"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*26/03/24 मंगळवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *26. मार्च:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.1, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~हस्त,
योग ~ध्रुव, करण ~कौलव,
सूर्योदय-07:00, सूर्यास्त-18:42,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

26. * प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26. *भरंवशाच्या म्हशीला टोणगा –*
  ★ अर्थ ::~ पूर्ण निराशा करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26.  *विनयात् याति पात्रताम् ।*
   ⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★26. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक संगीतोपचार दिन
★ हा या वर्षातील ८५ वा (लीप वर्षातील ८६ वा) दिवस आहे.
★ बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन
    
    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना
●१९७४ : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात.
●१९७२ : नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
●१९४२ : इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह
●१९१० : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०९ : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक
◆१९०७ : महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. 

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी (जन्म: १० मे १९४०)
●२००८ : बाबुराव बागूल – दलित साहित्यिक
●२००३ : गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या
●१९९९ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
●१९९७ : नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *✸ शतकांच्या यज्ञातुन ✸*
       ●●●●●००००००●●●●●
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी
ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌ उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्‍नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *❂ देवाजीचं नाव घ्यावं ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
रामाच्या ग पारामंदी घास भरिते मोत्यांचा
सूर घुमतो जात्यांचा घरोघरी

देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी

कोटरात आली जाग पिलापाखराला
हंबरून बोलाविते गाय वासराला
सड्यासंगं रांगोळीचं नक्षीकाम दारी

फुलला भक्तीचा पारिजात
अंगणी फुलांची बरसात
आनंद खेळतो गोकुळात
सुख माईना माझ्या दारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26.  *❃❝ एकीचे बळ ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       एकेकाळी इंग्रजांचे राज्य होते. एके ठिकाणी धार्मिक* कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर पुरुषमंडळी बाहेर पडली. स्त्रियाही बाहेर पडत होत्या. तेवढ्यात दोन गोरे आरक्षक दारू प्यालेल्या अवस्थेत स्त्रियांच्या द्वारासमोर येऊन उभे राहिले. वायफळ बडबड करत त्यांनी स्त्रियांचा मार्ग अडवला. त्यामुळे त्या स्त्रियांना बाहेर पडता येईना. त्यांच्या घरची मंडळी त्यांची वाट पहात त्याच द्वारासमोर उभी होती; परंतु त्या गोऱ्या आरक्षकांना वाट सोडून देण्यास सांगण्याचे कोणी धाडसही केले नाही. बराच वेळ असाच गेला.

     त्याच वेळी मार्गाने दोन मराठी युवक जात होते. द्वाराबाहेर असलेली दाटी पाहून त्यांनी काय प्रकार आहे, याची चौकशी केली. जेव्हा त्यांना सर्व परिस्थिती कळली, तेव्हा त्यातला एक तरुण आपल्या मित्राला म्हणाला, ”चल, आपण त्या महिलांना साहाय्य करू.” त्यावर मित्र म्हणाला, ”माधव, कशाला नसती कटकट मागे लावून घेतोस ?” एवढे बोलून तो मित्र निघूनही गेला. माधवला मात्र रहावले नाही. तो पुरुषांच्या दाटीत जाऊन सर्वांना उद्देशून म्हणाला, ”हटवा ना त्या गोऱ्या आरक्षकांना!” सगळयांना त्याचे म्हणणे पटत होते; परंतु त्यासाठी पुढाकार घेणार कोण, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे सगळेच गप्प होते, हे माधवच्या लक्षात आले. ‘चला मी होतो पुढे’, असे म्हणून माधव त्या आरक्षकांच्या जवळ जाऊ लागला. हळूहळू लोकही पुढे सरकू लागले. आरक्षकांच्या जवळ जाऊन माधवने त्या आरक्षकांना दरडावून सांगितले, ”येथून निघून जा. नाही गेलात, तर आमचा चमू पहात आहात ना ?” त्याचा कणखर आवाज आणि त्वेष पाहून ते आरक्षक घाबरले आणि तेथून पळाले.

    लोकांनी माधवला धन्यवाद दिले. माधव म्हणाला, ”तुम्ही इतके जण असूनही त्या दोघांना घाबरलात ? आपण संघटित शक्ती दाखवली नाही, तर ते आपल्या दुबळेपणाचा लाभच घेतील. जर एकीचे बळ दाखवले, तर त्यांचे काय सामर्थ्य आहे ? समोरच्यांच्या शक्तीला घाबरण्यापेक्षा आपली शक्ती त्यांना दाखवा.”

     हाच तरुण माधव पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा अनेक वर्षे सरसंचालक होता.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   आपण एकटे काही करू शकत नाही; परंतु आपण संघटित झालो, तर नक्कीच विजयी होतो. कुठलाही लढा द्यायचा असेल, तर संघटित होणे आवश्यक आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. कायम टिकणारी गोष्ट एकच,
             ती म्हणजे
"नम्रता" "चारित्र्य" आणि "माणुसकी".

    म्हणुन पैशापेक्षा जीवाला जीव
         देणारी जीवाभावाची
  जिवलग माणसं जोडा आणि जपा.
*तीच आपली खरी संपत्ती आहे..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *✿ कशास काय म्हणतात ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
●पांढर्या हत्तीचा देश➜
             *थायलंड(सयाम.)*

●मँपल वृक्षाचा देश➜ *कँनडा*.

●मध्यरात्रीचा सुर्य➜ *नार्वे.*

●जगाचे साखरेचे कोठार➜ *क्युबा*

●पाचुंचे बेट➜ *श्रीलंका,आर्यलँड*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26. *❒ ♦महादेवी वर्मा♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २६ मार्च १९०७
फरुखाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
●मृत्यू :~ ११ सप्टेंबर १९८७
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
◆साहित्य प्रकार कविता
◆भाषा हिंदी
◆पुरस्कार :~ ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२)

           ★ महादेवी वर्मा ★
     हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे.

      प्रतिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते.

       ◆ जन्म व शिक्षण ◆

    त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदुरातल्या मिशन शाळेत सुरू झाले. बरोबरच संस्कृत, इंग्रजी, संगीत आणि चित्रकलेचे शिक्षण शिक्षक घरी येऊन देत असत. १९१९ मधे अलाहाबाद मधल्या क्रास्थवेट कॉलेजात प्रवेश घेऊन हुशार व मेधावी विद्यार्थिनीच्या रूपात पुढे जात जात त्या १९३२मधे अलाहाबाद विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात एम.ए. झाल्या.

         ◆ कार्यक्षेत्र ◆

    महादेवींचे कार्यक्षेत्र लेखन, संपादन व अध्यापन होते. अलाहाबादच्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या विकासकार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या काळात हे काम म्हणजे महिला क्षेत्रात क्रांती घडविणारे पाऊल होते. ह्या विद्यापीठाच्या त्या प्रधानाचार्य व कुलपगुरू पण होत्या। १९३२मध्ये त्यांनी चाँद नावाच्या एका महिलांच्या मासिकाच्या मुख्य संपादक झाल्या.

      ◆ पुरस्कार व सन्मान ◆
    महादेवी वर्मां ना प्रशासनिक, अर्धप्रशासनिक व व्यक्तिगत अशा सगळ्याच संस्थांकडून सन्मानित केले आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मधे उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले. १९५६ मधे भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना पद्मभूषण ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य अॅकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण देऊन भूषविले.

     सन १९६९ मधे विक्रम विश्वविद्यालय, १९७७ मधे कुमाऊँ विश्वविद्यालय (नैनीताल), १९८० मधे दिल्ली विश्वविद्यालय आणि १९८४ मधे बनारस हिंदू विश्वविद्यालय या संस्थांनी त्यांना डी.लिट. ही उपाधि देऊन सन्मानित केले. ह्या आधी महादेवी वर्मां ना 'नीरजा' साठी १९३४ मधे 'सक्सेरिया पुरस्कार, १९४२ मधे 'स्मृति की रेखाएँ' साठी 'द्विवेदी' पदक मिळाले. 'यामा' नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकार चा सर्वोच्च सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देण्यात आला.

    त्या भारतामधील ५० यशस्वी महिलांमधील एक होत्या.

    १९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 'वह चीनी भाई' वर 'नील आकाशेर नीचे' नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या अतीत के चलचित्र या पुस्तकाचा मराठी अनुवाद’ ’बिंदा, सांबिया आणि... ’या नावाने प्रकाशित झाला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁मंगळवार ~ 26/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment