"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*28/10/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *28.ऑक्टोबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.११, पक्ष :कृष्ण पक्ष,
         तिथि ~एकादशी,
     नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~ब्रह्म, करण ~बालव,
सूर्योदय-06:37, सूर्यास्त-18:06
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

28.  *सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28. *तोंड दाबून बुक्क्यांचा मार –*
   ★ अर्थ ::~ विनाकारण जुलूम
         सहन करावा लागणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *क्षमा रूपं तपस्विनाम् ।*
   ⭐अर्थ ::~ तपस्वी लोकांची क्षमा हीच ओळख असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 ★ 28. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३०१ वा (लीप वर्षातील ३०२ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९६९ : तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले
●१९४० : दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
●१८८६ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
●१६३६ : अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना

      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~ 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९५८ : अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री
◆१९५५ : बिल गेटस – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक
◆१९५५ : इन्द्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी
◆१९३० : लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार
◆१८९३ : शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’
◆१८६७ : मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले.

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४४ : हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला
●१९०० : मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत
●१८११ : हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर
●१६२७ : जहांगीर – ४ था मुघल सम्राट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *✸ आम्ही चालवू हा पुढे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा !

जिथे काल अंकूर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]     ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *❂ शुभंकरोति कल्याणम्‌ ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा

शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28.  *❃❝ काटेरी झाड़ ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणामागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता...!*
         एक म्हणजे...
*तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला "संयम"...!* आणि
        दुसरे म्हणजे...
*तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली "नम्रता"..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ?
➜ कोलकाता.

✪ हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ?
➜ लिंबू.

✪ पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?
➜ कलवरी.

✪ परमवीरचक्र मिळविणाऱ्या पहिल्या  व्यक्तीचे नाव ?
➜ मेजर सोमनाथ शर्मा.

✪ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
➜ अहमदनगर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28. *❒ ♦ भा. रा. तांबे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
★भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे★

    अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

■त्यांच्या काही प्रसिध्द कविता■
जन पळभर म्हणतिल हाय हाय!
नववधू प्रिया मी बावरते
कळा ज्या लागल्या जीवा
मावळत्या दिनकरा
तिन्ही सांजा सखे मिळाल्या
भा. रा. तांबे हे मराठी काव्य सृष्टीमध्ये फुललेले, व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितांनी केला. मृत्यू या शब्दाबद्दल पहिल्यापासून, त्यांना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता,  असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. मृत्यूविषयीच्या त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा! म्रूत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁सोमवार ~28/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment