"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*27/11/24 बुधवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. नोव्हेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.१२, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~चित्रा,
योग ~आयुष्मान्, करण ~कौलव,
सूर्योदय-06:52, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

27. *फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे*    
  *★ अर्थ ::~* - आपलेच काम आपल्याला भरपूर असताना त्यात इतरांच्या कामाची भर पडणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

27.    *सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ।*
⭐अर्थ ::~ दुसर्‍यांची सेवा करणे हे फार कठिण काम आहे. मोठमोठ्या योग्यांना देखिल हे दुःसाध्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

  🛡 ★ 27. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३३१ वा (लीप वर्षातील ३३२ वा) दिवस आहे.

~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
●१९९५ : गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : सुरेश रैना – क्रिकेटपटू
◆१९४० : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
◆१९१५ : दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार
◆१९०७ : हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३)
◆१८८१ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
◆१८७० : दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री,
●२००० : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक 
●१९७६ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

27.  *✸ माझ्या भारताचे गुण ✸*
   ●●●●००००००●●●●
माझा भारत महान
नाही लहान सहान
भुकेल्यांची भागवू रे
आम्ही भूकही तहान ।।धृ।।

मैत्री अशी निभवू रे
राहू प्रसंगी गहाण
शत्रू साठी सदा सज्ज
सारे जवान किसान ।।१।।

हिंदी आम्ही नका आम्हा
समजू रे हीन दीन
धन हृदयी आमुच्या
सदा शांती समाधान ।।२।।

आम्हावर आतिरेक
नाही बात ही आसान
अंत होताच शांतीचा
सोडू युध्दाचाही बाण ।।३।।

धर्म एक मानवता
आम्ही आहोत जाणून
शेती बाडी घरे बिरे
आम्ही पाहू मागाहून ।।४।।

काय सांगू आणखीन
माझ्या भारताचे गुण
सदा शांतीचा क्रांतीचा
इथे येतो जातो क्षण ।।५।।
     ~सौ.मंगला मधुकर रोकडे, धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27. *❂ तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे, ज्योत उजळु दे हीच मनोकामना

ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी
सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी
सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा

वत्‍सलतेचा गहिवर जेथे, स्पर्श प्रभूचा तेथे
‍होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते
तोच फुलांना जागविणारा, विश्वाची प्रेरणा

वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते
ठायीठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते
जन्‍म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27.  *❝ आपूलकी तिथं लक्ष्मी ❞*
  ━━═•●◆●★●◆●•═━━
    एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे. परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.

    माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.

लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.

    काही दिवसानंतर  धाकटीसून स्वयंपाक बनवत होती,
तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली.
त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि पण कामाला निघून गेली.
त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या .

    जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला.

    त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू.
त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं.

    संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही.

     ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   भांडण आणि  इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं.
   *ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27.   *लोभाणे जवळ येणाऱ्या*
            *लोकांच्या पेक्षा..*
       *माणुसकिने जवळ येणाऱ्या*
             *लोकांना जपा..*
       *आयुष्यात कधीच पश्चाताप*
             *होणार नाही...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ समाजस्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले ?
➜ र.धो.कर्वे.

✪ शरीरातील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होते ?
➜ वाढ खुंटते.

✪ मानवी किडणीत कोणता खडा आढळतो ?
➜ कॅल्शियम ऑक्सोलेट.

✪ कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
➜ बांबू.

✪ लाल बहादूर शास्त्री अकॅडमी कोठे आहे ?
➜ नाशिक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

27.  *❒ त्र्यंबक शंकर शेजवलकर❒* 
       ━━═•●◆●★●◆●•═━━
   मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक
●जन्म :~ २५ मे १८९५ कशेळी येथे.
●मृत्यू :~ २८ नोव्हेंबर १९६३

     त्र्यंबक शंकर शेजवलकर  यांनी शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती  इ.  त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

     इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.

    त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़ संस्थापकांपैकी एक होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही.

     मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले. ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले. प्रगती साप्ताहिक बंद पडल्याने शेजवलकरांना मानसिक धक्का बसला आणि त्यातून सावरायला त्यांना काही वर्षे लागली. १९३९ ह्या वर्षी पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (पोस्ट ग्रॅज्युएट अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये) रूपांतर झाल्यावर तिथे ऑगस्ट १९३९ मध्ये त्यांची मराठा इतिहासाचे प्रपाठक (रीडर) म्हणून नेमणूक करण्यात आली. २५ मे १९५५पर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांचे इतिहासविषयक संशोधन चालू राहिले. ह्या काळातच त्यांचे निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१ हे ग्रंथ प्रकाशित झाले. मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांच्याप्रमाणे फटकळ व आग्रही तसेच प्रखर बुद्घिमत्तेचे आणि चतुरस्र विद्वान म्हणून शेजवलकर ओळखले जातात. ते निव्वळ संकलक-संशोधक नव्हते, तर इतिहासाचे प्रतिभावंत भाष्यकार आणि समाजचिंतक होते. आधुनिक मराठी इतिहासलेखनपरंपरेत तात्त्विक, बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती म. गो. रानडे व वि. का. राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना करावी लागेल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★🔅★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 27/11/2024◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment