*25/10/24 शुक्रवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *25.ऑक्टोबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.९, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~पुष्य,
योग ~शुभ, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:36, सूर्यास्त-18:08
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
25. *धावत्या पाण्याला अचूक मार्ग सापडतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे--
*★अर्थ ::~*
पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
⭐अर्थ :: ~
उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🔵🟢🔴
🛡 ★ 25. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २९८ वा (लीप वर्षातील २९९ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्यांदा मिळाले.
●१९९४ : ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९५१ : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४५ : अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका
◆१९३७ : डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते
●२००३ : पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. अवघ्या वीस सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला.
●१९५५ : पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’ ही त्यांनी गायलेली अत्यंत लोकप्रिय गाणी
●१६४७ : इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. *✹भारत देश है मेरा✹*
●●●●●००००००●●●●●
जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
जहाँ सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा
ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा
अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले
कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा
वो भारत देश है मेरा
जब आसमान से बातें करते मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. *❂ सर्वेश्वरा शिवसुंदरा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना
सुमनात तू, गगनात तू
तार्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना
श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन् गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. *❃❝ दोन वाटसरू ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
दोन वाटसरू रस्त्याने बरोबर चालले असता, त्यापैकी एकाला रस्त्यावर पडलेली एक पैशाची पिशवी सापडली. ती उचलून घेऊन तो आपल्या सोबत्याला म्हणाला, 'अरे, ही पहा मला पैशांची पिशवी सापडली.' त्यावर सोबती म्हणाला, 'अरे, 'मला सापडली' असं का म्हणतोस ? 'आपल्याला सापडली' असं म्हण. आपण दोघं बरोबर चाललो आहोत, तेव्हा लाभ किंवा हानी जे काय होईल ते दोघांचं.' हे ऐकून पिशवी सापडलेला वाटसरु म्हणाला, 'हो तर ! मला सापडलेल्या धनाचा वाटा मी तुला काय म्हणून देऊ?' मग ते दोघे काहीसे पुढे गेले. तोच ज्याची पिशवी हरवली होती तो माणूस सरकारचे शिपाई घेउन त्यांच्यामागून शोध करीत आला. त्याला पाहून पिशवी सापडलेला वाटसरू आपल्या सोबत्यास म्हणाला, 'मित्रा, आपण फार वाईट गोष्ट केली.' सोबत्याने लगेच उत्तर दिले, बाबा रे आता आपण फार वाईट गोष्ट केली.' असं का म्हणतोस ? 'मी फार वाईट गोष्ट केली' असं म्हण. जर तू मला तुझ्या सुखाचा वाटेकरी केलं असतंस तर मीही तुझ्या दुःखाचा वाटेकरी झालो असतो.'
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
सुखाच्या वेळी कोणाला विचारणार नाही, पण संकटाच्या वेळी मात्र लोकांनी मदत केली पाहिजे अशी समजूत असणे मूर्खपणाचे होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. *"जन्म हा एका थेंबासारखा असतो,*
*आयुष्य एका ओळीसारखं असतं,*
*प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण*
*मैत्री असते ती वर्तुळासारखी,*
*ज्याला कधीच शेवट नसतो*
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु *चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. *✿संशोधक व लावलेले शोध✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▪ रिव्होल्व्हर ➜ सॅम्युअल कोल्ट
▪ मशीनगन ➜ रिचर्ड गॅटलिंग
▪ वाफेचे इंजिन ➜ जेम्स वॅट
▪ टेलिफोन ➜ अलेक्झांडर ग्राहम बेल
▪ थर्मामीटर ➜ गॅलिलिओ
▪ सायकल ➜ मॅक मिलन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. *❒ पांडुरंगशास्त्री आठवले ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. *यांच्या स्म्रुतीदिनानिमीत्त*
*विन्नम्र अभिवादन..!!*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
◆पुर्ण नाव :~पांडुरंग वैजनाथ आठवले
●जन्म :~ १९ ऑक्टोबर १९२०
रोहा, महाराष्ट्र
●निर्वाण :~ २५ऑक्टोबर २००३
मुंबई, महाराष्ट्र
◆ पांडुरंगशास्त्री आठवले ◆
हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.
🎯 *जीवन* 🎯
पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म ऑक्टोबर १९, १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worship & way of thinking याचा विचार सतत दिला.
🏆 *पुरस्कार* 🏆
इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमणियम म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीत राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमान आशेचा किरण आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁शुक्रवार~25/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment