"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*29/01/19 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 29/01/2019 ❁*
      *🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

  https://goo.gl/kLBRXR
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *29. जानेवारी:: मंगळवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              पौष कृ. ९
       तिथी : कृष्ण पक्ष नवमी,
            नक्षत्र : विशाखा,
        योग : गंड,  करण : गर,
सूर्योदय : 07:13, सूर्यास्त : 18:30,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29. *आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29.   *आजा मेला नातू झाला*
   ★ अर्थ ::~ एका हानीबरोबर दुसऱ्या गोष्टीचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *अलसस्य कुतो विद्या ।*
     ⭐अर्थ ::~ आळशी मनुष्याला विद्या कशी मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 *★29. जानेवारी★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २९ वा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१८८६ : कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
●१८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
●१७८० : जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज
◆१९२६ : डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते
◆१९२२ : प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक
◆१८५३ : मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक.
◆१२७४ : संत निवृत्तीनाथ
   (मृत्यू: १७ जून १२९७)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पांडुरंग सावळाराम तथा काका वडके –  शिवसेना नेते
●१९९५ : रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
●१९९३ : रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ
●१९६३ : सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक.
●१५९७ : महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *✸ अंतरी अपुल्या✸*
      ●●●●००००००●●●●
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास
॥धृ॥

🎹 सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥

🎹 परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥

🎹 शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥

🎹 घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥

🎹 सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास ll ५ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29.  *✹धार वज्राची मिळू दे !✹*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29.  *❃❝ लांडगा आणि सिंह ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एकदा एक लांडगा व एकू सिंह रानात हिंडत होते थांबा मी आता जवळच एका मेंढीचा आवाज ऐकला. त्यावरून इथे जवळच मेंढ्या चरत असाव्यात असं वाटतं. तेव्हा मी पटकन जाऊन एखादी मेंढी तुमच्याकरता घेऊन येतो. असे बोलून लांडगा आवाजाच्या दिशेने गेला. परंतु, तेथे मेंढ्यांच्या जवळच धनगर व कुत्रे उभे होते. ते पाहून लांडगा घाबरला व पळतच सिंहापाशी आला. तेव्हा सिंहाने विचारले,हे काय, तू काहीच आणले नाहीस ? तेव्हा लांडग्याने उत्तर दिले, 'महाराज, तिथे मेंढ्या आहेत खया, पण त्या इतक्या अशक्त आहेत की, त्या सगळ्या खाल्ल्यावरसुद्धा आपलं पोट भरणार नाही !

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   जी वस्तु आपल्याला मिळणे कठीण, तिला नावे ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *अपमानाचे उत्तर एवढे*
              *नम्रपणे द्या*
*कि अपमान करणाऱ्याला स्वताची*
       *लाज वाटली पाहिजे....*
               *रूबाब हा*
*जगण्यात असला पाहिजे...!!*
          *वागण्यात नाही ..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▶️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
      *👉🏿  रायगड*

▶️महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.
     *👉🏿 आंबोली (सिंधुदुर्ग)*

▶️ पढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.
     *👉🏿 भीमा*

▶️कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
      *👉🏿  गोदावरी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ].  ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *❒ ♦डी. प्रकाश राव♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  *पद्मश्री मिळवणारा चहावाला...*

    पद्म पुरस्कार मिळणे हे अनेकांच स्वप्न असते. आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ह्या वर्षी मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराच्या यादीत एक नाव सर्वांपेक्षा वेगळं नाव दिसलं ते म्हणजे डी. प्रकाश राव ( देवारपल्ली प्रकाश राव). डी. प्रकाश राव हे एक चहावाला आहेत. कटक च्या बख्शी बाजारात चहाचं दुकान लहानपणापासून चालवत आहेत. त्यांचे वडील हे दुसऱ्या महायुद्धात सैनिक म्हणून लढले होते. युद्ध संपल्यावर त्यांनी कटक इकडे चहाच दुकान आपली दोन वेळेची भूक भागवण्यासाठी टाकलं. पण दोन वेळेची भूक भागवताना कठीण जायला लागलं. त्यामुळे तरुण असणाऱ्या डी. प्रकाश राव ह्यांना आपलं शिक्षण मॅट्रिकच्या आधी सोडून आपल्या वडिलांना चहाच्या दुकानात मदत करणं भाग पडलं.

     आज ५० वर्षापेक्षा जास्त काळ डी. प्रकाश राव चहाचं दुकान चालवतात. रोज सकाळी ४ वाजता उठून ते चहा विक्री सुरु करतात. पण त्यांचा खरा दिवस उजाडतो तो सकाळी १० नंतर. जेव्हा डी. प्रकाश राव शाळेत जातात ते गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. आजूबाजूच्या झोपडपट्टी वस्तीतील ८० पेक्षा जास्त ४ ते ९ वयोगटातील मुले आज त्यांच्याकडे शिक्षण घेतं आहेत. आपलं शिक्षण अर्धवट झाल्याची सल त्यांच्या मनात अनेक वर्ष रुतून होती. आजूबाजूला गरीब लहान मुलांसाठी शाळा नाही हे त्यांच्या लक्षात आलं मग २००० साली त्यांनी एक ‘आशा आश्वासन’ नावाची लहान शाळा उघडली. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोकांना त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी जागरूक केलं. त्यांनी आपल्या पैशातून काही शिक्षकांची नियुक्ती केली. स्वतः ही त्या मुलांना शिकवण्याचं शिवधनुष्य उचललं. ही शाळा सध्या तिसरी इयत्तेपर्यंत आहे. नंतर ते ह्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी सरकारी शाळेत प्रवेश घेऊन देतात.

     आपल्या कमाईचा ५०% हून अधिक हिस्सा डी. प्रकाश राव ह्या मुलांवर खर्च करतात. ज्यात मुलाचं शिक्षण, त्याचं आरोग्य, त्याचं जेवण ह्या सगळ्यांचा समावेश आहे. मॅट्रिकच्या आधीच शाळा सोडलेले डी. प्रकाश राव ह्यांना ८ भाषेचं ज्ञान आहे. ज्यात ओडिया, इंग्रजी, हिंदी, तेलगु, तमिळ, कनडा, मल्याळम आणि बंगाली भाषा येतात. त्याचं हे कार्य इथवर मर्यादित नाही तर डी. प्रकाश राव हे रक्तदाता आहेत. आजवर त्यांनी २१४ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलं असून १७ वेळा प्लेटलेट दान केल्या आहेत. ह्या मागची प्रेरणा काय हे सांगताना ते सांगतात, “वयाच्या १७ व्या वर्षी एका आजारामुळे मी थोडा अधू झालो होतो. तेव्हा अशाच एका निनावी माणसाने रक्त दिल्यामुळे माझे प्राण वाचले. तेव्हाच मी शपथ घेतली कि मी जमेल तितकं रक्तदान करणार”. डी. प्रकाश राव त्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मृत्यूनंतर शरीराचे अवयव आणि आपलं पूर्ण शरीर हे दान करण्याचा संकल्प केला आहे.

     त्यांच्या कार्याची दखल खुद्द भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी घेतली. डी. प्रकाश राव सांगतात कि एक दिवस पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी माझ्या भेटीला आला. देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला भेटायचे आहे तेव्हा आपण वेळ कधी देऊ शकता असे विचारत होता. तेव्हा हे सगळं माझ्यासाठी अविश्वसनीय असं होतं

 डी प्रकाश रावांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

"I could not believe when an officer from the PMO requested me to give time for a meeting with PM. My happiness knew no bounds when I finally met Modi."

    डी. प्रकाश राव ह्यांच्या निस्वार्थी कार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झाले कि त्यांनी आपल्या ‘मन कि बात’ ३० मे २०१८ च्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला. एक साधा चहा विकणारा विक्रेता ठरवलं तर काय करू शकतो ह्याचा आदर्श डी. प्रकाश राव ह्यांनी संपूर्ण देशापुढे ठेवला आहे. कितीतरी गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं पवित्र काम त्यांनी केलेलं आहे.

    त्यांच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी हे शिक्षणात हि चमक दाखवत आहेत. अनेक विद्यार्थी शाळेत पहिले येत आहेत तर 'महेश राव ' ह्या एका विद्यार्थ्याला २०१३ ला गोवा इकडे झालेल्या विंड सर्फिंग स्पर्धेत चक्क ६ सुवर्ण पदक मिळालेले आहेत.

    डी. प्रकाश राव  ह्यांच्या सारख्या निस्वार्थी, सेवाभावी व्यक्तिमत्वाला आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने मला वाटते आज पद्मश्री पुरस्काराचा सन्मान झाला आहे. डी. प्रकाश राव ह्यांच्या कार्यापुढे मी नतमस्तक आणि त्यांच्या पुढील प्रवासाला माझ्याकडून शुभेच्छा..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ मंगळवार ~ 29/01/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment