*27/10/24 रविवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27.ऑक्टोबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.११, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~मघा,
योग ~ब्रह्म, करण ~बव,
सूर्योदय-06:36, सूर्यास्त-18:07
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
27. *ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे*. ★ अर्थ ::~ प्रत्येकाच्या अधिकाराचे दिवस बदलतात
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ :: ~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 27. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३०० वा (लीप वर्षातील ३०१ वा) दिवस आहे.
★World Day for Audiovisual Heritage (International)
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८६ : युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
●१९७१ : डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
●१९४७ : जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९८४ : इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू
◆१९५४ : अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका
◆१९४७ : डॉ. विकास आमटे – समाजसेवक
◆१९२० : के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती
◆१९०४ : जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक
◆१८७४ : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी
◆१८५८ : थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ’फास्टर फेणे’ आणि ’बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक
●२००१ : प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता
●१९७४ : *चक्रवर्ती रामानुजम –* प्रसिद्ध गणितज्ञ
●१९६४ : वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक
●१९३७ : ’संगीतरत्न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु
●१७९५ : सवाई माधवराव पेशवा
●१६०५ : अकबर – तिसरा मुघल सम्राट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✸ चिरविजयाचे वारस आम्ही*
●●●●●००००००●●●●●
चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *❂ गोकुळिचा राजा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
गोकुळिचा राजा,माझा गोकुळिचा राजा
देवकिनंदन श्याम सुलोचन
गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
मोहन कुंजविहारी माझा
यमुनातीरी उभ्या गौळणी
रूप घेति ते नयनी भरुनी
सोडुनि जलभरणाच्या काजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *❃❝जगज्जेत्ता अलेक्झांडर❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह माघारी आपल्या देशात परतत होता. परत जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला. अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे
होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. जिंकलेले संपूर्ण साम्राज्ज्य, एवढी मोठी शूर सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणी अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून
आपणाला आता मृत्त्युला सामोरे जावे लागणार ह्याची त्याला जाणीव झाली.
आपण आता कोणत्याही परिस्थितीत जिवंत आपल्या मायदेशी पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले.
मृत्त्युच्या शेवटच्या घटका मोजत
असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण केले आणी म्हणाला ” मी आता लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहो, माझ्या तीन
इच्छा आहेत आणी त्या पूर्ण
करण्याची तुमची जबाबदारी आहे”
सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय गत्त्यंतर नव्हते. अलेक्झांदर म्हणाला :~
१. माझी पहिली इच्छा “
माझ्या खाजगी डॉक्टरनेच
माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी”
२. माझी दुसरी इच्छा “
माझी शवपेटिका स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत
जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे”
३. आणि माझी अंतिम इच्छा ” माझे
दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून
लोंबकळत ठेवावे”
आपला राजा आपणाला कायमचे सोडून जाणार, सर्व सेना अतिशय दुखी झाली. सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला
” हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा”, राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणी म्हणाला “माझ्या आयुष्यात मी जे काही आता शिकलो ते सर्व जगाला माहित व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे गरजेचे आहे”.
■ माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी ह्यातून मला जगाला एक संदेश द्यावयाचा आहे. जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही. मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगज्जेत्ता म्हणून नावलौकिक प्राप्त
करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या, अपार संपत्ती गोळा केली,पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही,
म्हणूनच
■ माझी दुसरी इच्छा
“माझी शवपेटिका स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे” केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे जमविणे म्हणजेच जीवन नाही हा संदेश लोकांना मिळेल आणी अशी संपत्ती मिळण्यासाठी केलेली धावाधाव म्हणजेच जीवनातील अमुल्य वेळेचा कालापव्य. जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणी रिकाम्या हातानेच हे जग सोडून जात आहो,म्हणून
■ माझी तिसरी इच्छा
” माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे” हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्त्यू झाला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
नको नको मना गुंतू माया जाळी
काळ आला जवळी ग्रासावया
जेव्हा काळाची ऊडी पडेल तेव्हा
कोणीही वाचवू शकत नाही
सगळ ईथेच ठेवुन जायचे आहे.
एक माणुस म्हणुन या संसारात वागा.
"चांगली कर्मे करा"
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *डोळे बंद केले म्हणून ,*
*संकट जात नाही..* आणि
*संकट आल्या शिवाय ,*
*डोळे उघडत नाहीत.*
*राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,*
*तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✿प्रमुख आदिवासी जमाती✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
✏महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली
✏मेघालय - गारो, खासी, जैतिया
✏सिक्कीम - लेपचा
✏तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *❒ श्रीनिवास रामानुजन ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆ महान प्रसिद्ध गणितज्ञ ◆
*यांच्या स्म्रुतीदिनानिमीत्त*
*विन्नम्र अभिवादन..!!*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●स्मृतिदिन ~ २७ ऑक्टोबर १९७४
प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्यांनी गणितातील कठीण प्रश्नांचे समाधान केले नाही तर त्यांच्या बुद्धिमान ज्ञानाबरोबर नवीन अध्याय देखील जोडले. हरियाणा सायन्स फोरमचे जिल्हा समन्वयक डॉ. चंद्रशेखर शर्मा यांनी हे सांगितले.
रामानुज कठीण पुस्तक केवळ त्रिकोणामिती सातव्या इयत्तेत लोणी लिहिलेले वाचा, पण सुधारण्यासाठी नवीन गोष्टी जोडले. काय उत्तर शून्याने भागाकार दिले त्याचा प्रश्न 'शून्य देखावा होईल "उत्तर गणितज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या जगात जास्त पन्नास वर्षे निराकरण करण्यासाठी. या संकल्पनाने गणिताची एक नवीन शाखा जन्म दिला. शेकडो संशोधकांनी पीएच.डी. च्या पदवी अभ्यास केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁रविवार~27/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment