*28/04/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🟢🔵🟣
🍥 *28. एप्रिल:: रविवार* 🍥
 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र कृ.4, पक्ष : कृष्ण पक्ष, 
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~मूळ, 
योग ~शिव, करण ~बालव, 
सूर्योदय-06:12, सूर्यास्त-19:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
28. *एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
28. *हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये*- 
   *★ अर्थ ::~* दूरचे मिळण्याच्या आशेने जवळचे गमावू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. *सकलगुणभूषा च विनयः ।*
            ⭐अर्थ ::~
 नम्रता ही सर्व गुणांचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
    🛡 *★28. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ११८ वा (लीप वर्षातील ११९ वा) दिवस आहे.
    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६९	:	चार्ल्स द गॉलने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
●१९२०	:	अझरबैजानचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
●१९१६	:	होम रुल लीगची स्थापना
  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२	:	माईक ब्रेअर्ली – इंग्लिश क्रिकेटर
◆१९३७	:	सद्दाम हुसेन – इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष 
◆१९३१	:	मधू मंगेश कर्णिक – लेखक
◆१८५४	:	वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त 
(मृत्यू: १२ जानेवारी १९४४)
◆१७५८	:	जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष 
    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८	:	रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष 
●१९९२	:	 डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे  अभ्यासक 
●१९४५	:	इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याचा वध 
●१७४०	:	थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28. *✸ चढवू गगनि निशाण ✸*
       ●●●●●००००००●●●●●
चढवू गगनि निशाण आमुचे, चढवू गगनि निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्तान
निशाण अमुचे मनःक्रांतिचे, समतेचे अन् विश्वशांतिचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुख-तेज महान
मूठ न सोडू जरि तुटला कर, गाऊ फासहि आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरि शिरकाण
साहू शस्त्रास्त्रांचा पाउस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण
विराटशक्ती आम्ही वामन, वाण आमुचे दलितोद्धारण
नमवू बळिचा किरीट उद्धट ठेवुनि पादत्राण
हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरति निशाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
28.  *❂ सावळ्या विठ्ठला ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरून गेले देहभान ||
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा
दाटला उमाळा अंतरी माझ्या
तुकयाचा भाव पाहूनी नि:संग
तारिले अभंग तूच देवा ||
जगी कितिकांना तारिलेस देवा
स्वीकारी ही सेवा आता माझी
कृपा कटाक्षाचे पाजवी अमृत
ठेव शिरी हात पांडुरंगा ||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
28.  *❃❝आईनस्टाईनची कथा❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    अल्बर्ट आईनस्टाईन लहानपणी शिक्षणाच्या बाबतीत फारच विरक्त होते. त्यांना शाळेत जाणे आणि शिकणे अजिबात आवडत नव्हते. जेव्हा शाळेचे शिक्षक अल्बर्ट यांना एखाद्या विषयाबाबत आठवायला सांगत तेव्हा त्यांना तो विषय आवडत नसे. त्यांना तर चिंतन-मनन करणे आवडायचे. एका विषयावर विचार करत असताना ते तासनतास घालवत असत. त्यावेळी त्यांना शिक्षकांच्या शिक्षेस सामोरे जावे लागत असे. एकेदिवशी अल्बर्टने आपल्या आईवडीलांना सांगितले की, मी आता शाळेत जाणार नाही. आईने कारण विचारले, तेव्हा छोटा अल्बर्ट म्हणाला,''आई तेथे शिक्षण नाही तर पोलिस शिकवतात, छोट्या छोट्या कारणावरून रागवतात, मला ते सहन होत नाही आणि गणित विषय हा तर मला खायला उठतो.'' तेथेच अल्बर्टचे काका जेकब बसलेले होते ते त्याची गोष्ट ऐकून म्हणाले,'' बेटा, हे काय सांगत आहेस की तुझे मन गणितात लागत नाही, मग तुझे खेळातही मन लागत नाही का.'' अल्बर्ट म्हणाला'' खेळात तर माझे मन लागते'' जेकब म्हणाले,'' तर ये मग, आपण चोर-पोलीस खेळूया'' जेकबने काही रेषा काढल्या आणि गोटया सरकावू लागले. अल्बर्ट यांची खेळातली आवड आणि कौशल्य पाहून जेकब म्हणाले,'' हेच तर बीजगणित आहे त्यात संख्यांचा शोध घ्यावा लागतो.'' अल्बर्ट म्हणाला,'' काका, हेच गणित आहे, यात अवघड असे काहीच नाही, असे गणित जर असेल तर मी शाळेत जायला तयार आहे''.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
    विषय सोपा करून सांगणे ही शिक्षकाची आवड असली पाहिजे. शिक्षकांनी सोपे करून सांगितल्यास विद्यार्थ्याना लगेच समजते. पालकांनीही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यास मुले नवीन कल्पना स्वीकारू लागतात व त्यातून चांगला परिणाम मिळतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. अपेक्षा अशी असावी ,
जी ध्येयापर्यतनेणारी..
ध्येय अस आसावं ,
जे जीवन जगने शिकवणारं...
जगनं अस असावं ,
जे नात्यांची कदर करणारं..
नाती अशी असावीत ,
जी रोज आठवण काढण्यास
भाग पाडनारी…!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
28. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ 'द वॉल'असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?
➜ राहुल द्रविड.
✪  आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?
➜ केशवसुत.
✪ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?
➜ लोझान.(स्वित्झर्लंड)
✪  राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➜ ६ वर्ष.
✪ भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?
➜ नाना शंकरशेठ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
28. *❒ चंद्रशेखर आझाद ❒*
    ─┅━━●●★◆★●●━━┅
       चंद्रशेखर आझाद उर्फ 
           चंद्रशेखर सीताराम तिवारी 
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते. प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ‘सिताराम तिवारी’ व आईचे नाव ‘जगरानी देवी’ असे होते. त्यांचे पृर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव *‘आझाद’* असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
असहकार चळवळ मागे घेतली गेल्यावर ते क्रांतिकारी चळवळीकडे वळले. ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये दाखल झाले.
      दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे *‘सुखदेव राज’* या क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव *चंद्रशेखर आझाद* मैदान असे करण्यात आले. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁ रविवार ~ 28/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment