"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*28/08/19 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*❁ दिनांक :~ 28/08/2019 ❁*
      *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *28. ऑगस्ट:: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              श्रावण कृ. १३
      तिथी : कृष्ण पक्ष त्रयोदशी,
              नक्षत्र : पुष्य,
   योग : व्यतिपात,  करण : गर,
सूर्योदय : 06:22, सूर्यास्त : 18:57,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

28. *अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28.   *आजा मेला नातू झाला*
   ★ अर्थ ::~ एका हानीबरोबर दुसऱ्या गोष्टीचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28.   *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
    ⭐अर्थ ::~ अभ्यासू मनुष्य
       कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 28. ऑगस्ट ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २४० वा (लीप वर्षातील २४१ वा) दिवस आहे.

         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९० : इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
●१९३७ : ’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.
●१९३१ : फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
●१९१६ : पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
●१८४५ : ’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३४ : सुजाता मनोहर – सर्वोच्‍च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा
◆१९२८ : उस्ताद विलायत खाँ – सतारवादक
◆१९०८ : विनायक माधव तथा ’विमादी’पटवर्धन दीक्षित – विनोदकार
◆१९०६ : नटवर्य चिंतामणी गोविंद तथा मामा’ पेंडसे
◆१८९६ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
◆१७४९ : योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी

       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
   ◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●२००१ : व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी
●१६६७ : मिर्झा राजे जयसिंग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28.  *✸ असा महाराष्ट्र माझा ✸*
        ●●●●●००००००●●●●●
असा महाराष्ट्र माझा
असा महाराष्ट्र माझा

वाहतो माणूसकीचा
नित्यसे मनात झरा
पेरतो संस्कार मोती
देतो प्रत्येका आसरा

असा महाराष्ट्र माझा

             समानता नांदे तेथे     
             असो कुणी रंक राव
             पाहून ते संत श्रेष्ठ
             जागतो आदर भाव

             असा महाराष्ट्र माझा

कष्टकरी माझा राजा
येथेच वसतो खरा
खाई चटणी भाकर
स्वाभिमानाची हो धरा

असा महाराष्ट्र माझा

             सुविचारांची पेरणी
             करतो अभंगातून
             रमतो भक्तीत सदा
             देतो जनसेवेतून

              असा महाराष्ट्र माझा

कडी कपारी डोंगर
सुजलाम् असे सारा
शिवजिजाऊंची भूमी
असे अभिमान खरा

असा महाराष्ट्र माझा

      *✍ शब्दरचना ~ सौ.जया नेरे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *❂  तुझिया चिंतनात ❂*
   ━━═●✶✹★●★✹✶●═━━
त्या तुझिया चिंतनात मन माझे गुंतु दे
गीताच्या एकसरी भावफुले गुंफु दे

श्रवणी ये नाम जसे
मूर्ती पुढती विलसे
रूप मनी आठवुनी नित्य तुला पाहु दे

भाव एक नवनवा
गंध धुंद करि जिवा
जीवशीव संगतीत मन कलिका उमलूदे

छंद तुझा क्षणोक्षणी
बरवा मज दिनरजनी
गीत तुझे आळवूनी तुजसाठी गाउ दे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28.  *❃❝ लांडगा व सरस❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   " खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक लांडगा राहत होता. तो लांडगा मस्त मजेत शिकार करून खात असे. शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते. घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला खाता येत नव्हते .
      त्याला कोणीही मित्र नव्हता की, जो त्याला ते हाड काढण्यासाठी मदत करू शकेल. तो शेजारून जाणाऱ्यांना विनंती करू लागला की, माझ्या घशातील हाड काढून द्या. मग तो सगळ्यांना म्हणतो की,जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईन त्याला तो म्हणेल ते बक्षीस देईन पण लांडग्याच्या भीतीने कोणीच आले नाही.
       शेवटी एक सरस पक्ष्याला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्षानं होकार दिला. सारसने लांब चोचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले. लांडग्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा सरस त्याला म्हणाला ,तू मला या मदतीच्या मोबदल्यात काय देणार?

        लांडग्याने दुष्टपणे हसत म्हटले, मी तुझा जीव वाचविला नाही का? जेव्हा तू तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकत होतो सरस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज झाला आणि जाता जाता विचार करू लागला की, हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला. मी त्याची मदत करायला नको होती.

          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    "उपकाराची फेड आपकाराने करू नये ."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *"प्रगती करत असताना अंगी मेहनत आणि धाडस असायला हवं.."*
   *त्यासाठी वेगळ काही करण्याची गरज नाही....*
    *बेधडक आणि प्रामाणिक पणे मेहनत केली की...*
       *प्रगती नक्कीच होते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28.  *भारतातील आंतरराष्ट्रीय*
     *✿ दर्जाची ✈ विमानतळे..✿*
      ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
✈  *..छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :~  मुंबई..

✈ *..इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :~ नवी मुंबई..

✈ *नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ.* कोलकत्ता..

✈ *के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :~ चेन्नई..

✈ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :~  नागपूर..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28. *❒ ♦वीरधवल खाडे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २९ ऑगस्ट, १९९१

           ★ वीरधवल खाडे ★

     हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता.

         ■ शिक्षण ■
   खाडेचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
       खाडेला वयाच्या ४थ्या वर्षी वडिलांनी पोहण्यास शिकविले. त्याने कोल्हापूरमधील जलतरण शिक्षण शिबिरांत सहभाग घेतला. वयाच्या ९व्या वर्षी त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.

         ■ कारकीर्द ■ 
       २००६मधील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खाडेने तीन नवीन विक्रम नोंदवीत सहा सुवर्णपदके जिंकली. चीनमधील बीजिंग येथे २००८ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्याने ५०, १०० आणि २०० मीटरच्या फ्रीस्टाईल प्रकारात सहभाग घेतला. त्यांपैकी त्याने १०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्यासाठी ५०.०७ सेकंदांचा वेळ देऊन त्याने स्वतःचाच विक्रम मोडला.
           २०१० सालातील आशियाई स्पर्धेत खाडेने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक मिळवले. हे पदक भारताला २४ वर्षांनी मिळालेले पहिले पदक होते. या कामगिरीसाठी खाडेला २०१०मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ बुधवार ~ 28/08/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment