*प्रजासत्ताक दिन/गणराज्य दिवस*
*26/01/24 शुक्रवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *26. जानेवारी:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.१, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~पुष्य,
योग ~प्रीति, करण ~बालव,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:27,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
26. *चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*03 ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *26. जानेवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
*★भारतीय प्रजासत्ताक दिन*
★हा या वर्षातील २६ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७८ : महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू
*●१९५० : भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.*
●१९५० : एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
*●१९३३ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली. पुढे प्रत्यक्षात १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक स्वीकारली जाऊन तो दिवस "प्रजासत्ताक दिन"म्हणून साजरा होऊ लागला.*
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२५ : पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर
◆१८९१ : ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्हे – बडोद्याचे राजकवी, ’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१५ : रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण
●१९६८ : लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे
●१८२३ : एडवर्ड जेन्नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*04 ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
26. *जय जवान जय किसान*
●●●●●००००००●●●●●
एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !
अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !
शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्न देवी अन्नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !
अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*05 ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
26. ह्रदयात माझ्या तिरंगा
कर्मात माझ्या तिरंगा....
श्वासात माझ्या तिरंगा
नसांत माझ्या तिरंगा....
भासांत माझ्या तिरंगा
जगात माझ्या तिरंगा...
नभात माझ्या तिरंगा...
रंगात माझ्या तिरंगा.....
ढंगात माझ्या तिरंगा....
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*गणराज्यदिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*06 ] 💠महत्वपूर्ण दिवस💠*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
26. *❒ ♦प्रजासत्ताक दिन♦ ❒*
━━═•●◆●★●◆●•═━━
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
भारताचे संविधानात न्याय,स्वातंत्र्य, समता,बंधुता व राष्ट्रीय एकात्मता, अखंडता इत्यादी तत्वांचा स्वीकार केलेला आहे. संविधानामुळेच देशातील गोरगरीब सामान्य जनतेला न्याय व हक्क प्राप्त झाले.सर्वसामान्य माणसाची उन्नती व विकास झाला ही संविधाचीच देण आहे.
२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.
नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁शुक्रवार~26/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment