*28/02/19 गुरुवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
*❁ दिनांक :~ 28/02/2019 ❁*
*🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *28. फेब्रुवारी:: गुरूवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
माघ कृ. ९
तिथी : कृष्ण पक्ष नवमी,
नक्षत्र : मूल,
योग : वज्र, करण : गर,
सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
28. *व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
28. *खाण तशी माती*
*★ अर्थ ::~*
- आई - वडिलांप्रमाणेच मुले असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
⭐अर्थ ::~ अभ्यासू मनुष्य
कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *28. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★राष्ट्रीय विज्ञान दिन
★हा या वर्षातील ५९ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९३५ : वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
●१९२८ : डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४ : रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार
◆१९२७ : कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २७ जुलै २००२)
◆१९०१ : लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते
◆१८९७ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी – औध संस्थानचे राजे
●१९६६ : उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.
●१९६३ : *डॉ. राजेन्द्र प्रसाद –* भारताचे पहिले राष्ट्रपती
●१९३६ : कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28. *✸चिरविजयाचे वारस आम्ही*
●●●●●००००००●●●●●
चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. *❂ जय शारदे वागीश्वरी ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी
ज्योत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित् वर्षु दे अमुच्या शिरी
वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
28. *❃ वाघ व चिचुंद्री ❃*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
अरण्यातील एका मोठ्या झाडाच्या दाट सावलीत एक वाघ आपल्या भक्ष्याची वाट पाहात बसला होता. जवळच एका बिळातून आपले अर्धे अंग बाहेर काढून एक चिचुंद्री त्याच्याकडे पाहात होती. ती दिसताच वाघ तिला म्हणाला, 'अरे गरीब प्राण्या, मला तुझी फार दया येते. जो सूर्यप्रकाश जगातील इतर प्राण्यांना अत्यंत सुखकारक असतो, तो तुला सहन होऊ नये अशी योजना करण्यात देवाने मोठा निर्दयपणा दाखविला आहे असं मला वाटतं. तुझ्यासारखे प्राणी म्हणजे अर्धवट मेलेलेच प्राणी होत. तुम्हाला मारून टाकून या दुःखदायक स्थितीतून जर सुटका केली तर त्याचे तुमच्यावर उपकारच होतील.'
त्यावर चिचुंद्रीने उत्तर दिले, 'अरे वाघोबा, माझ्या स्थितीसंबंधाने तू इतकी कळकळ दाखविलीस याबद्दल मी तुझे आभार मानते. पण खरंच सांगायचं तर माझ्या या परिस्थितीतही मला सर्व सुख मिळतं. ईश्वराच्या निर्दयपणाचे तू जे उद्गार काढले त्यासंबंधी मला इतकंच सांगायचं आहे की, ईश्वराने मला जे गुण दिले त्यावर मी अगदी समाधानी आहे. कोणत्या गुणांची वाटणी कशी करावी हे समजून घेण्याच्या कामी ईश्वराला साहाय्य करण्याची आवश्यकता नाही. आतां हे खरं की, तुझ्यासारखी तीक्ष्ण दृष्टी मला नाही. परंतु दृष्टीचं सगळं काम करण्यासाठी माझे हे लहानसे कान पूर्णपणे समर्थ आहेत आणि या गोष्टीचा अनुभव तुला मी आताच दाखविते. ऐक, तुझ्या मागल्या बाजूने येत असलेला कसला तरी भयंकर आवाज मला या वेळी अगदी स्पष्ट ऐकू येतो आहे.' इतके बोलून चिचुंद्री आपल्या बिळात गेली व एका शिकार्याने सोडलेल्या बंदुकीची गोळी छातीत शिरून तो वाघ तेथेच ठार झाला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
दुसर्याचे नसते दोष दाखवून त्याची काळजी करीत बसण्यापेक्षा, स्वतःच्या दोषामुळे प्राप्त होणार्या संकटांविषयी सावधानता ठेवणे शहाणपणाचे होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
28. मी मोठा की तू मोठा....
यातच आयुष्य संपून जात...
सर्वांपेक्षा मोठा.. तो वरती बसलाय.!
हे ज्याला कळल,
त्यालाच जीवन कळल..!
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा,
खांद्याला खांदा मिळवून पुढे
जाण्यातच प्रगती आहे.....
रक्त गट कुठलाही असो,
*रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. *■■ प्रश्नमंजुषा ■■*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
★ *भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?*
➡ +९१
★ *भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण*?
➡ डॉ.बाबासाहेब आंबेडकर
★ *भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?*
➡ डॉ. राजेंद्रप्रसाद
★ *भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?*
➡ रुपया
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
28. *❒ डॉ. राजेंद्र प्रसाद ❒*
┄─┅•●●★◆★●●•┅─┄
*भारताचे १ ले राष्ट्रपती*
💥 *कार्यकाळ*
(२६ जानेवारी १९५० – १३ मे १९६२)
●जन्म :~ ३ डिसेंबर १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, भारत
*●मृत्यू :~ २८ फेब्रुवारी १९६३, पटना*
*डॉ. राजेंद्र प्रसाद*
हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁ गुरुवार ~ 28/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment