*27/06/25 शुक्रवार चा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. जून:: शुक्रवार* 🍥
⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
आषाढ शु.२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~पुनर्वसु, 
योग ~व्याघात, करण ~कौलव, 
सूर्योदय-06:03, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
27. *शञूची व रोगाची उपेक्षा करु नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *हातच्या कंकणाला आरसा कशाला?*-    
*★ अर्थ ::~* जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *गुणै: गौरवमायाति ।*
           ⭐अर्थ ::~
 गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
           🛡 *27. जून* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हेलन केलर दिन
★हा या वर्षातील १७८ वा (लीप वर्षातील १७९ वा) दिवस आहे.
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९६	:	अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर
●१९९१	:	युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
●१९५४	:	अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र रशियात सुरू झाले.
     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६४	:	पी.टी.उषा – (पिलावुलकांडी थेकापरंबील उषा) 
भारताची सुवर्ण कन्या, 100 हून अधिक पदके जिंकणारी 
◆१९३९	:	राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार 
◆१८८०	:	हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका 
१८७५	:	दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त'
◆१८६४	:	शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार 
◆१८३८	:	बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८	:	फील्ड मार्शल सॅम माणेकशा 
●२०००	:	द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार 
●१९९८	:	होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार 
●१८३९	:	महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक 
●१७०८	:	धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✸ अजिंक्य भारत ✸*
    ●●●●●००००००●●●●●
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे
भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे
इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयानिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27.  *❃ 'संस्कार ❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या..
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता. तर त्याला पाहुन ती म्हणाली, 
"तो बघा माझा मुलगा,
इंग्लिश मेडियामला आहे."
        पुन्हा त्यानंतर दुसरीचा
मुलगा तिथुन निघाला होता.. 
तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली,
       "तो बघा माझा मुलगा,
सीबीएसई ला आहे." 
तेवढ्यात तिसरीचा मुलगा
तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला... पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला,
 "आई चल घरी."
त्याची आई म्हणाली, 
   *"मराठी शाळेत शिकत आहे ."*
आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या. 
        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
     लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27 *माणसाने सुखाने आयुष्य जगावं*
   काल आपल्याबरोबर काय घडलं   
         याचा विचार करण्यापेक्षा 
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
            याचा विचार करा.
  कारण आपण  फक्त गेलेले दिवस
         मोजण्यासाठी नाही तर... 
उरलेले दिवस आनंदाने घालवायला
         जन्माला आलोय..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  भारतातील सर्वांत उंच मिनार कोणते ?
 ➜कुतुबमीनार.
✪ पृथ्वीच्या तापमान वाढीस कोणता वायू कारणीभूत आहे ?
 ➜ Co2.
✪ नेपोलियन बोनापार्टची जन्मभूमी कोणती ?
 ➜कोर्सिका.
✪ नॅशनल डिफेन्स अँकेडमी कोठे आहे ?
 ➜खडकवासला.
✪  नाना पाटील यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?
 ➜क्रांतिसिंह.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *.❒पी. टी. उषा❒*  
    ━═•●◆●★●◆●•═━
पूर्ण नाव- पिलावुलकांडी थेकापरंबील उषा
    भारतीय धावपटू, भारताची सुवर्णकन्या, उडन परी, 100 हून अधिक पदके जिंकणारी
◆जन्म :~ २७ जून १९६४ कूथथाली, केरळ.
   भारताची सुवर्णकन्या म्हणून पी टी उषा यांचे नाव सर्वांना सुपरिचित आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पी टी उषा यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांना बालपणापासूनच खेळाची आवड होती. बाराव्या वर्षी त्यांना प्रख्यात प्रशिक्षक व नंबियार ह्यांच्या कडे खेळाचे प्रशिक्षण घेतले १९७९ साली त्यांना राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्या भारताच्या धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत.
    पीटी उषाने भारताच्या झोळीत इतकी आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत की तिला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. ज्या काळात मुलींना खेळात प्रगती करणे खूप अवघड होते, अशा वेळी पीटी उषाने आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताला पदके मिळवून दिली.
   १९७६ मध्ये, पी.टी उषा यांनी प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जिंकली. त्यावेळी ती फक्त १२ वर्षांची होती. त्याने १९८० मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर पीटी उषाने यशाची धुरा वाहिली. पीटी उषाने कराची येथील पाकिस्तान ओपन नॅशनल मीटमध्ये भारतासाठी चार सुवर्णपदके जिंकली.
१९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. दुसऱ्या वर्षी त्याने आशियाई ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिपमध्ये ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. १९८३ ते १९८९ पर्यंत उषाने एटीएफमध्ये १३ सुवर्णपदके जिंकली. त्यांची चमकदार कामगिरी पाहून वयाच्या २० व्या वर्षी त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. १९८५ आणि १९८६ मध्ये वर्ल्ड ट्रॉफी देण्यात आली. पीटी उषाने १९९० च्या बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन रौप्य पदके जिंकली होती. १९९१ मध्ये तिने व्ही श्रीनिवासनशी लग्न केले. यानंतर १९९८ मध्ये उषा पुन्हा ॲथलेटिक्समध्ये परतली. मात्र, २००० साली पुन्हा ॲथलेटिक्समधून निवृत्ती घेतली.
     पीटी उषा यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 'स्पोर्ट्स पर्सन ऑफ द सेंचुरी' आणि 'स्पोर्ट्स वुमन ऑफ द मिलेनियम' म्हणून सन्मानित केले आहे. आजच्या युगात देशातील महिलांसाठी आदर्श आहे, ज्यांनी प्रगतीच्या मार्गावर चालत अनेक नवनवीन महिलांना आदर्श दिला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁ शुक्रवार~27/06/2026❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment