*28/09/25 रविवारचा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/eDeLY7
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *28. सप्टेंबर:: रविवार* 🍥
 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
आश्विन शु.६, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~ज्येष्ठा, 
योग ~आयुष्मान्, करण ~तैतिल, 
सूर्योदय-06:28, सूर्यास्त-18:29
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━
28. *यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
28.  *शेरास सव्वाशेर –*
  ★ अर्थ ::~ प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
           ⭐अर्थ ::~
 क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━
   🛡 *★ 28. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक हृदय दिन
★ हा या वर्षातील २७१ वा (लीप वर्षातील २७२ वा) दिवस आहे.
★ जागतिक कर्णबधिर दिन
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०००	:	विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर
●१९९९	:	महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
●१९२८	:	सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.
     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८२	:	अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय
◆१९८२	:	रणबीर कपूर – अभिनेता
◆१९२९	:	 *लता मंगेशकर –* सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण
◆१९०९	:	पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते 
◆१९०७	:	 भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)
◆१८९८	:	शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, 
   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२	:	ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार 
●२००४	:	डॉ. मुल्कराज आनंद – लेखक 
●१९९२	:	मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━
28. *✸ अंतरी अपुल्या✸*
      ●●●००००००●●●
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास
॥धृ॥
🎹 सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥
🎹 परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥
🎹 शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥
🎹 घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥
🎹 सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास ll ५ ll 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
28. *❂ हे करुणाकरा ईश्वरा ❂*
   ━═●✶✹★★✹✶●═━
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
28.  *❃❝ खरे दुःख ❞❃*
  ━═•●◆●★●◆●•═━
    एक सोनार होता. त्याच्या दुकाना समोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
    आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
तेव्हा आपली माणसे जपा त्यांना कधी दुखवु नका... *आयुष्य फार सुंदर आहे त्याला आनखी सुंदर बनवा...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
28. *" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।*
*" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।*
*" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।*
*" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।*
*प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,* 
*म्हणून वेळोवेळी आनंदी रहा..।।*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
28. *✿ भारतातील पहिले ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
■  *पहिली परमाणु चाचणी- 
    ➜ *पोखरण, राजस्थान*
■  *पहिले क्षेपणास्त्र- 
    ➜ *(पृथ्वी १९८८)*
■  *पहिला उपग्रह-   
  ➜ *आर्यभट्ट (१९७५)*
■  *भारतातील पहिली अणुभट्टी- 
    ➜ *अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
28. *❒ ♦लता मंगेशकर♦❒*  
     ━═•●◆●★★●◆●•═━
   सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्न, 
    *_यांचा आज जन्म दिवस_*
        _त्यानिमित्त त्यांना_
 *_हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!_*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*●जन्म	:~ २८ सप्टेंबर १९२९*
 इंदोर, मध्य प्रदेश 
●मृत्यू:~ ६ फेब्रुवारी २०२२  (वय ९२) 
        *व्यक्तिगत माहिती*
◆नागरिकत्व	: भारतीय
◆मूळ गाव :	मंगेशी, गोवा
◆भाषा	: मराठी, हिंदी भाषा
      ★ पारिवारिक माहिती ★
●आई	 :~ माई मंगेशकर
●वडील	:~ मास्टर दीनानाथ मंगेशकर
●गुरू	:~ दीनानाथ मंगेशकर
●गायन प्रकार :~	कंठसंगीत गायन
★विशेष उपाधी :~ गानकोकिळा
★पुरस्कार :~	भारतरत्न(२००१)
         *★ लता मंगेशकर ★*
   भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. 
लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
१,८०० वर चित्रपटांतील विविध रंग-ढंगांची सु. २२ भाषांतील गाणी त्यांनी म्हटलेली असून, त्यांची संख्या सु. २५ ते ३० हजारांच्या घरात सहज जाते. सर्वप्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.
   भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्या गायक-गायिकांमध्ये लता दीदी या दुसर्या गायिका आहेत.. लता मंगेशकर यांना राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत.
    लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁रविवार ~ 28/09/2025❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment