"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*27/09/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. सप्टेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद कृ.१०, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~पुष्य,
योग ~शिव, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:28, सूर्यास्त-18:29,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

27. *सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

27. *रात्र थोडी सोंगे फार* –
  ★ अर्थ ::~ काम भरपूर, वेळ कमी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27. *सर्वार्थसम्भवो देह: ।*
     ⭐अर्थ ::~ देह सर्व अर्थांच्या प्राप्तीचे साधन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 27. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक पर्यटन दिन
★ हा या वर्षातील २७० वा (लीप वर्षातील २७१ वा) दिवस आहे.
★ राष्ट्रीय ग्रंथालय दिन

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.
●१९६१ : सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
●१९५८ : मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.
●१९२५ : डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८१ : लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू
◆१९८१ : ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
◆१९६२ : गेव्हिन लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
◆१९३२ : यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते

  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका
●१९९२ : अनुताई वाघ – समाजसेविका
●१९७२ : एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
●१९२९ : शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
●१८३३ : *राजा राम मोहन रॉय –* समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

27. *✸ आम्ही चालवू हा पुढे ✸*
     ●●●●००००००●●●●
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा !

जिथे काल अंकूर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

27.  *❂ पंढरीचा राजा ❂*
   ✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला

पूर्व दिशी उमटे भानू
घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला

कुक्षी घेऊनिया कुंभा
उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला

पुंडलीक हाका देई
उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

27.  *❃❝ चांगला राजा ❞❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━
    एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27.    *आयुष्यातील*
               *सर्वात सोपा नियम*

     *जे तुमच्यासोबत*
           *होऊ  नये, असे वाटते*

     *ते इतरांसोबत*
                 *करु नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

27. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ बुलबुल चक्रीवादळ कोणत्या सागरात तयार झाले होते ?
➜बंगालचा उपसागर.

✪ राजाराम मोहन राॅय पुरस्कार - २०१९ कोणाला जाहीर झाला ?
➜गुलाब कोठारी.

✪ यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे ?
➜पुणे.

✪ क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
➜द्रोणाचार्य पुरस्कार.

✪जलधोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
➜ मेघालय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

27. *❒ राजा राममोहन राय ❒* 
     ━═•●◆●★★●◆●•═━
   *भारतीय प्रबोधनाचे जनक मानले जाते. कन्याविक्रय, बालविवाह  चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. यांची आज पुण्यतिथी*
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
●जन्म :~ २२ मे १७७२
*●मृत्यू :~ २७ सप्टेंबर १८३३*

     ★ राजा राममोहन रॉय ★

    *यांना भारतीय प्रबोधनाचे जनक मानले जाते.* ब्रिटिशांचे भारतातील राज्य स्थिरावत असताना ब्रिटिशांच्या आगमनाने भारतीय समाजात क्रिया-प्रतिक्रियांचे चक्र सुरू झाले होते. भारतीयांची गाठ अगदी वेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिकतेशी, मानसिकतेशी पडली होती. व्यक्ती, व्यक्तीची प्रतिष्ठा व व्यक्तीचे स्वातंत्र्य या बाबींना समाजरचनेच्या केंद्रस्थानी ठेवून राजकीय, सामाजिक व्यवहार करणारा ब्रिटिश समाज आणि समुच्चयात्मक पद्धतीने सामूहिक जीवन जगणारा भारतीय समाज या परस्परविरोधी वाटणाऱ्या संस्कृतींमध्ये चलनवलन सुरू झाले. या प्रक्रियेत भारतातील समाजधुरिणांसमोर दोन आव्हाने उभी होती. एक म्हणजे: ज्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे, ते सत्ताधारी, त्यांचा समाज, त्यांची संस्कृती, त्यांचे तत्त्वज्ञान यांचे आकलन करून घेणे. दुसरे म्हणजे : त्याच वेळी या सत्ताधाऱ्यांकडून भारतीयांच्या धार्मिक, सांस्कृतिक रूढींवर-प्रथांवर होत असणाऱ्या हल्ल्यांचा समर्थपणे प्रतिवाद करणे व प्रतिसाद देणे.

     ◆जन्म आणि शिक्षण :~
  २२ मे १७७२ (१७७४?) रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळ त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते. तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले.

◆सती प्रथेशी संबंध आणि विरोध :~
      इ.स. १८१२ मधे त्यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत. त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे.

    भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्‍या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.

      त्यांनी एका बाजूला भारतीय परंपरा, धर्म यांची चिकित्सा केलीच; पण ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करून त्याचीही चिकित्सा केली (त्यातून त्यांनी ढीळपळीूंची कल्पना नाकारली), तर दुसऱ्या बाजूला सतीसारख्या सर्वस्वी अमानुष प्रथेवर सातत्याने टीका करून ती प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यात यशही मिळाले. राजा राममोहन रॉय यांच्या या साऱ्या कर्तृत्वावर इंग्लिशमध्ये, बंगालीमध्ये पुष्कळच लिहिले गेले आहे.

   इंग्लंडमधील स्टेपलटन या गावी २७ सप्टेंबर १८३३ रोजी या महात्म्यान या जगाचा निरोप घेतला. दक्षिण ब्रिस्टल म धील आर्नोस वॅले दफनभूमीत त्यांच दफन करण्यात आले. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शुक्रवार~ 27/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment