"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*25/11/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *25. नोव्हेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.१०, पक्ष :कृष्ण पक्ष,
       तिथि ~दशमी,
   नक्षत्र ~उत्तराफाल्गुनी,
योग ~विष्कम्भ, करण ~वणिज,
सूर्योदय-06:51, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

25. *प्रेम सर्वावर करा, विश्वास थोड्या वर ठेवा, पण द्वेश मात्र कोणाचाच करू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25. *नव्याचे नऊ दिवस –* नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

25. *विद्यारत्नं महद्धनम् ।"*
            ⭐अर्थ ::~
विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 25. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★पर्यावरण जतन दिन
★हा या वर्षातील ३२९ वा (लीप वर्षातील ३३० वा) दिवस आहे.
★शाकाहार दिन

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
◆२००० : सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
◆१९९९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर
◆१९९१ : कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९२६ : रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश
●१८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार
●१८७९ : साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ
●१८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२०१३ : लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका. त्यांच्या ’स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ’नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला.
◆१९९८ : परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष
◆१९८४ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
(जन्म: १२ मार्च १९१३)
◆१९७४ : यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस
◆१९२२ : पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

25. *✸ स्मृती तुझीच जागु दे ✸*
      ●●●●००००००●●●●
चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागु दे॥धृ॥

गती मती द्युती तुझी आमुच्यात येउ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको अम्ही असू सदा खडे॥१॥

पाहुनी सभोवती दुःख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागिलीस संपदा
दंभ मोह् लाजले पाहता तुझ्याकडे॥२॥

चरण धुंद चालु दे वेग त्यास येउ दे
ध्येयमंदिरावरी दृष्टि अढळ राहु दे
कवच घालुनी स्मृती सिध्द संगरा खडे॥३॥

धूलिच्या कणांतुनी घोष हा उठे महा
स्पर्श होउनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूति सापडे॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

25. *❂ मुखी तुझे नाम राहो ❂*
   ━━═●✶✹★✹✶●═━━
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतिहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

25. *❃करडू, बोकड आणि लांडगा*
  ━━═•●◆●★●◆●•═━━
     एक करडू एका बोकडाबरोबर चरत असता तेथे एका लांडगा आला. करडास बोकडापासून दूर नेऊन मारून खावे, या हेतूने तो त्यास म्हणतो, ‘मुला, तू आपल्या आईस सोडून आलास, हा केवढा मूर्खपणा केलास बरे? तेथे तुला पोटभर दूध प्यावयास मिळाले असते; येथे या रानात तुझे पोट कसे भरणार? तू आपल्या आईकडे जात असलास, तर चल. मी तुझ्या सोबतीस येतो.’
करडू म्हणाले, ‘माझ्या जिवास काही अपाय होऊ नये म्हणूनच आईने मला या बोकडाबरोबर पाठविले आहे: आणि तू तर त्याजपासून मला दूर नेऊन मारून खाऊ इच्छितोस, तेव्हा तुम्हा दोघांपैकी मी कोणाचा विश्वास धरावा, हे तूच सांग बरे?’

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   *अपरिचीतांवर केव्हाही विस्वास ठेवु नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही*,
*शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं*,
      *चुकणं ही "प्रकृती"*
*मान्य करणं ही ' *संस्कृती* '
            *आणि*
*सुधारणा करणं ही "प्रगती "आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  भारताचा पहिला व्हाईसराॅय कोण होता ?
  ➜ लाॅर्ड कॅनिंग.

✪  'मित्रमेळा' ही संघटना कोणाशी संबंधित आहे ?
  ➜ वि.दा.सावरकर.

✪ 'इंडियन नॅशनल आर्मी' ची स्थापना कोणी केली ?
  ➜ रासबिहारी बोस.

✪  भारत सरकारने कोणत्या साली गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त केला ?
  ➜ १९६१.

✪  सरदार भगतसिंग,राजगुरू,
सुखदेव यांना कुठे व केव्हा फाशी देण्यात आली ?
  ➜ लाहोर,२३ मार्च १९३१.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

25. *❒ यशवंतराव चव्हाण ❒* 
━━═•●◆●★●◆●•═━━
    आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
    🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

●जन्म:~ १२ मार्च १९१३
        कराड, महाराष्ट्र, भारत
*●मृत्यू : ~ २५ नोव्हेंबर १९८४*

     *यशवंतराव बळवंतराव चव्हाण*
   हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
               कार्यकाळ
(१ मे १९६० ते १९  नोव्हें. १९६२)

     🔗त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्री सुध्दा होते.

    🔗चव्हाण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सक्रिय सहभागी होते . 1930 साली त्यांनी महात्मा त्यांनी स्वामी रामानंद भारती , भाऊराव , ( आप्पासाहेब ) आणि गोविंद वाणी संपर्कात आले या कालावधीत नेतृत्व नसलेल्या सहकार चळवळ त्याने सहभाग होते . मैत्री कायमचे तेथे खेळलेला . 1932 मध्ये सातारा मध्ये भारतीय ध्वज तुरुंगात 18 महिने शिक्षा ठोठावली होती.

   🔗चव्हाण त्याच्या B.A. मिळवता 1938 मध्ये मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र मध्ये . या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये गुंतलेली होती आणि लक्षपूर्वक काँग्रेस पक्ष आणि जसे जवाहरलाल नेहरू , सरदार पटेल आणि केशवराव म्हणून त्याच्या नेते, संबद्ध होती . 1940 मध्ये सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनले . 1941 मध्ये ते एल्.एल्.बि. पास झाले. 1942 साली त्यांनी जि सातारा मध्ये फलटण येथे वेनुताईशी लग्न केले.

   🔗त्यांनी मुंबई सत्र येथे एक 1942 मध्ये त्या बाहेर येण्याची भारत साठी कॉल दिला आणि त्यानंतर चळवळ त्याने सहभाग अटक करण्यात आली होती. चव्हाण शेवटी 1944 मध्ये तुरुंगात मधून प्रसिद्ध झाले.

    🔗इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंत रावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्री पदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

    *💥महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या.*
         
🔹- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

🔸- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

🔹- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

🔸- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

🔹- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

🔸- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

🔹- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*◆ सोमवार ~ 25/11/2024◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment