28/12/24 शनिवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *28. डिसेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.१३, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~शूल, करण ~गर,
सूर्योदय-07:10, सूर्यास्त-18:09,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
28. *तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
28. *आपलेच दात अन् आपलेच ओठ*. *★अर्थ ::~*
दोषी ठरलेले आपण आणि ज्याना दोषी ठरविले तेही आपलेच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
28. *दुर्जनः परिहर्तव्यः*
*विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
⭐अर्थ :: ~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 28. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३६२ वा (लीप वर्षातील ३६३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१८९५ : ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला.
●१८८५ : मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
●१८३६ : स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
●१६१२ : गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५२ : अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
◆१९४५ : वीरेंद्र – नेपाळचे राजे
◆१९४० : ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
◆१९३७ : रतन टाटा – उद्योगपती
◆१९३२ : धीरुभाई अंबानी – उद्योगपती
◆१९२६ : हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
◆१९११ : फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती.
◆१८९९ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : प्रभाकर पंडित –संगीतकार व व्हायोलिनवादक
●२००० : मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
●१९७७ : सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
28. *✹ आज़ादी का गीत ✹*
●●●●००००००●●●●
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
चाँदी सोने हीरे मोती से सजती गुड़ियाँ।
इनसे आतंकित करने की बीत गई घड़ियाँ
इनसे सज धज बैठा करते जो हैं कठपुतले
हमने तोड़ अभी फेंकी हैं बेड़ी हथकड़ियाँ
परंपरा गत पुरखों की हमने जाग्रत की फिर से
उठा शीश पर रक्खा हमने हिम किरीट उज्जवल
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
चाँदी सोने हीरे मोती से सजवा छाते
जो अपने सिर धरवाते थे वे अब शरमाते
फूलकली बरसाने वाली टूट गई दुनिया
वज्रों के वाहन अंबर में निर्भय घहराते
इंद्रायुध भी एक बार जो हिम्मत से ओटे
छत्र हमारा निर्मित करते साठ कोटि करतल
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
~हरिवंश राय बच्चन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
28. *❂ हे करुणाकरा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
28. *❃❝ दृढनिश्चय ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
श्रीपूर येथील राजा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्यपदी बसविण्यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्याची माता त्याला हिंमत देत असे व योग्य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्या राज्यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्पक वृत्तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्याला हार पत्करावी लागली हे ऐकले तेव्हा राजमातेने मनातल्या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्याआधी राजमातेचे दर्शन घेण्यासाठी आला तेव्हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्या मोठ्या तुकड्याला तोडण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्हणाली,’’खरं बोललास, संख्येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्हा. शत्रूची कितीही संख्या तुम्हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्यात आहे ती जागृत करा. तुमच्या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
दृढ मनोबलाने हारलेले युध्द सुध्दा जिंकता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
28. *असे हास्य तयार करा की*
*हृदयाला त्रास होणार नाही* ,
*असा स्पर्श करा की*,
*त्याने जखम होणार नाही* ,
*अशी मैत्री करा की* ,
*त्याचा शेवट कधी होणार नाही*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
28. *✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
■ १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
■ १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा
■ १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
■ १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
■ १९०४ : अभिनव भारतची स्थापना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
28. *❒ ♦योहानेस केप्लर♦ ❒*
━━═•●◆●★●◆●•═━━
●जन्म :~ २७ डिसेंबर १५७१
श्टुटगार्टजवळील वाइल देर श्टाट, जर्मनी
●मृत्यू :~ १५ नोव्हेंबर १६३०
रेगेन्सबुर्ग, बव्हेरिया, पवित्र रोमन साम्राज्य
◆कार्यक्षेत्र :~ खगोलशास्त्र,
ज्योतिषशास्त्र, निसर्गविषयक तत्त्वज्ञान
●कार्यसंस्था :~ लिंत्स विद्यापीठ
●प्रशिक्षण :~ ट्युबिंगन विद्यापीठ
●ख्याती :~ केप्लरचे नियम
🔬योहानेस केप्लर 🔬
*हा एक जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता.*
केप्लर इसवी सनाच्या सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय क्रांतीतील अध्वर्यू होता. केप्लर त्याच्या ग्रहगतीच्या नियमांबद्दल नावजला जातो.
*केप्लरचा कल कोपर्निकसच्या बाजूने होता. केप्लर, टीको ब्राहेचा गणितज्ञ होता.*
टीकोच्या मृत्यूनंतर त्याच्या वेधशाळेत त्याच्या वह्या आणि नोंदणीपुस्तकांचा सखोल अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या गतीचे गुपित शोधून काढले.
जर्मन ज्योतिर्विद. कोपर्निकस याने
मांडलेल्या सूर्यकेन्द्री विश्व-कल्पनेचा
(सर्व ग्रह आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरतात) पाठपुरावा केला आणि सूर्याभोवती ग्रहांचे व उपग्रहांचे मार्गक्रमण कोणत्या कक्षेत काय गतीने होते याचे कोडे उलगडून दाखवले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शनिवार ~28/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment