*28/02/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *28.फेब्रुवारी:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
माघ कृ.4, पक्ष : कृष्ण पक्ष, 
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~हस्त, 
योग ~गण्ड, करण ~बव,
सूर्योदय-06:59, सूर्यास्त-18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
28. *हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
 ━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
28. *खाण तशी माती*
      *★ अर्थ ::~* 
- आई - वडिलांप्रमाणेच मुले असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
28. *अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।*
*अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥*
    ⭐अर्थ ::~ अन्नदान श्रेष्ठ आहे, पण विद्यादान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नामूळे त्यावेळेची भूक भागते मात्र विद्येमूळे संपूर्ण आयुष्याची.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
 ━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
       🛡 *28. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●===🔻
★राष्ट्रीय विज्ञान दिन
★हा या वर्षातील ५९ वा दिवस आहे.
   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९३५	:	वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
●१९२८	:	डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४	:	रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार
◆१९२७	:	कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २७ जुलै २००२)
◆१९०१	:	लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते 
◆१८९७	:	डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक.  
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९	:	भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी – औध संस्थानचे राजे
●१९६६	:	उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. 
●१९६३	:	 *डॉ. राजेन्द्र प्रसाद –* भारताचे पहिले राष्ट्रपती
●१९३६	:	कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
28. *✸चिरविजयाचे वारस आम्ही*
      ●●●●००००००●●●●
चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====
28. *❂ जय शारदे वागीश्वरी ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी
ज्योत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित् वर्षु दे अमुच्या शिरी
वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
 ━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
28. *❃ वाघ व चिचुंद्री ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    अरण्यातील एका मोठ्या झाडाच्या दाट सावलीत एक वाघ आपल्या भक्ष्याची वाट पाहात बसला होता. जवळच एका बिळातून आपले अर्धे अंग बाहेर काढून एक चिचुंद्री त्याच्याकडे पाहात होती. ती दिसताच वाघ तिला म्हणाला, 'अरे गरीब प्राण्या, मला तुझी फार दया येते. जो सूर्यप्रकाश जगातील इतर प्राण्यांना अत्यंत सुखकारक असतो, तो तुला सहन होऊ नये अशी योजना करण्यात देवाने मोठा निर्दयपणा दाखविला आहे असं मला वाटतं. तुझ्यासारखे प्राणी म्हणजे अर्धवट मेलेलेच प्राणी होत. तुम्हाला मारून टाकून या दुःखदायक स्थितीतून जर सुटका केली तर त्याचे तुमच्यावर उपकारच होतील.' 
       त्यावर चिचुंद्रीने उत्तर दिले, 'अरे वाघोबा, माझ्या स्थितीसंबंधाने तू इतकी कळकळ दाखविलीस याबद्दल मी तुझे आभार मानते. पण खरंच सांगायचं तर माझ्या या परिस्थितीतही मला सर्व सुख मिळतं. ईश्वराच्या निर्दयपणाचे तू जे उद्गार काढले त्यासंबंधी मला इतकंच सांगायचं आहे की, ईश्वराने मला जे गुण दिले त्यावर मी अगदी समाधानी आहे. कोणत्या गुणांची वाटणी कशी करावी हे समजून घेण्याच्या कामी ईश्वराला साहाय्य करण्याची आवश्यकता नाही. आतां हे खरं की, तुझ्यासारखी तीक्ष्ण दृष्टी मला नाही. परंतु दृष्टीचं सगळं काम करण्यासाठी माझे हे लहानसे कान पूर्णपणे समर्थ आहेत आणि या गोष्टीचा अनुभव तुला मी आताच दाखविते. ऐक, तुझ्या मागल्या बाजूने येत असलेला कसला तरी भयंकर आवाज मला या वेळी अगदी स्पष्ट ऐकू येतो आहे.' इतके बोलून चिचुंद्री आपल्या बिळात गेली व एका शिकार्याने सोडलेल्या बंदुकीची गोळी छातीत शिरून तो वाघ तेथेच ठार झाला.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   दुसर्याचे नसते दोष दाखवून त्याची काळजी करीत बसण्यापेक्षा, स्वतःच्या दोषामुळे प्राप्त होणार्या संकटांविषयी सावधानता ठेवणे शहाणपणाचे होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
 ━┅━▣◆★✪★◆▣═┅━
28.    मी मोठा की तू मोठा....
      यातच आयुष्य संपून जात...
सर्वांपेक्षा मोठा.. तो वरती बसलाय.!
          हे ज्याला कळल, 
     त्यालाच जीवन कळल..!
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा,
   खांद्याला खांदा मिळवून पुढे
        जाण्यातच प्रगती आहे.....
      रक्त  गट कुठलाही  असो,
*रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
28. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे होते ?
➜ राष्ट्रपती.
✪  भुईमूग या पिकाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
➜ गुजरात.
✪  जागतिक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे कोणी भरविले ?
➜ डाॅ.पंजाबराव देशमुख.
✪  भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?
➜ डाॅ.होमी भाभा.
✪  तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?
➜ भुईमूग 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ आज महत्त्वाचे ❂*
 ━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
28. *❒ राष्ट्रीय विज्ञान दिवस ❒*
 ━┅━▣◆★✪★◆▣═┅━
     २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.
काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. २१ वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजा मधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.
आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीन मुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.
१९९९ पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. १९९९ मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना, २००४ मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना, तर २०१३ मध्ये मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला. त्यानंतर ‘खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना राबविण्यात आली. प्रत्येक वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक ठिकाणी चांगले संभाषण, विविध संशोधने, शास्त्रज्ञांची चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो.
   आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे. नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक चांगला फायदा होत आहे. आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁बुधवार~28/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment