"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*27/07/19 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 27/07/2019 ❁*
      *🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *27. जुलै:: शनिवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आषाढ कृ. १०
     तिथी : कृष्ण पक्ष दशमी,
          नक्षत्र : कृतिका
    योग : गंड, करण : वणिज,
सूर्योदय : 06:13, सूर्यास्त : 19:16,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

27. *मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *राजा बोले दल हाले*
     *★अर्थ ::~*  सत्ताधिशाच्या हुकूुमाने सर्व काही घडते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् |*
   ⭐अर्थ ::~ या जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उच्छिष्ट आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

        🛡 *27. जुलै* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २०८ वा (लीप वर्षातील २०९ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१२ : लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●२००१ : सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व  जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय
●१९२१ : रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : अ‍ॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९११ : डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१५: *ए.पी.जे. अब्दुल कलाम*   -- भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतरत्न,
भारताचे अकरावे राष्ट्रपती
●२००२ : कृष्णकांत – भारताचे १० वेउपराष्ट्रपती
●१९९२ : अमजद खान – हिन्दी चत्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
●१९८७ : डॉ. सलीम अली –
 जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक
●१९७५ : त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✸ आता उठवू सारे रान ✸*
      ●●●●●००००००●●●●●
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान

कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकर्‍यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *❂ शुभंकरोति कल्याणम्‌ ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा

शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *❝ राजा आणि मुंगळा ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      एका जंगलात एक मुंगळा आपल्‍या बिळात राहत होता. एकदा त्‍या देशाचा राजा त्‍या जंगलात शिकार करण्‍यासाठी आला. सा-या मुंग्‍यांचे घर राजाच्‍या सैनिकांच्‍या घोड्यांच्‍या चालण्‍याने उद्ध्‍वस्‍त झाले. त्‍यामुळे मुंग्‍यांची राहण्‍याची समस्‍या निर्माण झाली. त्‍यांची अंडीही नष्‍ट झाली. मुंग्‍यांची लहान पिलेही मेली. आपली जात आणि वंश नष्‍ट झालेला पाहून मुंग्‍यांच्‍या सरदाराला फारच राग आला. त्‍याने राजाचा बदला घेण्‍याचे ठरविले. तो जंगलातून राजाच्‍या महालाकडे निघाले. रस्‍त्‍यात त्‍याला एक अस्‍वल गाठ पडले. त्‍याने मुंगळयाला विचारले,'' कुठे निघाला सरदार?'' मुंगळयाने सर्व हकीकत अस्‍वलाला सांगितली. अस्‍वलाला पण राजाचा राग आला. तो पण मुंगळयाबरोबर निघाला. पुढे जाताना घोडा, हत्ती, उंट, माकड, वाघ, कोल्‍हा, लांडगा, तरस आणि अनेक प्राणी गाठ पडले. त्‍या सर्वांना हा राजाकडून झालेला अत्‍याचार कळाला व ते सर्वच जण मुंगळयाच्‍या सरदारासोबत राजाकडे निघाले. महालाच्‍या दारावर पोहोचल्‍यावर मुंगळ्याने राजाला युद्धासाठी पुकारले. आवाज ऐकून राजाने महालाच्‍या खिडकीतून खाली पाहिले तर तो इतकी मोठी प्राण्‍यांची फौज पाहून राजा घाबरला. त्‍याने कारण जाणून घेतले व आपली चूक मान्‍य केली. मुंगळ्याबरोबर त्‍याने तह केला त्‍यात मुंगळ्याच्‍या राहण्‍याच्‍या भागात त्‍याने मनुष्‍यास फिरण्‍यास बंदी केली व मुंगळ्याने राजाला झुकण्‍यास परावृत्त केले.

         *_🌀तात्पर्य_ ::~*
*संघटनेत मोठी ताकद असते. सर्वजण एकञ राहील्याने मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा सामना करता येतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. जीवनात स्वावलंबनासारखे
               वैभव नाही
    आणि परावलंबनासारखे
            दारिद्रय नाही
 *तेव्हा आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
     ◑◑◑◆◑●★●◑◆◑◑◑
1) *जगातील आकाराने सर्वात मोठी नदी कोणती*?
● अॅमेझाॅन (ब्राझील 6992 किमी, सर्वात लांब नदी-नाईल)

2) *कलाहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे* ?
● आफ्रिका खंड (क्षेत्रफळ-5,20,000 चौ.किमी-जगातील सर्वात मोठे वाळवंट)

 3)  *"पालघाट" कोणत्या दोन राज्या दरम्यान आहे* ?
●  केरळ-तमिळनाडू

4) *गंगा नदीची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे* ?
● उत्तर प्रदेश

5)  *नर्मदा नदी ही केवळ याच जिल्ह्यातून वाहते* ?
● नंदूरबार (54 किमी)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *❒ ए.पी.जे. अब्दुल कलाम ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (एपीजे)
    *भारताचे अकरावे राष्ट्रपती* 
 _*🌷यांचा आज स्मृतिदीन🌷*_
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
  🌺🌸🥀💎🥀💎🌸🌺
      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
      *तेथे कर माझे जुळती ..!!*
 🌼🌸🥀💐🥀💐🌸🌼

      *◆ राष्ट्रपती कार्यकाळ ◆*
(२५ जुलै२००२ ते २५ जुलै२००७)
●जन्म :~ १५ ऑक्टोबर १९३१
*●मृत्यू :~ २७ जुलै, २०१५*

     ★डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम ★

      लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.
    🔷शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
            💠  कार्य
   ♦आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
   
    🔷 भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

      🔶 क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

     ♦ विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने *'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न'* हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ शनिवार ~ 27/07/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment