*26/09/25 शुक्रवारचा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/eDeLY7
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *26. सप्टेंबर:: शुक्रवार* 🍥
 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
आश्विन शु.४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~स्वाती, 
योग ~वैधृति, करण ~गर,
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:31,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂* 
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
26. *माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
26.कामपुरता मामा ताकापुरती आजी
★ अर्थ ::~ गरजेपुरता गोड बोलणारा 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
26. *विरला जानन्ति गुणान् ।*
        ⭐अर्थ ::~
 फार थोडे लोक गुणांना जाणतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
  🛡 *★ 26. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २६९ वा (लीप वर्षातील २७० वा) दिवस आहे.
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९०	:	रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९८४	:	युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
●१९७३	:	ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.
   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८१	:	सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
◆१९३२	:	डॉ. मनमोहन सिंग – भारताचे १३ वे पंतप्रधान, अर्थतज्ञ
◆१९३१	:	विजय मांजरेकर – क्रिकेटपटू 
◆१९२३	:	देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता
◆१८४९	:	इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ 
◆१८२०	:	इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. 
   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२	:	राम फाटक – गायक व संगीतकार
●१९९६	:	विद्याधर गोखले – नाटककार व संपादक 
●१९८९	:	हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता 
●१९८८	:	पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व 
●१९७७	:	उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), 
●१९५६	:	लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
26.   *✸ महाराष्ट्र देशा ✸*
   ●●●●००००००●●●●
मंगल देशा,पवित्रा देशा,महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा 
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशानाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याहि देशाअंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशाबकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशाभाव भक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशाशाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशाध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासि, वैराग्यासीजरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा,महाराष्ट्र देशासह्याद्रीच्या सख्या,जिवलगा, महाराष्ट्र देशापाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषागोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषातुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांचीमंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांचीध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
26.*❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
26.  *❃ अपमान आणि उपकार ❃*
     ━═•●◆●★★●◆●•═━
    एकदा *दोन मित्र* वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो,
    "आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले". ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,  
   "आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले". हे पण  थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि, 
"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला, "जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
     "माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे".
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
26. *आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.*
*मात्र संयम राखला तर आपल अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.*
*फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात...!*
    *पण जे सगळ्यांचा विचार
करतात त्यांची प्रगती कायम होत
राहते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
26. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारतीय गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ?
➜लता मंगेशकर.
✪ मुळा व मुठा या नद्या कोणत्या शहरातून वाहत जातात ?
➜पुणे.
✪  तांबे या खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
➜चंद्रपूर.
✪  WTO चे पूर्ण रूप काय आहे ?
➜वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.
✪  रवींद्रनाथ टागोर हे कोणत्या भाषेतील कवी आहे ?
➜बंगाली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
26. *❒ लक्ष्मणराव किर्लोस्कर ❒*  
   ━═•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ २० जून, १८६९ 
*●मृत्यु :~ २६ सप्टेंबर १९५६*
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (लकाकि) 
     हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते.
इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापली. आज किर्लोस्कर समूहाचे शेतीसाठी लागणारे साहित्य व इतर उत्पादने भारत भर सर्वांना माहित आहेत.
     किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शुक्रवार~26/09/2025❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment