"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*27/04/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. एप्रिल:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

🟢🔵🟣
चैत्र कृ.3, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~ज्येष्ठा ,
योग ~परिघ, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:13, सूर्यास्त-18:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

27. *आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

27. *हातच्या कंकणाला आरसा कशाला?*-   
*★ अर्थ ::~* जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

27. *गुणै: गौरवमायाति ।*
           ⭐अर्थ ::~
गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★27. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ११७ वा (लीप वर्षातील ११८ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताला प्राप्त.
●१९७४ : राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनउ यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
●१९६१ : सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
●१९०८ : चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरूवात झाली.
●१८५४ : पुण्याहुन मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२० : डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)
◆१८८३ : भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार
◆१८२२ : युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष
◆१७९१ : सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (मृत्यू: २ एप्रिल १८७२)

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८७ : सलीम अली – पक्षीनिरीक्षक
●१९८० : पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी
(जन्म: २९ ऑगस्ट १९०१)
●१८९८ : शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक
●१८८२ : राल्फ वाल्डो इमर्सन – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✹शतकांच्या यज्ञातुन✹*
      ●●●●●००००००●●●●●
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌ उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्‍नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज

'शिवछत्रपतींचा जय हो !'
'श्रीजगदंबेचा जय हो !'
'या भरतभूमिचा जय हो !'
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

27. *❂आकाशी झेप घे रे पाखरा❂*
           ✶✶✹✹★●★✹✹✶✶
आकाशी झेप घे रे पाखरा (२)
सोडी सोन्याचा पिंजरा (२) ||धृ.||

तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा ||१||

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा ||२||

तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा ||३||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

27.      *❃❝ संघटन ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
      एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.

      पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  *संघटन मध्ये शक्ती असते...!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

27.   पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
      दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.
      दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.
      दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
      पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?
     पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

27. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ 'द वॉल'असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?
➜ राहुल द्रविड.

✪  आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?
➜ केशवसुत.

✪ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?
➜ लोझान.(स्वित्झर्लंड)

✪  राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➜ ६ वर्ष.

✪ भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?
➜ नाना शंकरशेठ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

27. *❒ ♦महाराणी येसूबाई ♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   आपल्या सर्वस्वाचा त्याग करत स्वराज्यापायी आणि रयतेसाठी अनंत अन्यास सहन करणाऱ्या महान महाराणी  "महाराणी येसूबाई"
स्त्री सखी राज्ञी जयती

     सुविद्य, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, राजकारण-कुशल अशा महाराणी येसूबाई साहेबांनी १६८०-१७३० या कसोटीच्या काळात अतिशय महत्वाचे योगदान केले आहे. महाराणी येसूबाई ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी.
पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या कुलीन मराठा घरण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब महाराज ...

    अंदाजे इ.स.१६६१ ते १६६५ च्या दरम्यान त्यांच्या विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला. विवाहाच्या वेळी त्यांच वय जेमतेम ६-७ वर्ष होत. त्यामुळे त्यांची जडन-घडन संभाजी राजांसामवेत माँसाहेबांच्या देखरेखी खाली झाली. त्याचा एकंदरीतच परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येतो. स्वराज्य प्रवर्तिका जिजाबाईसाहेब व युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या मुशीतून तावून सुकावून बाहेर पडलेले अस्सल बावनकशी सोने महाराणी येसूबाईसाहेब महाराज.

    महाराणी येसूबाई रणांगणी नसल्या तरी त्या धर्यशील,कर्त्यव्यदक्ष, कणखर वृतिच्या होत्या. ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा काराभार माँसाहेब सांभाळत तसा संभाजी राजांच्या अनुपस्थितीत येसूबाई सांभाळत असत. त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही "स्त्री सखी राज्ञी जयती" असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या सारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचे पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या...

     पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्रभर गरुड भरारी मारणाऱ्या संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या.. गडावर येणारे वाद आणि तंटे त्या स्वत: सदरेवर बसून कुशल रीतीने हाताळत.

       पुढे इ.स.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयतिक दुःख बाजुला सारून मोठ्या निर्धाराने सामोरे गेल्या. राजाराम महाराज व संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून राजारामंना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा, असे त्यांनी सुचवले. स्वतः येसूबाई रायगड लढायला लागल्या. पण शेवटी रायगड लढने शक्य नाही हे पाहिल्यावर त्यांनी मोगलांच्या छावनीत स्वतःच्या ७-८ वर्षांच्या मुलासह प्रवेश केला.

     स्वराज्याची शकले होऊ नये म्हणून पोटच्या मुलाचा म्हणजे लहानग्या शाहुराजेंचा अधिकार असताना सुद्धा स्वराजाच्या त्यांना गादीवर न बसवता छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करून त्यांनी आपल्या नि:स्वार्थपणाची साक्ष दिली.

   आयुष्यातील उमेदिची २७ वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली. त्यात अनेक अडचणी आल्यात. त्या त्यांनी मोठ्या धैर्याने सोडविल्या. त्यांच्या ह्या आत्मबलिदानाला तोड़ नाही. सतत २७ वर्षे मोघलांच्या कैदेत राहून औरंझेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान,सन्मान,अभिमान आणि स्वाभिमान कायम जपला...

      इ.स.१७१९ च्या सुमार्यास त्या दिल्लीहून दक्षिनेत परत आल्या. दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा, कोल्हापुर अशी शकले पाहिली. आपसांतिल दुहिमुळे परकीय शत्रुंची कसे फावते याचा धडा शिवरायांच्या कारकिर्दीपासून पाहत आल्यामुळे त्यांनी कोल्हापुरचे संभाजीराजे व शाहू यांच्यात १७३० च्या सुमाराला वारणा येथे मैत्रीचा तह घडवून आणला. हा तह वारणेचा तह म्हणून इतिहासात अमर झाला.

     यानंतर थोडेच दिवसांत त्यांचे देहवासन झाले. त्याचा उल्लेख कोल्हापुरच्या संभाजी यांच्या पत्रावारून कळतो. साताऱ्या जवळील माहुली या क्षेत्री त्यांचे दहन करण्यात आले. आजही माहुलीच्या नदीकाठी एका चौथार्यावर त्यांची समाधी दाखवतात.
परंतु त्यावर 'नाही चिरा नाही पणती'!.

     ह्या महान महाराणीची जन्मतारीख इतिहास विसरून गेला तो गेलाच परंतु त्यांच्या निधनाची तारीख सुद्धा याद ठेवण्याची तसदी इतिहासाने घेतली नाही.. त्यांच्या कर्तुत्वाची, ऐतिहासिक योगदानाची माहिती नाही.

    अशा ह्या अद्वितीय स्त्रीश्क्तीला मानाचा त्रिवार मुजरा...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ शनिवार~27/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment