"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*25/09/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *25. सप्टेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद कृ. ८, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~वरीयान्, करण ~कौलव,
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:31,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣━┅━

25. *काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

25. *काळ्या दगडावरची रेष*
★ अर्थ ::~ कधीही न बदलणारी गोष्ट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

25.  क्षणश: कणशश्चैव विद्याम्
      अर्थम् च साधयेत् |
        क्षणे नष्टे कुतो विद्या,
      कणे नष्टे कुतो धनम् ||
⭐अर्थ ::~ क्षणोक्षणी मिळवा विद्या,
        कणाकणानी संपदा
        क्षण सरता कुठे विद्या,
        कण सरता कुठे धन?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 25. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील २६८ वा (लीप वर्षातील २६९ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४१ : ’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.
●१९२९ : डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
●१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६९ : हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान
◆१९४६ : बिशन सिंग बेदी – फिरकी गोलंदाज
◆१९२६ : बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक
◆१९२५ : रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार
◆१९२२ : *बॅ. नाथ पै* – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू: १७ जानेवारी १९७१ - बेळगाव)
◆१९२० : सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष
◆१९१६ : पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : शं. ना. नवरे – लेखक
●२००४ : अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी
●१९९८ : कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣━┅━

25. *✸ पाऊल पुढेच टाका ✸*
   ●●●●००००००●●●●
झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका

तोंड लागले आज लढ्याला
चहूबाजूंनी येईल घाला
छातीवरती शस्‍त्रे झेला
फिरू नका रे डरू नका, डरू नका

शपथ तुम्हाला शिवरायाची
मराठमोळ्या मर्दुमकीची
समर्थ गुरु केसरी टिळकांची
विजयाच्या या ऐका हाका, ऐका हाका

निशाण अपुले उंच धरा
शूरपणाची शर्थ करा
कराच किंवा रणी मरा
बहाद्दरांनो मरणा जिंका, मरणा जिंका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

25. *❂ सत्यम शिवम् सुन्दरम ❂*
   ━═●✶✹★★✹✶●═━
इश्वर सत्य है
सत्य ही शिव है; शिव ही सुन्दर है
जागो, उठ कर देखो

जीवन ज्योत उजागर है
सत्यम शिवम् सुन्दरम...

राम अवध में, काशी में शिव,
कान्हा वृन्दावन में,
दया करो प्रभु, देखूं इनको
हर घर के आंगन में
राधा मोहन शरणम
सत्यम शिवम् सुन्दरम...

एक सूर्य है, एक गगन है,
एक ही धरती माता,
दया करो प्रभु, एक बने सब
सब का एक से नाता
राधा मोहन शरणम
सत्यम शिवम् सुन्दरम...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

25.  *❃❝ मोठेपणाचे दुःखे ❞❃*  ━═•●◆●★★●◆●•═━
    एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच लहान आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूड तोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

25.  *भाग्य*  आपल्या हातात नाही, पण  *निर्णय*  आपल्या हातात आहेत.  *भाग्य*  आपले  *निर्णय*  बदलू शकत नाही. पण  *निर्णय*  आपली  *परिस्थिती*  बदलू शकतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
  25. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
➜पु. ल. देशपांडे.

✪  संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?
➜राज्यसभा.

✪  भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ?
➜२६ जानेवारी १९५०.

✪  विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०१९ कोणत्या देशाने जिंकली ?
➜इंग्लंड.

✪ जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
➜११ जुलै
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

25.  *❒  नाथ बापू पै  ❒* 
   ━━•●◆●★●◆●•═━
  स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि
        निष्णात घटनातज्ञ     
*●जन्म :~ २५ सप्टेंबर १९२२, वेंगुर्ले*
●मृत्यू :~ १८ जानेवारी १९७१

              ◆ नाथ बापू पै ◆
    🔶आई तापी आणि वडीलबंधू अनंत (भाई) यांच्या संस्कारांचा नाथांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत मोठा वाटा होता. संस्कृत, मराठी, इंग्रजी या भाषांवर त्यांनी लहानपणीच प्रभुत्व मिळविले व वक्तृत्वगुणाचाही परिपोष केला. विल्यम शेक्सपिअर, पर्सी शेली, जॉर्ज बायरन इत्यादींच्या साहित्याचे आणि विदग्ध संस्कृत वाङ्मयाचे परिशीलनही त्यांनी केले होते. हे स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ञ होते.

    🔷महाविद्यालयात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. तत्कालीन भूमिगत चळवळींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. टपाल-कचेऱ्या लुटणे, पोलीस-कचेऱ्यांवर हल्ला करणे इ. कारणा साठी त्यांच्यावर त्यावेळी खटले भरण्यात आले. तुरुंगातील बेदम मारामुळे त्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम झाला. १९४६ च्या प्राथमिक शिक्षकांच्या संपात, तसेच गोवामुक्ती आंदोलनात ते सहभागी झाले. १९४७ साली ते इंग्लंडला गेले. तेथील इंटरनॅशनल नाथ पैनाथ पै युनियन ऑफ सोशॅलिस्ट यूथचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते. गोवामुक्तीसाठी रोममध्ये पोर्तुगीज वकिलातीसमोर त्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली होती. ज्ञानसंपन्नत्ता व अखंड व्यासंगीवृत्ती तसेच गरिबा विषयीची कळकळ, हे त्यांचे स्थायीभाव होते. बेळगावच्या प्रश्नावर त्यांनी सतत लढा दिला. साराबंदी चळवळीत प्रामुख्याने भाग घेतले (१९६०). त्याच वर्षीच्या सरकारी नोकरांच्या संपाचे ते प्रमुख होते. त्यात त्यांना अटक झाली.

    🔶 लोकसभेत त्यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भयपणा व चिकित्सक अभ्यास हे गुण दिसून येत. सुसंस्कृत राजकारणी (जंटलमन पोलिटिशिअन) अशा शब्दांत पं. नेहरूंनी त्याचा गौरव केला आहे.

    🔷जगातील अनेक राष्ट्रांच्या राज्यघटनांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. गोलकनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध लोकसभेत त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. ‘ज्या घटनेत दुरुस्ती होऊ शकत नाही, ती मृतवत होय’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधेयकाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. रोजगारी हा मूलभूत हक्क आहे आणि तो देता येत नसेल, तर सरकारने बेकारी भत्ता मंजूर करावा, असेही एक विधेयक त्यांनी मांडले होते. आणि आणीबाणीत न्यायालयात दाद मागता येत नाही, म्हणून घटनेतील त्या संबंधीचे ३५९ वे कलम रद्द करावे, असेही विधेयक त्यांनी मांडले. आपली वाणी व बुद्धी त्यांनी जनहितासाठी राबविली. शासनसत्तेचे अधिष्ठान तत्त्वतः लोकशक्तीत असते, अशी त्यांची धारणा होती. कोकण रेल्वे व कोकण विकासासाठी ते आयुष्यभर झगडले.
     🔶लोकसभेत त्यांनी केलेली भाषणे उल्लेखनीय आहेत (१९५६). अशी त्यांची अत्यंत महत्त्वाची निवडक भाषणे लोकशाहीची आराधना (१९७२) या पुस्तकात संग्रहीत केलेली आहेत. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी १९७१ रोजी ते बेळगावला गेले. तेथील सभेत भाषण झाल्यावर हृदयविकाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁बुधवार ~25/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment