"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*25/02/19 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 25/02/2019 ❁*
      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

     https://goo.gl/1P9Uo4
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *25. फेब्रुवारी:: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
               माघ कृ. ७
     तिथी : कृष्ण पक्ष सप्तमी,
           नक्षत्र : विशाखा,
      योग : ध्रुव, करण : विष्टी,
सूर्योदय : 07:01, सूर्यास्त : 18:42,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

25.  *ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25. *थेंब थेंब तळे साचे*
      *★ अर्थ ::~*
-थोड्या बचतीमधून मोठा संचय होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

25. *गतस्य शोचनं नास्ति ।*
     ⭐अर्थ ::~ भूतकाळातील
   गोष्टींविषयी चिंता करू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *25. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ५६ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : ’स्वर्गदारा’तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला.
●१९६८ : मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१५१० : पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री
१९४८ : डॅनी डेंग्झोप्पा – चित्रपट अभिनेते
◆१८९४ : अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते.
◆१८४० : विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख  इ. लेखन केले व मराठी बालवाङ्‌मयाचा पाया घातला.

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१८ : अभिनेत्री श्रीदेवी – चित्रपट अभिनेत्री, पद्मश्री पुरस्कार प्राप्त
●२००१ : सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला.
●१९९९ : ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
●१९६४ : शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री
●१५९९ : संत एकनाथ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *✸  ऐ मेरे प्यारे वतन ✸*
     ●●●●●००००००●●●●●
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान

माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान

छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
                   ~प्रेम धवन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

25. *❂ सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा

हो‍ऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25. *❃ श्री स्वामी समर्थ ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे घड्याळ  धान्याच्या कोठारात हरवले आहे. 

    जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला  अफाट  भाावनिक मूल्य होते.

    बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना. मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ  शोधून देईल,त्याला बक्षिस मिळेल.....

    बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला  लागली पण त्यांना घड्याळ  कुठेही सापडेना.

   नेमके जेंव्हा त्या शेतकर्‍याने घड्याळाचा  शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्‍याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला.

    शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...!  हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी........"

    शेतकर्‍याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठाराट पाठवले. 

   थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला. शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले.........!

    त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले...!!

    मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केल, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो. त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
*एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.*
    तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरीशांतता द्या आणि मग पहा, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचं जीवन कसे सजवते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
 ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

25. "जलबिंदू वेगळा झाला आणि स्वत:ला समुद्र मानू लागला तर तो वाळवंटासारखा शुष्क होईल;
पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला तर तो स्वत: समुद्र होऊन जाईल."
"एकत्र येणे म्हणजे प्रारंभ,
एकत्र राहणे ही प्रगती व एकत्र चिकाटीने आणि सातत्याने काम करीत राहणे हेच यशाचे गमक आहे."


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

25. *जगातिक स्थळांची टोपननावे*
         ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
★ *लवगांचे बेट*
◆~ झांजीबार
★  *गुलाबी शहर*
◆~ जयपूर
★ *खड़काळ शहर*
◆~ अँबरडीन
★ *पायाखालील प्रदेश*
◆~ ऑस्ट्रेलिया
★ *पाच नदयाचा प्रदेश*
◆~ पंजाब
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25 . *❒ ♦अभिनेत्री श्रीदेवी♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
बॉलिवूड मधील अभिनेत्री अनेक चित्रपटातून खूप सुंदर अभिनय करणाऱ्या सिनेसृष्टीत एक काळ दबादबा होता. श्रीदेवीचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
  *यांच्या प्रथम स्म्रुतीदिनानिमीत्त*
       *विन्नम्र अभिवादन..!!*
    🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

●जन्म :~ १३ ऑगस्ट १९६३
*●मृत्यू :~ २५ फेब्रुवारी २०१८*

    श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती.
बालकलाकार म्हणून श्रीदेवीने चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. वयाच्या चौथ्या वर्षी तिने तमिळ चित्रपटात काम केलं होतं. १९६७ साली तिला एका मल्याळम चित्रपटातील भुमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता. १९७५ साली तिने ज्युली चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. *अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल २०१३ साली भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.* तिला ६ वेळा हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भुमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदमा, चांदनी, इंग्लिश विंग्लिश आणि मॉमसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार न मिळाल्याने तिच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली होती. मॉम हा श्रीदेवीचा शेवटचा हिंदी चित्रपट होता.

    बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केले.

     निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

    श्रीदेवी तिचा नवरा बोनी कपूर आणि लहान मुलगी 'खुशी' सोबत दुबईला मोहीत मारवाह याच्या लग्न समारंभासाठी गेली होती.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे २५ फेब्रुवारी २०१८ ला शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. दुबई मधील प्रशासकीय कार्यवाही साठी तीन दिवसांचा कालावधी लागला त्यामुळे अंतिम संस्कार दिनांक २८/०२/२०१८  बुधवारला शोकाकुल सर्व अभिनेते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा, यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ सोमवार ~ 25/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment