"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

27/12/24 शुक्रवारचा परिपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. डिसेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.१२, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~विशाखा,
योग ~धृति , करण ~कौलव,
सूर्योदय-07:10, सूर्यास्त-18:09,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

27. *आपण जे पेरतो तेच उगवतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27.  *गर्जेल तो पडेल काय? –*
  ★ अर्थ ::~पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27. *विद्या राजसु पूज्यते ।*
            ⭐अर्थ ::~
विद्या राजाच्या ठिकाणी पूजिली जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 27. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३६१ वा (लीप वर्षातील ३६२ वा) दिवस आहे.

  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७५ : बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
●१९४९ : इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९११ : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४ : विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
◆१८९८ : डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.
(मृत्यू: १० एप्रिल १९६५)
◆१८२२ : लुई पाश्चर –फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
◆१७९७ : मिर्झा गालिब – उर्दू शायर
◆१५७१ : योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या
●१९७२ : लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते
●१९२३ : गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

27.  *✹ देशभक्तों नमन ✹*
   ●●●●०००००●●●●
जाँ पे खेला बचाया है तुमने वतन
ज़ुल्म सहते रहे गोली खाते रहे
बीच लाशों के तुम मुस्कुराते रहे
कतरे-कतरे से तुमने ये सींचा चमन
आज करता हूँ मैं देशभक्तों नमन
साँप बनकर जो आए थे डसने हमें
कुचला पैरों से तुमने मिटाया उन्हें
कर दिया पल में ही दुश्मनों का दमन
आज करता हूँ मैं देशभक्तों नमन

सर झुकाया नहीं सर कटाते रहे
देख बलिदान दुश्मन भी जाते रहे
माँ ने बाँधा था सर पे तुम्हारे कफ़न
आज करता हूँ मैं देशभक्तों नमन
                     ~ महेश मूलचंदानी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

27. *❂ अमुचे जग गाइल जयगान *
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥

अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान॥१॥

ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान॥२॥

ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण॥३॥

स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान्॥४॥

आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

27.  *❃❝ भाषाविवाद ❞❃*
   ━━═•●◆★◆●•═━
    कलकत्त्यात एकदा महिलांचे संमेलन भरले होते.  अध्यक्षस्थानी सरोजिनी नायडू होत्या. परस्पर परिचयानंतर भाषणाच्या व आपापले विचार मांडण्याचा कार्यक्रम होतो . वक्त्यांची भाषणे सुरु झाली . काही महिला उर्दूत , काही बंगालीत तर काही कन्नड भाषेत बोलत होत्या. गंमत म्हणजे प्रत्येक बोलणारी दुस-या भाषेवर टीका करीत होती.  आपलीच भाषा श्रेष्ठ असून , दुसरीत कसे दोष आहेत ते दाखवत होती . सरोजिनी नायडूंना त्या  गोष्टींचे आश्चर्ययुक्त दु:ख होत होते. इतक्यात कार्यक्रमाची एक कार्यकर्ती त्यांच्याकडे आली व म्हणाली , " बाई आपल्या  घरून फोन आला आहे. लहान मुलगा खूप रडत आहे.  कोणाकडूनच तो शांत होत नाही. तेव्हा आपल्याला लगेच घरी बोलावलं आहे ."सरोजिनीबाई उभ्या राहिल्या . उपस्थित महिलांना त्यांनी घरचा निरोप सांगितला व म्हणाल्या,  " घरी जाण्यापूर्वी मात्र मुलाला सांभाळणा-या बाईला फोनवरून विचारून घेते , की तो कोणत्या भाषेत रडत आहे ते सांग ." तो टोमणा ऐकल्यानंतर उपस्थित सर्व महिला खजील झाल्या. भाषाप्रेमी , सर्व भाषांवर सारखेच प्रेम करणा-या महान विदुषी सरोजिनी नायडू हसत हसत घरी गेल्या .
   
       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   बहुभाषीय , बहुधर्मीय समाजात सर्व धर्मांप्रमाणेच सर्व भाषांचाही आपण आदर केला पाहिजे. आपल्या भाषेबरोबर दुस-या भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन समजूतदारपणाचा व सहानुभूतीचा असावा .
    भाषेने समाज जोडला गेला पाहिजे तोडला जाता कामा नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27. आशा सोडायची नसते.,
  निराश कधी व्हायचं नसतं...
        अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं..

    जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल..,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

27. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती प्रमाणात असते ?
  ➜ ९ टक्के.

✪  मिळवलेल्या गुणधर्माचे पुढल्या पिढीत संक्रमण हा सिद्धांत कोणी मांडला ?
  ➜ लॅमार्क.

✪  शास्त्रज्ञांनी शोधलेला विश्वातील सर्वांत प्राचीन रेणू कोणता ?
  ➜ हिलियम हायड्राइड.

✪  पिनाका हे काय आहे ?
  ➜ मल्टी बॅरल लाॅक लाॅंचर.

✪  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किती वेळात पृथ्वी परिक्रमा पूर्ण करतो ?
  ➜ ९० मिनिटांत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27.  *💠पंजाबराव देशमुख💠*
    ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
    देशाचे कृषी मंत्री, घटना समितीचे सदस्य , शिक्षणमहर्षी, कृषिरत्न, घटना समितीचे अभ्यासू सदस्य लोकमहर्षी डॉ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 
_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

*🔹जन्म :~ २७ डिसेंबर १८९८*
पापळ, अमरावती
🔸मृत्यू :~ १० एप्रिल १९६५, दिल्ली
🔹प्रशिक्षणसंस्था :~
          श्री शिवाजी शिक्षण संस्था

     *◆डॉ. पंजाबराव देशमुख◆*
                 ( भाऊसाहेब देशमुख)
   यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.

             *♦संक्षिप्त जीवन*
🔻डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम

🔸१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.

🔹वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

🔻१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

🔸१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

🔹१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.

🔻१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .

🔸ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

🔹१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.

🔻१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

🔸१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

🔹'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.

🔻१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

🔸१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

🔹लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

🔻१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.

🔸देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

🔹प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

🔻१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
    *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शुक्रवार~27/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment