*26/04/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *26. एप्रिल:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र कृ.2, पक्ष : कृष्ण पक्ष, 
तिथि ~द्वितीया , नक्षत्र ~अनुराधा , 
योग ~वरीयान्, करण ~गर, 
सूर्योदय-06:13, सूर्यास्त-18:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
26. *क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●•
26. *हातावर कमवावे,पानावर खावे*- 
   *★ अर्थ ::~* रोजच्या रोज कष्ट करून निर्वाह करावा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
26.    ज्ञानस्याभरणं क्षमा ।
             ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
    🛡 *★26. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ११६ वा (लीप वर्षातील ११७ वा) दिवस आहे.
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५	:	आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.
●१९९५	:	आशियाई विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वूमन मास्टर किताब मिळवला. हा किताब मिळवणारी निशा ही सर्वात लहान खेळाडू ठरली.
●१९८९	:	बांगलादेशमधे एका भयंकर चक्रीवादळाने माजवलेल्या हाहा:कारात सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
●१९८६	:	रशियातील चेर्नोबिल येथील अणूभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले. हा (तोपर्यंतचा) सर्वात मोठा आण्विक अपघात होता. यानंतरचा मोठा अपघात जपानमधील फुकुशिमा दाई इची अणूभट्टीत २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर झाला.
●१९७३	:	अजित नाथ रे यांनी भारताचे १४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९६२	:	रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.
   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५३	:	मौशुमी चटर्जी – अभिनेत्री
१९०८	:	सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश 
◆१९००	:	चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक 
◆१४७९	:	पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म
◆  ५७०	:	मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक 
    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९	:	मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते 
●१९८७	:	शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार 
●१९७६	:	चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक 
●१९२०	:	श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती 
(जन्म: २२ डिसेंबर १८८७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
26. *✹अजिंक्य भारतमाता ✹*
        ●●●●●००००००●●●●●
दिशादिशांतुन कोटि मुखांतुन निनाद एकच आता
अजिंक्य आमुची भारतमाता जय जय भारतमाता॥धृ॥
इथे जान्हवी नित्य वहाते घेउन अमृतधारा
इथे झुळझुळे मलयगिरीचा शीतल गंधित वारा
धवल हिमालय या भूमीचा जगात उन्नत माथा॥१॥
इथे जन्मले राम दाविण्या कर्तव्याचा पंथ
कृष्ण सांगती धनंजयाला अमोल गीताग्रंथ
वेदामधुनी इथे वाहती ज्ञानसुधेच्या सरिता॥२॥
बालशिवाही इथे न झुकवी अधमापुढती मान
प्रतापराणा रणराणीचा असे अम्हा अभिमान
इतिहासातुन इथे रंगते पुरुषार्थाची गाथा॥३॥
मानवतेची चाड अम्हांपरि दानवतेची चीड
सत्यासाठी मनी न कधिही धरु भीति वा भीड
प्राणदीप हा विझवू हासत आम्ही देशाकरिता॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
26.       *❂ सावीञी ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
असो तुला सावित्री ! माझा सदा नमस्कार
तुझ्या कर्तृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे  शिकली मुले मागासांची
तुझ्या कृपेने रे केली आम्हीे सैर विदेशांची  
तुझ्या कृपेने रे झाली स्वप्ने ही साकार 
असो तुला सावित्री  ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने उघडली दारे मुलींना शाळांची
तुझ्या कृपेने झाली क्रांती शिक्षणाची
तु आम्हा करिता झेलूनी दगडशेणाचे वार
असो तुला सावित्री  ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या गुणांचा अंश जरी मिळेल
तरी आम्हा ! जीवनाचा अर्थ कळेल
तुझे ज्योतीबासंगचे बलिदान अपार!
असो तुला सावित्री  ! माझे वंदन त्रिवार ॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
26.  *❃❝ प्रामाणिक मुलगा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले, तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस मुलगा म्हणाला, इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही. शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल. 
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
  लहान पणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
26.  माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही ,
     "पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही...!!"
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
26. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
➜ अभयघाट.( दिल्ली )
✪  नवीन ५०० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
➜ लाल किल्ला.( दिल्ली )
✪ युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?
➜ स्वित्झर्लंड.
✪ भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
➜ ओरिसा.
✪ बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
➜ २२ जानेवारी २०१५
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
26. *❒ श्रीनिवास रामानुजन ❒*
    ─┅━━●●★◆★●●━━┅─
🔹पूर्ण नाव :~ श्रीनिवास रामानुजन
                         अय्यंगार
🔸जन्म	:~ २२ डिसेंबर १८८७
    इरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
*🔹मृत्यू	 :~ २६ एप्रिल १९२०*
        मद्रास, ब्रिटिश भारत
🔸कार्यक्षेत्र	:~ गणित
◆श्रीनिवास रामानुजन◆
🔶हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
            *💠जन्म व संशोधन*
  🔷 या महान गणितज्ञाचा जन्म 
22 डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडू तील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
🔶रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
    🔷१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी  २६ एप्रिल १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁शुक्रवार ~26/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment