25/12/24 बुधवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *25. डिसेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.१०, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~चित्रा,
योग ~अतिगण्ड, करण ~वणिज,
सूर्योदय-07:09, सूर्यास्त-18:08,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
25. *मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. *काळ्या दगडावरची रेष*
*★ अर्थ ::~*
-कधीही न बदलणारी गोष्ट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
25. *भावे हि विद्यते देव: ।*
⭐अर्थ :: ~ भाव तेथे देव.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 25. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३५९ वा (लीप वर्षातील ३६० वा) दिवस आहे.
★ ख्रिसमस डे : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
●१९७६ : ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆ १९४९ : नवाझ शरीफ –
पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
◆१९३२ : प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
◆१९२७ : पं. रामनारायण – सुप्रसिद्ध सारंगीये
◆१९२६ : डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार
◆१९२६ : चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
◆१९२४ : अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
(मृत्यू :~ १६ ऑगस्ट २०१८)
◆१९१९ : नौशाद अली – संगीतकार
◆१९१८ : अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
◆१९११ : बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ
◆१८७६ : बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
◆१८६१ : पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
◆१६४२ : सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते
●१९९४ : ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (जन्म: ५ मे १९१६)
●१९७७ : चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते.
●१९७२ : चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित
●१९५७ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
27. *✸ माझ्या भारताचे गुण ✸*
●●●●००००००●●●●
माझा भारत महान
नाही लहान सहान
भुकेल्यांची भागवू रे
आम्ही भूकही तहान ।।धृ।।
मैत्री अशी निभवू रे
राहू प्रसंगी गहाण
शत्रू साठी सदा सज्ज
सारे जवान किसान ।।१।।
हिंदी आम्ही नका आम्हा
समजू रे हीन दीन
धन हृदयी आमुच्या
सदा शांती समाधान ।।२।।
आम्हावर आतिरेक
नाही बात ही आसान
अंत होताच शांतीचा
सोडू युध्दाचाही बाण ।।३।।
धर्म एक मानवता
आम्ही आहोत जाणून
शेती बाडी घरे बिरे
आम्ही पाहू मागाहून ।।४।।
काय सांगू आणखीन
माझ्या भारताचे गुण
सदा शांतीचा क्रांतीचा
इथे येतो जातो क्षण ।।५।।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
25. *❂ मन विजय करें ❂*
━━═●✶✹★✹✶●═━
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना..
भेदभाव, भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके,
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सकें,
झूठ से बचे रहें, सच का दम भरे
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना …
मुश्किलें पड़ें तो हम पे इतना कर्म कर
साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
25. *❃❝ महाराजा सत्यशील ❞❃*
━═•●◆●◆●◆●•═━
विजयगडचा राजा सत्यशील याला आपल्या उत्तराधिका-याचा शोध होता. मंत्र्याशी चर्चा केल्यावर त्याने म्हंटले,"आपले ४ पुत्र दयाशील, धर्मशील, कर्मशील आणि विवेकशील हे आहेत ना! मग आपण चिंता का करता?" राजा ने म्हटले," आमच्या कुळात केवळ योग्यतेनुसार राजा निवडला जातो." तेंव्हा मंत्र्याने त्याची योग्यता पारखण्याचा आग्रह केला राजाला ती गोष्ट योग्य वाटली. त्याने आपल्या चारही मुलांना अशा गावात पाठविले जिथे लोक दरोडेखोरांपासून त्रस्त होते. चौघेही तेथे गेले. विवेकशील सोडून इतर तिघेही गावातील मुख्य व्यक्तीच्या घरी थांबले. दयाशील गावात फिरायला निघाला तेंव्हा त्याने गावात दरोडेखोरांनी केलेली गावाची दुर्दशा पाहून त्याला दुःख झाले. त्याने त्या मुख्य व्यक्तीला बोलावून एका घरात आश्रम बनविला व सर्व त्रस्त लोकांना बोलावून त्यांची तेथे सेवा करू लागला. एके दिवशी दरोडेखोरांनी तो आश्रमही नष्ट करून टाकला. तेंव्हा तेथील लोकांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धैर्यशील याने त्या लोकांना धैर्याने थांबविले आणि तो आश्रम पुन्हा बांधला. एके रात्री परत दरोडेखोर आले तेंव्हा कर्मशीलच्या नेतृत्वाखाली लोक दरोडेखोरांशी लढले आणि दरोडेखोरांना पळवून लावले. त्या मुख्य व्यक्तीने आता हि शुभ वार्ता महाराजांना कळवण्याचा राजकुमारांकडे आग्रह धरला पण विवेकशील याचा कुठेच पत्ता नव्हता. तितक्यात विवेकशील तेथे आला आणि म्हणाला,"माझा उद्देश समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा होता. दरोडेखोराच्या आईवडिलांची हत्या मुख्य व्यक्तीने केली होती त्याचा बदला हे दरोडेखोर या गावाशी घेत होते. चूक त्यांची नाही तर मुख्य व्यक्तीची आहे. त्याला आधी तुरुंगात टाका." राजाने तशीच कारवाई केली व विवेकशील यालाच वारस नेमले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
विवेक सदगुणाच्या उपयोगाचे ज्ञान देत आहे. ते अन्य गुणांपेक्षा श्रेष्ठ आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
25. *राग एकटाच येतो,*
*पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो.*
*संयमसुध्दा एकटाच येतो,*
*पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो.*
*फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
25. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
*■ भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता?*
➜ अरवली
*■ भारतातील घरातील विज किती व्होल्ट ची असते ?*
➜ *220-230 V*
*■. SAARC चे मुख्यालय कोठे आहे ?*
➜ *काठमांडू*
*■ आंतराष्ट्रीय मानवधिकार दिवस कधी साजरा केला जातो ?*
➜ *10 डिसेंबर*
*■ 15 वे वित्त आयोग चे अध्यक्ष म्हणून 1 डिसेंबर 2017 रोजीनिवड करण्यात आली ?*
➜ *एन. के. सिंह*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. *❒ अटलबिहारी वाजपेयी ❒*
━━•●◆●★●◆●•═━
*●जन्म :~ २५ डिसेंबर १९२४*
ग्वाल्हेर, ग्वाल्हेर राज्य, ब्रिटिश भारत
●मृत्यू :~ १६ ऑगस्ट २०१८
●राजकीय :~ पक्ष भारतीय जनता पक्ष
अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि हिंदी कवी होते. यांची जयंती त्यानिमित्त त्यांना
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
*तेथे कर माझे जुळती ..!!*
🙏🥀🌷🌹🌷🥀🙏
*●राजकीय प्रवासाची सुरूवात●*
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्याम प्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला.त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.
देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होत राहिला. १९९५ च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५ च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६ च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
*★पंतप्रधान पद★*
*पहिली खेप* (मे १९९६)
१९९६ च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. सर्वस्वाचा त्याग करुन आयुष्यभर संघटनेला समर्पित झालेला हा कार्यकर्ता, 15 मे 1996 रोजी देशाचा पंतप्रधान झाला. राजकीय जीवनात अतिशय व्यस्त असूनदेखील अटलबिहारींनी आपले संवेदनशील मन जिवंत ठेवलं..
वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसात राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळलं.
*दुसरी खेप* (मार्च १९९८)
१९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८ च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर १९९८ च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेत वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते.
★ अणुचाचणी पोखरण ★
२ मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणार्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रात निर्बंध लादले. तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे याची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या चाचण्या लाभदायीच ठरल्या.
*★कारगील युद्ध★*
कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर -५० पर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौकीवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवली. यातल्या कित्येक सैनिक आणि अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रे ही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.
उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. चीनला भेट देउन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न शिताफीने उधळला.
*तिसरी खेप*
(ऑक्टोबर १९९९ - मे २००४)
१९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसर्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
*★पुरस्कार★*
१९९२, पद्मविभूषण पुरस्कार
१९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय
१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४, उत्क्रृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
२०१४, भारतरत्न
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~25/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment