"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*24/06/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *24. जून:: सोमवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
ज्येष्ठ कृ.३, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~उत्तराषाढा,
योग ~इन्द्र, करण ~वणिज,
सूर्योदय-06:02, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

24. *बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

24. *हातच्या कंकणाला आरसा कशाला?*-   
*★ अर्थ ::~* जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *यथा राजा तथा प्रजा ।*
  ⭐अर्थ ::~ जसा राजा तशी प्रजा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

   *🛡 ★ 24. जून ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक पक्षाघात निवारण दिन
★हा या वर्षातील १७५ वा (लीप वर्षातील १७६ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : ’आय. एन. एस. विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
●१९९८ : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर
●१९८२ : कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.
●१९३९ : सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२८ : मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य
◆१८९९ : नानासाहेब फाटक -- मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म
◆१८९७ : पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
◆१८६९ : दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे
(मृत्यू: १८ एप्रिल १८९८)
◆१८६२ : श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *✸ चिरविजयाचे वारस आम्ही*
          ●●●●●००००००●●●●●
चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥

व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥

समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥

खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥

तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. ❂गंजल्या ओठांस माझ्या धार❂
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

24.     *❝  वेडे सांबर ❞*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
     एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!''

  *_🌀तात्पर्य_ ::~* जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते. जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *" स्पष्ट " बोला पण असे बोला कि समोरच्याला " कष्ट " होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते "नष्ट "  होणार नाही.."*  
  *प्रयत्न करा की कोणी*
            *आपल्यावर रुसु नये*
*जिवलगाची सोबत कधी सुटु नये*.

   *नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?
➜पाटलीपुत्र.

✪  जागतिक कामगार दिन केव्हा असतो ?
➜१ मे.

✪ जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता ?
➜पॅसिफिक महासागर.

✪ खान अब्दुल गफारखान यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
➜खुदा-ई-खिदमदगार.

✪  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?
➜रायगड.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

24.  *❒ ♦ व्ही. व्ही. गिरी.♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १०ऑगस्ट १८९४
●मृत्यू :~ २४ जून १९८०
*●राष्ट्रपती, भारतरत्न*

    ★वराहगिरी व्यंकट गिरी★

     यांचा जन्म ओडिशात बऱ्हमपूर जिल्ह्यात झाला. स्थानिक कॉलेजात शिकल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी डब्लिनला तिथल्या विद्यापीठात गेले. पण १९१६ मध्ये काँग्रेसच्या चळवळीत व कामगार क्षेत्रात काम करण्यासाठी ते आयर्लंडमधून भारतात परतले. भारतात रेल्वे कामगारांची पहिली देशव्यापी युनियन बांधण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केलेच, शिवाय `आयटक' या कामगार संघटनेचे ते दोन वेळा अध्यक्षही झाले. १९३७ मध्ये ते मद्रास विधानसभेचे सदस्य व कागारमंत्रीही झाले. १९४६ पर्यंत ते मंत्रिपदी राहिले.

      भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच त्यांची सिलोनमधील (आताची श्रीलंका) भारतीय उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली. १९५१ मध्ये ते संसदेवर गेले व पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कामगारमंत्री झाले. १९५७ नंतरची दहा वर्षे ते उत्तर प्रदेश, केरळ व म्हैसूर राज्यांचे राज्यपाल झाले. १९६७ मध्ये त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. पुढे दोनच वर्षांत तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांचे निधन झाले व गिरी हंगामी राष्ट्रपती बनले.

       या काळात काँग्रेसमध्ये दुहीचे वारे वाहू लागले होते. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना न जुुमानणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेसजनांचा वेगळा गट तयार झाला होता. १९६९ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी दिली. त्याला शह म्हणून इंदिराजींनी गिरींना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले व ते विजयीही केले. अशा तऱ्हेने केवळ राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून गिरींच्या गळ्यात देशाच्या सर्वोच्च पदाची माळ पडली.

    २४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४अशी पाच वर्षे ते राष्ट्रपती होते. या काळात त्यांनी केवळ इंदिरा गांधींचे 'हुकुम' पाळले. त्यांच्याच आदेशानुसार त्यांनी तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री चरण सिंह यांचे सरकार बरखास्त केले व संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याच्या वटहुकुमावर रातोरात स्वाक्षरीही केली. हा वटहुकूम वादग्रस्त होता कारण या संबंधातील दुरुस्ती राज्यसभेने त्यापूर्वीच फेटाळलेली होती. सेवाज्येष्ठता डावलून न्या. अजित नाथ रे यांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनवू नये, अशी गिरींची इच्छा होती. पण इंदिरा गांधींनी तिचा मान ठेवला नाही. रेल्वे कामगारांची पहिली देशव्यापी युनियन त्यांनी बांधली खरी, पण ते राष्ट्रपती असतानाच रेल्वे कामगारांचा राष्ट्रव्यापी संप सरकारने चिरडून टाकला. गिरी निमूटपणे पहात बसले.

    १९७२ मध्ये गिरींनी एकतर्फी निर्णय घेऊन इंदिरा गांधींना `भारतरत्न' बहाल केले. त्याची परतफेड इंदिरा गांधींनी गिरींना १९७५ मध्ये `भारतरत्न' देऊन केली.

     गिरींचे २४ जून १९८० रोजी मद्रासमध्ये ह्रदयविकाराने निधन झाले. त्याच्या आदल्याच दिवशी दिल्लीत संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाल्याने गिरींच्या मृत्यूला वर्तमानपत्रांतही फारशी जागा मिळाली नाही.

    स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात गिरींनी वकिली सोडून उडी घेतली व तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवासही भोगला. १९२७ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ)च्या परिषदेसाठी ते भारतीय कामगारांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिले व लंडनला दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी भारतीय श्रमजीवींची भूमिका ठामपणे मांडली. १९४२च्या `छोडो भारत' चळवळीच्या काळातही यांना ब्रिटिशांनी अटक करून वेल्लोर व नंतर अमरावतीच्या तुरुंगांत डांबले. स्वतंत्र भारतात कामगारमंत्री म्हणून औद्योगिक तंटे सोडवण्यासाठी त्यांनी एक सूत्र तयार केले. ते "गिरी अॅप्रोच" म्हणून प्रसिद्ध झाले व आजही ते वापरले जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁सोमवार ~ 24/06/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment