*24/11/24 रविवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *24. नोव्हेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.९,-पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~वैधृति, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:51, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
24. *काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
24. *दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ*
★ अर्थ ::~ दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
24. *यतो धर्मस्ततो जयः ।*
⭐अर्थ ::~
जिथे धर्म तिथेच विजय असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 24. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★उत्क्रांती दिन
★हा या वर्षातील ३२८ वा (लीप वर्षातील ३२९ वा) दिवस आहे.
★महिला दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
●१९९२ : कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर
●१९९२ : देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला ‘कवी माधव पुरस्कार‘ जाहीर
●१७५० : महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६१ : अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
◆१९५५ : इयान बोथॅम – इंग्लंडचा क्रिकेटपटू
◆१९१४ : लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली.
◆१८९४ : हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका
●१९६३ : महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
●१६७५ : गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
24. *✸ देशारक्षणा चला ✸*
●●●●००००००●●●●
चला चला चला,पुढे पुढे चला
देशारक्षणा चला,न मागुती वळा||धृ||
बालवीर हे ,सिंह छातीचे
ताठ मान ही,हात बाजीचे ||१||
हिमालयावरी चढून जाऊ या
ध्वज तिरंगी हा,सदैव रक्षू या ||२||
हाक मारीता कोणी,त्या क्षणी
रणात ठाकू या,शस्त्र घेऊनी ||३||
भीती ही मनी,आमुच्या नसे
विजय शेवटी,आपुला असे ||४||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
24. *❂ तुझिया चिंतनात ❂*
━━═●✶✹★✹✶●═━━
त्या तुझिया चिंतनात मन माझे गुंतु दे
गीताच्या एकसरी भावफुले गुंफु दे
श्रवणी ये नाम जसे
मूर्ती पुढती विलसे
रूप मनी आठवुनी नित्य तुला पाहु दे
भाव एक नवनवा
गंध धुंद करि जिवा
जीवशीव संगतीत मन कलिका उमलूदे
छंद तुझा क्षणोक्षणी
बरवा मज दिनरजनी
गीत तुझे आळवूनी तुजसाठी गाउ दे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
24. *❃❝ हरणाची चतुराई ❞❃*
━━•●◆●★●◆●•═━
एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्या सहका-यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्या हरणाने आपल्या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्या बळी पडून फळे खाण्यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्याचे म्हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
आजच्या काळात कोणी जर आपल्याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्याचे ऐकायला हवे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
24. *टिपावं* तर अचूक टिपावं, *नेम तर सारेच* धरतात..ll
*शिकावं तर माफ* करायला, *राग* तर सगळेच करतात..ll
*खळगी भरावी* तर उपाशी पोटाची, *पोट भरुन* तर सारेच जेवतात..ll
*जगावं तर इतरांसाठी,*
*स्वतःसाठी तर* सगळेच जगतात..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
24. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीने 'पेमेंट बॅंक सेवा' सुरू केली आहे ?
➜ एअरटेल.
✪ देशात वीजनिर्मितीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो ?
➜ हिमाचल प्रदेश.
✪ निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?
➜ गिधाड.
✪ देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकादमीचे अध्यक्ष कोण ?
➜ न्या.अरूण चौधरी.
✪ सार्क ( SAARC ) म्हणजे काय ?
➜ द साउथ एशियन असोसियशन फाॅर रिजनल को-ऑपरेशन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
24. *❒ ♦अरुंधती रॉय♦ ❒*
━═•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ २४ नोव्हेंबर १९६१
या साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. "द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज" या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे.
♦ पार्श्वभूमी आणि जीवन
अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, मेघालय येथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत. दुसरे पती चित्रपट निर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले.
♦ साहित्यिक कारकीर्द
कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात अरुंधती रॉय यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी काम केले, इन विच एनी गिव्ह्ज इट दोज वन्स (१९८९) या स्वानुभावावर आधारित चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. इलेक्ट्रिक मून (१९९२) ची पटकथाही त्यांनी लिहिली. शेखर कपूर यांच्या बँडिट क्वीन या चित्रपटावर केलेल्या टीकेने अरूंधती रॉय यांची ''द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज" ही कादंबरी १९९२ मध्ये त्यांनी लिहायला सुरूवात केली आणि १९९६ मध्ये त्यांनी ती पूर्ण केली. या आत्म चरित्रात्मक कादंबरीने १९९७ चा बुकर पुरस्कार प्राप्त केला आणि त्यावर्षीच्या नोंद घेण्याजोग्या पुस्तकां मध्येही त्यांच्या या कादंबरीला स्थान मिळाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*◆रविवार ~24/11/2024◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment