"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*27/02/19 बुधवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठⓂ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 27/02/2019 ❁*
      *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *27. फेब्रुवारी:: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             माघ कृ. ९
     तिथी : कृष्ण पक्ष नवमी,
            नक्षत्र : ज्येष्ठा,
    योग : हर्शन,  करण : तैतिल,
सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

27.  हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

27. *खायला काळ भुईला भार*
  *★ अर्थ ::~* निरुपयोगी मनुष्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

27.   *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
    ⭐अर्थ :: ~ अभ्यासू मनुष्य
         कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *27. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक मराठी भाषा दिन
★हा या वर्षातील ५८ वा दिवस आहे.
जागतिक नाट्य दिन

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी
●१९५१ : अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३२ : एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री
◆१९२६ : ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या
*◆१९१२ : विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ’कुसुमाग्रज’* – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार 
●१९३६ : इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ
●१९३१ : काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू
●१८८७ : आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
●१७१२ : बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✸ 🚩नरसिंहाचा देश ✸*
     ●●●●●००००००●●●●●
हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश॥धृ॥

 उसळले रक्त हे पुन्हा अगस्तिऋषिचे
सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्मभीमाचे
रसरसले तेजहि प्रताप गोविंदांचे
श्री शिवरायाचा दुमदुमला आवेश ॥१॥

 हे उधाण आले पुनः शक्तिसिंधूला
धगधगल्या ह्रदयी स्वातंत्र्याच्या ज्वाला
प्रत्येक वीर प्रलंयकर रुद्रच गमला
प्रत्येक चढवितो रणवीराचा वेष ॥२॥

 नेत्रातुन झडतो प्रलयीचा अंगार
अन् नसानसांतून बिजलीचा संचार
आकाशा चिरते विजयाची ललकार
मृत्युंजय सजले घ्याया रिपुचाघास॥३॥

 निज शिरा घेउनी आपुल्याच हातात
आइस्तव लढते धडही संग्रामात
झुंजता रिपुंशी बनुनी झंझावात
मर्दाचा जोवर अखेरचा तो श्वास॥४॥

  सर्पांनो येथे गरुडसैन्य जमलेले
श्वानांनो येथे सिंहसैन्य सजलेले
गवतांनो येथे वणवे हे धगधगले
हे श्येन सुसज्जित करण्या कपोतनाश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

27. *❂ सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा

हो‍ऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

27.   *❃ बंधन मुक्ती ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावा गावातून तो विकत असे...  अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली... रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले...  मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो... दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो., एका उंटाला दोरीने बांधतो... मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते., आता काय करावे...?  पंचाईत झाली...  उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते...  व्यापारी परेशान झाला...  इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला., ती काही दिसेना...

  त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे., पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध...
महाराज, पण दोरी नाहीये ना...
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर".,
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली...  आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला...

    सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला...  झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली.,  तो उंट उभा राहिला....

   दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले...  पण तो दुसरा उंट काही उठेना., व्यापारी पुन्हा परेशान...

    तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला... तो म्हणाला, अरे, तो उठणार नाही... कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस...?
पण महाराज., मी दोरी बांधलीच कुठे होती...?  नुसते नाटक केले होते ना...

    पुजारी म्हणाला, नाटक तुझ्यासाठी होते., पण त्याला तर ते खरेच वाटले होते ना...  म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव., मग पहा...
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले.,  आणि काय आश्चर्य...? तो दुसरा उंट तटकन उठला की..., व्यापारी चकित झाला...!

   पुजारी म्हणाला जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत...

   "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या ) गावी जाणार कसे...?

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही...

   निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पाहूया.., आपण नक्की आनंदी होऊ....!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
 ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

27.  ​​विश्वास​ ठेवा....​
    ​आपण जेव्हा ​कोणासाठी​​
    ​काही ​चांगल​ ​करत​ असतो,​
 ​तेव्हा ​आपल्यासाठी​ सुद्धा कुठेतरी​
    ​काही ​चांगल​ ​घडत​ असतं.​
               ​इतकचं की​
    ​ते आपल्याला ​दिसत नसतं​.​
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

27. *■■ प्रश्नमंजुषा ■■*
    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
★ *राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत*?
➡२४
★ *भारताचा राष्ट्रध्वज कोणता?*
➡तिरंगा
★ *भारताचे ध्वजगीत कोणते?*
➡विजयी विश्व तिरंगा प्यारा.
★ *स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?*
➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)
★ *स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?*
➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *❒ वि.वा. शिरवाडकर ❒*
              ■ कुसुमाग्रज ■
     ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
*●जन्म :~ २७ फेब्रुवारी १९१२*
●मृत्यू :~ १० मार्च १९९९

     वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर  कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने *दिनांक २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ बुधवार ~ 27/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment