचा
अभिमान ll३ll
*शारदे*..........

उकलायाला जीवनशास्त्रे,पहावया नव विक्रमक्षेत्रे
दिव्यदृष्टी दे करावयाला उन्नत जीवन मान ll४ll
*शारदे हवे*........

दिवंगतांच्या अतृप्त आशा,पूर्ण कराया अशी मनीषा,
भीष्मकामना निववाया दे,अर्जुन शर संधान ll५ll
*शारदे हवे*.......

नव्या युगाची नवीन सृष्टी नव्या मानवा दे नव दृष्टी
हवा शारदे नवा वीरंची नवचातुर्य निधानll६ll
*शारदे*........
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

24.  *❃❝ सिंह आणि लांडगा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्‍यांच्‍या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्‍हणाला,'' महाराज, तुम्‍ही आता चालून चालून दमला असाल, तेव्‍हा तुम्‍ही इथेच बसा. मी तुमच्‍यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्‍या आवाजाच्‍या रोखाने गेला असता त्‍याला त्‍या मेंढ्यांच्‍या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्‍टपुष्‍ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्‍याचे दिसले. त्‍याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्‍हणाला,'' महाराज तुम्‍ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्‍या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत. इतक्‍या सा-या मेंढयामध्‍ये एकही मेंढी चांगली नाही तेव्‍हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.'' सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्‍यामुळे सिंहाला लांडग्‍याचा धूर्तपणा लक्षात आला.*

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  आपली असहाय्यता लपविण्‍यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्‍वभाव आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

24. "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
           *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

25. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे ?
➜ तुकडोजी महाराज.

✪ भारतातील सर्वात प्रथम I.C.S. अधिकारी व्यक्ती कोण होते ?
➜ सत्येन्द्रनाथ टागोर.

✪ भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता ?
➜  परमवीर चक्र.

✪  जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती ?
➜ महाभारत काव्य.

✪  स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ?
➜ १५०० फुट खोल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

24. *❒ राम शेवाळकर ❒*
    ─┅━━●●★◆★●●━━┅─
      हे मराठी लेखक, कवी होते.
जन्म :~ २ मार्च १९३१
मृत्यू :~ ३ मे २००

            ◆ राम शेवाळकर ◆
   कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.
राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.

         ◆ संस्थाविषयक कार्य ◆
    राम शेवाळकरांना अनेक साहित्य संस्थामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, आकाशवाणी सल्लागार मंडळ, संतपीठ सल्लागार समिती, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा कितीतरी संस्थाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष किंवा सदस्य या नात्यानं शेवाळकरांनी मोठी कामगिरी केली.

    नागपूर विद्यपीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ते संस्थापक होते. विदर्भातील लेखकांनाही एकत्रित करून त्यांनी 'अभिव्यक्ती' नावाची संस्था स्थापन केली होती.

        ◆पुरस्कार आणि सन्मान ◆
   'मॅन ऑफ द इयर ' हा अमेरिकेचा पुरस्कार, 'साहित्य धुरंधर' पुरस्कार बोस्टन येथील संस्थेतर्फे, स्वामी विवेकानंद पुरस्कार, श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य पीठ पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा कुसुमाग्रज पुरस्कार, नागपूर विद्यापीठाची डी. लिट्, डॉ. राधाकृष्णन पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, विदर्भ गौरव पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार,
जीवनव्रती पुरस्कार, नागभूषण पुरस्कार, राष्ट्रसेवा पुरस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार ~24/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment