"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*24/10/24 गुरूवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/p/blog-page_861.html
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *24.ऑक्टोबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.८, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~पुष्य,
योग ~साध्य, करण ~बालव,
सूर्योदय-06:35, सूर्यास्त-18:09,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
24. *कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

24.    *उंटावरचा शहाणा –*
   ★ अर्थ ::~  मूर्ख सल्ला देणारा..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
24. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
           ⭐अर्थ ::~
   क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 ★ 24. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★संयुक्त राष्ट्रसंघ दिन
★हा या वर्षातील २९७ वा (लीप वर्षातील २९८ वा) दिवस आहे.
★जागतिक पोलिओ निर्मूलन दिन
★जागतिक माहिती विकास दिन  ★World Development of Information Day

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला.
●१९९७ : सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
●१९८४ : भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
●१९४५ : संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७२ : रीमा लांबा ऊर्फ ’मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल
◆१९२१ : रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी
◆१९१४ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
◆१७७५ : बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक. ’सीमा’, ’बरसात कीरात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती.
●१९९५ : माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष
●१९९२ : अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24.  *✸ गाउ त्यांना आरती ✸*
       ●●●●●००००००●●●●●
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाउ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाउ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्‍तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाउ त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाउ त्यांना आरती

देह जावो, देह राहो, नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाउ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाउ त्यांना आरती

नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृति, गा तयांची आरती."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]     ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *❂ मुखी तुझे नाम राहो ❂*
     ━━═●✶✹★★✹✶●═━━
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतिहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

24.  *❃❝ साधू आणि यक्ष ❞❃*
     ━━•●◆●★★●◆●•═━
   एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

24. *"मित्र "गरज म्हणून नाही..तर सवय म्हणून जोडा..!!*                                               *कारण गरज संपते..पण "सवयी "कधीच सुटत नाहीत...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

*24.✿सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
➜ महाराष्ट्र.

✪ NCC चे घोषवाक्य काय आहे ?
➜ एकता व अनुशासन.

✪ स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
➜ ३० मार्च १९८५.

✪ पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
➜ मज्जासंस्था.

✪ संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
➜ नारायण सूर्याजीपंत ठोसर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

24. *❒ ♦ मा. मन्ना डे ♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १ मे १९१९
●मृत्यू :~ २४ ऑक्टोबर २०१३

    मा. मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे,  यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली. मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस" मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही  चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला.  शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी  असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमार बरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.

     मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही  मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. *मा. मन्ना डे* यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
              *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार~24/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment