*27/01/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. जानेवारी:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.2, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~आश्लेषा,
योग ~आयुष्मान् , करण ~तैतिल,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:27,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
27. *तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
27. *कुडी तशी पुडी*
*★ अर्थ ::~*
- देहाप्रमाणे आहार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
27. *मातृदेवो भव ।*
⭐अर्थ ::~ मातेला देवाप्रमाणे पहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *27. जानेवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील २७ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७३ : पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
●१९६७ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.
●१८८८ : वॉशिंग्टन डी. सी. येथे 'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'ची स्थापना
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६७ : बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार
◆१९२६ : जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख
◆१९०१ : लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष
◆१८५० : एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी
●२००७ : कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक,
●१९८६ : निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक
●१९६८ : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
27. *●अमुचा भारत देश महान●*
════════════
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार
स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !
स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !
या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !
गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆••====
27. *●जगाला प्रेम अर्पावे●*
◥◤◥◤◥◤◥◤◥◤◥◤
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
27. *◆ सुयोग्य निर्णय ◆*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला !
मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?"
कुंभार म्हणाला, "मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"
मातीने म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !"
*🌀तात्पर्य ::~*
*जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
27. आपले जीवन शेतीसारखे आहे. आपण जीवनामध्ये ज्या प्रकारचे
ज्ञान -विचार, शिक्षण व संस्कार
यांच्या बीजाची पेरणी करू
त्याचप्रमाणे आपली वाणी,
व्यवहार व आचरण होईल.
त्यामुळे योग्य बीजाची निवड करा
व जीवन समृद्ध करा...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
27. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ बोर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➜ वर्धा.
✪ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
➜ सन १६००.
✪ 'ग्रेट डिलेयर' या नावाने कोणते क्रिकेट अंपायर चर्चित आहे ?
➜ डिकी बर्ड.
✪ वटवाघळाला उडण्यास कोणता अवयव मदत करतो ?
➜ चर्मपर.
✪ सापेक्षता सिद्धांताचा शोध कोणी लावला ?
➜ आईन्स्टाईन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
27. *लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी*
─┅•●●●◆●●●•┅─
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक...
*_"यांच्या जयंती निमित्त_*
*_विनम्र अभिवादन"_*
🍁🌷🔹🌼🔹🌷🍁
*●जन्म :~ २७ जानेवारी १९०१*
●मृत्यू :~ २७ मे १९९४
🔷त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
🔶संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
*☀प्रकाशित साहित्य*
🔷वैदिक संस्कृतीचा विकास
मराठी विश्वकोश (संपादन)
धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
विचारशिल्प.
*☀ गौरव ☀*
🔶पहिला साहित्य अकादमी पुरस्कार (१९५५) - वैदिक संस्कृतीचा विकास, राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार १९७३, पद्मभूषण पुरस्कार १९७६
🔷अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन दिल्ली १९५४, प्रथम अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ १९६० - १९८०, मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शनिवार~27/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment