"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*25/08/24 रविवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *25. ऑगस्ट:: रविवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण कृ.७, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~भरणी,
योग ~ध्रुव, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:22, सूर्यास्त-18:58,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

25. *भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25.    *पी हळद हो गोरी –*
★ अर्थ ::~  उतावळेपणा दाखविणे


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25.   *न मातु: परं दैवतम् ।*
            ⭐अर्थ :: ~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 *★ 25. ऑगस्ट ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २३७ वा (लीप वर्षातील २३८ वा) दिवस आहे.   
  
         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर
●१९९१ : एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
●१९१९ : जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस या शहरांदरम्यान सुरू झाली.
●१६०९ : गॅलेलिओ गॅलिली याने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६२ : डॉ. तस्लिमा नसरीन – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका
◆१९२३ : गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
   ◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●२०१२ : नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव
(जन्म: ५ ऑगस्ट १९३०)
●२००१ : डॉ. वसंत दिगंबर तथा व. दि. कुलकर्णी – संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक.
●२००० : कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार
●१९०८ : हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
●१८१९ : जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25.  *✸ भारत देश महान ✸*
     ●●●●●००००००●●●●●
भारत देश महान अमुचा
भारत देश महान
स्फूर्ती देतील हेच आमुचे
राम कृष्ण हनुमान ll धृ ll

व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुख समृद्धी निधान ll १ ll

चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान ll २ ll

धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सिमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान ll ३ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *❂ गगन, सदन तेजोमय ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून, तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25.  *❃❝ माणुसकीचा झरा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्याीच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठठीतील मजकूर असा होता.

    ‘माझी 50 रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’

   त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ’ अशी खुण पण सांगीतली होती.

    त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.

   ‘आजी मला तुमची 50 रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.

   ‘कमाल आहे! माझी हरवलेली 50 रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत 40 माणसे येऊन गेली. तु 41 वा आहेस!’ आजी म्हणाल्या.

‘तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.
‘मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.

     ‘एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा!’ आजी म्हणाल्या.

    ‘नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.

    ‘कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या

‘माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.
‘हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.

     ‘अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक’ असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.

     परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.

      त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले 50 रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.

      ‘माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.

     तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्याेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!

   अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25.      *शिक्षक आणि ड्रायव्हर*
       *दोघांत एक साम्य आहे...*
  *स्वतः जिथे आहे तिथेच राहतात.*
       *परंतु दुसऱ्यांना मात्र*
*त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवतात...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜ पुणे.

✪  मानवाच्या प्रत्येक डोळ्यात किती स्नायू असतात ?
  ➜ ६ स्नायू.

✪  गेटवे आॅफ इंडिया कोणत्या शहरात आहे ?
  ➜ मुंबई.

✪  जगातील क्षेत्रफळाने मोठा असलेला देश कोणता ?
  ➜ रशिया.

✪  राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कोठे आहे ?
  ➜ जयपूर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25. *❒ ♦नील आर्मस्ट्राँग♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       *चंद्रावर पाउल ठेवणारा* 
        *जगातील पहिला मानव*

●जन्म :~ ५ ऑगस्ट, १९३०
*●मृत्यू :~ २५ ऑगस्ट २०१२*

      *◆ नील आर्मस्ट्राँग ◆*
    हा एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.
नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.

नील आर्मस्ट्राँग ...., चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव

   पण तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं? अनेकांना हे ठाऊक नाही .... मला ही माहीत नव्हतं !!

   ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन, अपोलो मिशन चा पायलट. तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.

      नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता. त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.

     जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला ,
         "Pilot First".
      पण एडविन थबकला,
"काय होईल पुढे ",
"मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे..."
हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा ...

     मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले ...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला ...!!

*मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला...!!*

     आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा ... घाबरण्याचा ... संकोचाचा ... लाजाळुपणाचा ... तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो ...!!

     अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात पण आपण विचारायला घाबरतो, अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाला दाद द्यायला चुकतो, आणि कदाचित अनेकजण हा संदेश पुढे पाठविण्यात ही चालढकल करतील...!!

     जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो... अडखळलो... घाबरलो... , तर बहुधा आपण फार मोठी चुक करीत आहोत नाही का ...???
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ रविवार~25/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment