*28/03/24 गुरूवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *28. मार्च:: गुरूवार* 🍥
 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.3, पक्ष : कृष्ण पक्ष, 
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~स्वाती, 
योग ~हर्षण, करण ~विष्टि, 
सूर्योदय-06:59, सूर्यास्त-18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
28.  *जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
28. *गर्वाचे घर खाली*
      *★ अर्थ ::~* 
- गर्वामुळे शेवटी फजिती होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. *अलसस्य कुतो विद्या ।*
         ⭐अर्थ ::~
 आळशी मनुष्याला विद्या कशी मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
      🛡 *★28. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ८७ वा (लीप वर्षातील ८८ वा) दिवस आहे.
    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८	:	’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.
●१९९२	:	उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
●१९४२	:	रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली.
●१७३७	:	बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला. 
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६८	:	नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू
◆१९२५	:	राजा गोसावी – अभिनेता 
◆१८६८	:	मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०००	:	शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख
●१९९२	:	आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू 
●१९६९	:	ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक 
●१९४१	:	व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका 
●१५५२	:	गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28.  *✹ आज़ादी का गीत ✹*
      ●●●●●००००००●●●●●
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
चाँदी सोने हीरे मोती से सजती गुड़ियाँ।
इनसे आतंकित करने की बीत गई घड़ियाँ
इनसे सज धज बैठा करते जो हैं कठपुतले
हमने तोड़ अभी फेंकी हैं बेड़ी हथकड़ियाँ
परंपरा गत पुरखों की हमने जाग्रत की फिर से
उठा शीश पर रक्खा हमने हिम किरीट उज्जवल
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
चाँदी सोने हीरे मोती से सजवा छाते
जो अपने सिर धरवाते थे वे अब शरमाते
फूलकली बरसाने वाली टूट गई दुनिया
वज्रों के वाहन अंबर में निर्भय घहराते
इंद्रायुध भी एक बार जो हिम्मत से ओटे
छत्र हमारा निर्मित करते साठ कोटि करतल
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
                    ~हरिवंश राय बच्चन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
28.  *❂ जगाला प्रेम अर्पावे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
28.  *❃❝ समाधान खरे धन ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी राहते. त्या म्हातारीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.'
दुसर्या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हातारीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' म्हातारीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी म्हातारीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
    जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
28.  "जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
         तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा  
   सन्मान करू लागतात. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. *✿महाराष्ट्र विषयी माहिती✿*
        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑ 
◆  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
◆ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
◆ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
◆ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
◆  तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
28.    *❒ ♦अमर्त्य सेन♦ ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
🔹निवासस्थान :	न्यू यॉर्क शहर अमेरिका
🔸नागरिकत्व :	 भारतीय
🔹कार्यक्षेत्र :	अर्थशास्त्र
🔸प्रशिक्षण :~ 	हार्वर्ड विद्यापीठ,
कैम्ब्रिज विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ,
ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन अर्थशास्त्र विद्यालय, दिल्ली अर्थशास्त्र विद्यालय,
🔹पुरस्कार : *अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते*
              *💎 अमर्त्य सेन*
  🔶 हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी
♦इ.स. १९९८ सालचे *अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक* देऊन गौरवण्यात आले.
  🔷यांचा जन्म	 ३ नोव्हेंबर, १९३३  शांतिनिकेतन येथे झाला.
भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे  हे अध्यक्ष आहेत.
 एकूण ४० वर्षात, ३०हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁गुरूवार ~28/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment