*24/09/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *24. सप्टेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद कृ.७, पक्ष :कृष्ण पक्ष, 
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~मृगशीर्ष, 
योग ~व्यतीपात, करण ~बव, 
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:32,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━
24.  *काम केल्याने माणूस मरत नाही, तो आळसानेच मरतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
24.  *दुष्काळात तेरावा महिना –*
 ★ अर्थ ::~ संकटात अधिक भर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
24. *विद्या राजसु पूज्यते ।*
            ⭐अर्थ ::~
 विद्या राजाच्या ठिकाणी पूजिली जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
  🛡 *★ 24. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक कर्णबधिर जागरूकता दिन
★ हा या वर्षातील २६७ वा (लीप वर्षातील २६८ वा) दिवस आहे.
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७	:	 भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 'टी २० विश्वकरंडक' जिंकला.
●१९९५	:	गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
●१९९४	:	’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.
   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४०	:	आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू 
◆१९२४	:	गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष 
◆१९२१	:	डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ’तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. 
◆१९१५	:	प्रभाकर शंकर मुजूमदार – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत, 
◆१८८९	:	केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, 
◆१८६१	:	मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. 
    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२	:	श्रीपाद रघुनाथ जोशी – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक 
●१९९८	:	वासूदेव पाळंदे – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक. 
●१९९२	:	सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
24.  *✸ नव्या युगाची गाणी ✸*
    ●●●●००००००●●●●
एकमुखाने चला गाऊ या, गाणी नव्या युगाची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची
सा म्हणतो साथी आपण, भेदभावना दूर करा
रे म्हणतो रेंगाळु नका रे, सदैव अपुले काम करा
निर्धाराने पुढे जाऊ या, पर्वा करू ना कोणाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||१||
ग म्हणतो गर्व मिरवुनी, सर्वनाश कुणी करू नका
म म्हणतो महान सुंदर, मानवतेचा मंत्र शिका
प म्हणतो परिश्रमाने, फुलवा ज्योत यशाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||२||
ध म्हणतो जगात केवळ, समानता हा धर्म खरा
नि म्हणतो निर्मळतेचा, मनी वाहू द्या नित्य झरा
सा म्हणतो सामर्थ्याने, उजळा उषा उद्याची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||३||
                     ~ वंदना विटणकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
24. *❂ सर्वात्मका सर्वेश्वरा ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारिता दुरिता हरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
24.  *❃❝ राजाची महानता ❞❃*
  ━━•●◆●★★●◆●•━━
     भोजराजा महादानी आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याच्या उदारपणाच्या अनेक कथा त्याच्या राज्यापासून अन्य राजातही प्रसिद्ध होत्या. याच कारणांमुळे तो बहुसंख्य लोकांचे श्रद्धास्थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने तत्क्षणी आपल्या दिवाणास निमंत्रित करून त्याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा स्मशानस्थळी घेऊन जाल तेव्हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा करा. ते दोन्ही हात सर्व लोकांना असे दाखवतच घेऊन जा. भोज राजाची ही इच्छा दिवाणास मोठी विचित्र वाटली. त्याने विचारले, महाराज असे करण्यासाठी तुम्ही का सांगता आहात. राजा म्हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजणच रिकाम्या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्ट्य म्हणजे की व्यक्तिसोबत जे जाते ते त्याचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
24. *"जन्म हा एका थेंबासारखा असतो,*
*आयुष्य एका ओळीसारखं असतं,*
*प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण*
*मैत्री असते ती वर्तुळासारखी,*
*ज्याला कधीच शेवट नसतो*
   वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु *चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
24. *✿महत्त्वपूर्ण सामान्य माहिती✿*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
■ 'इंडियन सोशालिस्ट' वृत्तपत्र कोण चालवित असत ?
*~ श्यामजी कृष्णा शर्मा*
■ आसोलामेंढा सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*~ चंद्रपूर*
■ जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो ?
*~ पोलीस अधीक्षक*
■ महाराष्ट्रात 'मालवणी' ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?
*~ कोकण*
■ ग्लुकेमिया आज़ार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
*~ डोळा*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂* 
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
24. ❒मॅडम भिकाजी रुस्तुम कामा❒
    ━═•●◆●★★●◆●•═━
*●जन्म :~ २४ सप्टेंबर १८६१*
●मृत्यू :~ १३ ऑगस्ट १९३६
    या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁मंगळवार ~24/09/2024❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment