26/10/24 शनिवार चा परिपाठ
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *26.ऑक्टोबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.१०, पक्ष :कृष्ण पक्ष, 
तिथि ~दशमी, नक्षत्र ~आश्लेषा, 
योग ~शुक्ल, करण ~वणिज, 
सूर्योदय-06:36, सूर्यास्त-18:08,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
26. *वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🔵🟢🔴  
26. *देखल्या देवा दंडवत*
  *★अर्थ ::~* वरपांगी स्तुती करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
26. *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
   ⭐अर्थ ::~  अभ्यासू मनुष्य कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
  🛡 ★ 26. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २९९वा (लीप वर्षातील ३०० वा) दिवस आहे.
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९	:	राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर
●१९९४	:	जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
●१९६२	:	धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
●१९०५	:	नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७४	:	रवीना टंडन – अभिनेत्री
◆१९४७	:	हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
◆१९३७	:	हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक
◆१९१६	:	फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष 
◆१९००	:	इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक 
◆१८९१	:	वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक 
◆१२७०	:	संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)
        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९१	:	अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक,  दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग 
●१९७९	:	चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. 
●१९३०	:	डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 
●१९०९	:	इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
26. *✸ उधळीत शतकिरणां ✸*
        ●●●●●००००००●●●●●
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया
थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी
चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]     ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
26. *❂ अमुचे जग गाइल जयगान *
          ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥
अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान॥१॥
ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान॥२॥
ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण॥३॥
स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान्॥४॥
आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
26.    *❃❝ इमानदारी ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
   एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते. गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात. त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"
आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस..!! मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमार जवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"
    ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "
    सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते. 
     तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "
    सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"
राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."
   सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात. 
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
 इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !!  
    *म्हणून महत्वाची इमानदारी, सलाम करेल दुनियादारी..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
26.  *प्रत्येक वेळी*
*एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार...*
          *दोन्ही बाजूने* 
     *विचार करून बघा* 
*कधी गैरसमज होणार नाहीत...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
26. *✿संशोधक व लावलेले शोध✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▪ देवीची लस     ➜  एडवर्ड जेन्नर
▪ अॅंटीरॅबिज लस     ➜ लुई पाश्चर
▪ जीवाणू     ➜  लिवेनहाँक
▪ रक्तगट     ➜  कार्ल लँन्डस्टँनर
▪ मलेरियाचे जंतू     ➜  रोनाल्ड रॉस
▪ क्षयाचे जंतू     ➜ रॉबर्ट कॉक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
26. *❒ ♦जतीन्द्रनाथ दास ♦ ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २७ ऑक्टोबर १९०४, कलकत्ता, ब्रिटिश भारत;
●मृत्यु :~ १३ सप्टेंबर १९२९, लाहौर
◆जतीन्द्रनाथ दास उर्फ जतीन दास◆
      भारतीय प्रसिद्ध क्रांतिकारक मधील एक क्रांतिकारक होते. ज्यांनी भारत देशाच्या आझादी साठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. यांना जतीन दास या नावाने ओळखले जाते. सर्व 
क्रांतिकारक यांना "जतीन दा" या नावानेच बोलत असत.
जतीन्द्रनाथ दास 'कांग्रेस सेवादल' मध्ये सुभाषचन्द्र बोस यांचे सहकारी होते. भगत सिंह यांची भेंट झाल्यानंतर
बॉम्ब बनविण्यासाठी आग्रा आले होते.
 भगत सिंह व  बटुकेश्वर दत्त यांनी जो बॉम्ब असेंम्बलीवर फेकला होतो तो बॉम्ब जतींद्रनाथ दास यांनीच बनविला होता.
     लाहोर कटाच्या संदर्भात यांना इंग्रजांनी कैद केले.लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी १३ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁शनिवार ~ 26/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment