*27/03/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. मार्च:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.2, पक्ष : कृष्ण पक्ष, 
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~चित्रा, 
योग ~व्याघात, करण ~गर, 
सूर्योदय-07:00, सूर्यास्त-18:42,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
27. *आधी विचार करा; मग कृती करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
27. *गरजेल तो पडेल काय*
      *★ अर्थ ::~* - जो तोंडाने नुसती बडबड करतो , त्याच्या हातून काही कार्य होईलच असे नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
27. *उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि ।*
              ⭐अर्थ ::~
    उद्योगानेच कामे सिद्ध होतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
      🛡 *★27. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक रंगभूमी दिन
★ हा या वर्षातील ८६ वा (लीप वर्षातील ८७ वा) दिवस आहे.
       
    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०००	:	चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ’राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर
●१९६६	:	२० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत 'पिकल्स' नावाच्या कुत्र्याला सापडला. 
●१६६७	:	शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचा महंमद कुली खान झाला.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०१	:	कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार 
◆१८४५	:	विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ 
◆१७८५	:	लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७	:	भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक 
●१९९२	:	प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य 
●१९६८	:	युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर 
●१८९८	:	सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27.  *✹उषःकाल होता होता✹*
        ●●●●●००००००●●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
27.  *❂ सावळ्या विठ्ठला ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरून गेले देहभान ||
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा
दाटला उमाळा अंतरी माझ्या
तुकयाचा भाव पाहूनी नि:संग
तारिले अभंग तूच देवा ||
जगी कितिकांना तारिलेस देवा
स्वीकारी ही सेवा आता माझी
कृपा कटाक्षाचे पाजवी अमृत
ठेव शिरी हात पांडुरंगा ||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
27.   *❃ संवेदनक्षमता ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••        
    एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला. तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं, "आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे?"
वेटर म्हणाला, "५ रुपये". तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.
    नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला, असं विचारलं.
वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं, "४ रूपये."
तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या. त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला.
वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं. कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता.
आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता. त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती.
स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.
मी प्रत्येक वेळी नाही म्हणतं पण कधीतरी दुसऱ्यांचा विचार करावा
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
  सर्वजण एकसारखे नसतात. ते आपापल्या परिस्थितीनुसार असतात.!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
27. सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
27. *✿महाराष्ट्र विषयी माहिती✿*
        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑ 
◆  विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
◆ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
◆ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
◆ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
◆  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
27.  *★ सर सय्यद अहमद खान ★*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~	१७ ऑक्टोबर १८१७
*●मृत्यू :~ २७ मार्च १८९८*
         *सर सय्यद अहमद खान*
    हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.
सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.
    *२७ मार्च १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁बुधवार ~27/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment