"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*26/06/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *26. जून:: बुधवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
ज्येष्ठ कृ.५, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~विष्कम्भ, करण ~कौलव,
सूर्योदय-06:03, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

26. *आपली दुर्बलता हाच आपल्या जीवनातील अत्यंत वाईट दोष आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26. *हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये*-
   *★ अर्थ ::~* दूरचे मिळण्याच्या आशेने जवळचे गमावू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *ज्ञानमेव शक्तिः ।*
           ⭐अर्थ ::~
     ज्ञान हीच खरी शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

          🛡 *26. जून* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन
★हा या वर्षातील १७७ वा (लीप वर्षातील १७८ वा) दिवस आहे.
★मादागास्करचा स्वातंत्र्य दिन
★सोमालियाचा स्वातंत्र्य दिन

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
●१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.
●१९७४ : ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
●१९६८ : पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‍घाटन झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५१ : गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१८९२ : पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका
◆१८८८ : नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते
◆१८७४ : छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता
●२००१ : वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार
●१९४३ : कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *✸ देशारक्षणा चला ✸*
     ●●●●●००००००●●●●●
चला चला चला,पुढे पुढे चला
देशारक्षणा चला,न मागुती वळा||धृ||

बालवीर हे ,सिंह छातीचे
ताठ मान ही,हात बाजीचे ||१||

हिमालयावरी चढून जाऊ या
ध्वज तिरंगी हा,सदैव रक्षू या ||२||

हाक मारीता कोणी,त्या क्षणी
रणात ठाकू या,शस्त्र घेऊनी ||३||

भीती ही मनी,आमुच्या नसे
विजय शेवटी,आपुला असे ||४||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *❂ जय शारदे वागीश्वरी ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी

वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26. *❝ घरातील सुखशांती ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       एकदा एका व्यक्तीवर  लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार अाहे.
परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.

       माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे. लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.

      काही दिवसानंतर ...... धाकटी सून स्वयंपाक बनवत होती,
तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली.
       त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि कामाला निघून गेली . त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या.

      जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला.
       त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? बाबांनी  जेवन केलं का ? तेव्हा पत्नी  हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू.

       त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं.

     संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही.

     "ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     भांडण आणि  इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं.
ज्या घरात प्रेम ,शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते.म्हणून घरात सुखशांती नांदू द्यायची असेल तर वाद निर्माण होईल अशा बाबींवर दूर्लक्ष करावे.व समजून घेऊन जीवन शांतीने आनंदाने जगावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26.      कितीही कमवा
     पण कधी गर्व करू नका...
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर

        राजा  आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात...
        आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवीगार दिसतात ?
➜क्लोरोफिल.

✪ क्षय ( T.B. ) या रोगासाठी कोणती लस वापरतात ?
➜बीसीजी लस.

✪  कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर AK-47 चे चित्र आहे ?
➜मोझांबिक्यू.

✪  उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?
➜ज्यूल

✪  संत गाडगे बाबा विद्यापीठ कुुठे आहे ?
➜अमरावती. ( महाराष्ट्र )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26. *❒ छत्रपती शाहू महाराज ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     *"राजश्री शाहू महाराज"*
_यांच्या जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
      *तेथे कर माझे जुळती ..!!*
   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
●पूर्ण नाव :~ यशवंत आप्पासाहेब
                घाटगे
●जन्म :~ २६ जून इ.स.१८७४
           कागल, कोल्हापूर
●राज्याभिषेक :~ २ एप्रिल १८९४
●मृत्यू :~ ६ में १९२२ मुंबई
●राज्यव्याप्ती :~ कोल्हापूर जिल्हा

       *◆ राजर्षी शाहू महाराज ◆*
    चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४- १९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

          *◆ जन्मदिवस ◆*
    शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस *‘सामाजिक न्याय दिवस’* म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.

       *◆ प्रेरणादाई कार्य ◆*
    शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

    ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

    त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

    स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो..शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

     राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★🔅★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ बुधवार ~26/06/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment