"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*29/02/20 शनिवारचा परीपाठ*
   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ💲🅿꧂❀*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━

 *🍥29.फेब्रुवारी:: शनिवार🍥*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━
        फाल्गुन शु. ५
   तिथी : शुक्ल पक्ष पंचमी,
           नक्षत्र : भरणी,
   योग : ब्रह्म,  करण : बलव,
सूर्योदय : 06:58, सूर्यास्त : 18:44,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

29. *काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]     ❂ म्हणी व अर्थ ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *जी खोड बाळा ती जन्म कळा*
      *★ अर्थ ::~*
- जन्मजात अंगी असलेले गुण- दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]       ❂ सुभाषीत ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29.   *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
    ⭐अर्थ ::~ अभ्यासू मनुष्य
       कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]     ❂ दिनविशेष ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

      🛡 *29. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★लीप दिवस
★हा या वर्षातील ६० वा दिवस आहे.

   ●ज्या वर्षाला ४ ने पूर्ण भाग जातो अशा वर्षात लीप दिवस येतो. उदा: २०१२, याला एक अपवाद आहे. ज्या शतकी वर्षांना ४०० ने पूर्ण भाग जातो अशा वर्षातच हा दिवस येतो. उदा: २१००, २२००, २३०० ही लीप वर्षे नसतील पण २४०० हे लीप वर्ष असेल.
   टास्मानियाचे पंतप्रधान सर जेम्स विल्सन हे २९ फेब्रुवारी रोजी जन्मलेले व मृत्यू पावलेले एकमेव प्रसिद्ध व्यक्ती होत.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : ६३४ मीटर उंचीच्या ‘टोकियो स्काय ट्री‘ या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.
●२००० : शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
●१९९६ : क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९४० : गोपीचंद हिंदुजा – उद्योगपती
●१९०४ : रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका
●१८९६ : मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (मृत्यू: १० एप्रिल १९९५)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]    ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]        ❂ प्रार्थना ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29. *❂ देशकार्यि विरमु दे ❂*
      ==••◆◆●★●◆◆••==
अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे
येत शरण तव पदांसि देशकार्यि विरमु दे॥

उमलतिल ह्या कळया हळूहळूंचि पाकळ्या
तत् सुगंध तुजसमान सर्वदूर पसरु दे॥१॥

पुष्पफले नको आम्हासि अर्पु दे तुझ्या पदांसि
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेचि होउ दे॥२॥

आम्हासि तूच ध्येय देव सेवु धरुनि भक्तिभाव
पूजने तुझ्या आम्हास देवरुप होउ दे॥३॥

अससि भव्यदिव्य दीप तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही ह्रदयांतरि उजळु दे॥४॥

करुनिया तुझ्यासमान होउ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतिचे संरक्षणचि होउ दे॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]       ❂ बोधकथा ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *❃एक तरी ओवी अनुभवावी❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी आली. धर्मराज म्हणाला, गुरुजी, मी एका वाक्याचा अभ्यास केला. धर्मराजाच्या तोंडचे उत्तर ऐकताच गुरुजींना खूप राग आला; कारण धर्मराज हा त्यांचा अत्यंत आवडता आणि हुशार विद्यार्थी होता. ते ओरडले, काय रे, या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस, बुद्धीमान आहेस आणि तरीसुद्धा तू केवळ एकाच वाक्याचा अभ्यास केला म्हणतोस ? तुला लाज वाटली पाहिजे.

धर्मराज शांतपणे म्हणाला, गुुरुजी, माझा नाईलाज आहे; परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एक वाक्य शिकलो. गुरुजींचा पारा चढला. ते खवळले आणि म्हणाले, मूर्खा लेका, तू आळशीच नाहीस, तर निर्लज्ज आहेस. तरीही धर्मराज शांतच होता. जराही विचलित न होता तो म्हणाला, गुरुजी, माफ करा; पण मी खरोखरच एवढंच शिकलो. गुरुजींना राग आवरेना. त्यांनी रागाच्या भरात धर्मराजाच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली, तरीही धर्मराज शांतच होता. त्याच्या तोंडावरचे भाव जरासुद्धा पालटले नव्हते.

आता मात्र गुरुजी वरमले. त्यांना वाटले की, धर्मराजाच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. ते म्हणाले, बाळ, तू कोणते वाक्य शिकलास, ते तरी सांग. धर्मराजाने आपली वही आणून दाखवली. तिथे लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये. या एका वाक्यासरशी गुरुजी आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे, ते समजले. विनाकारण शिक्षा केल्याविषयी गुरुजींनी धर्मराजाची क्षमा मागितली.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले, तरी चालेल; परंतु जे शिकू, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी म्हटले आहेच, एक तरी ओवी अनुभवावी ।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
 ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29.    *"रडणाऱ्या" माणसाला*
  *आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते* आणि *"लढणाऱ्या" माणसालास्वतःच्या सामर्थ्याची अनुभुती येते...*

   *"रडणारी" सतत दुबळी आणि*
        *परावलंबी बनत जातात...*

  *"लढणारी" सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    ❂ सामान्य ज्ञान ❂*
 ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29. *✿मानवी रक्ताविषयी माहिती✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■➡ *एका वयस्क माणसात रक्ताची ओसत माञा किती असते?*
🅰 5ते6 लिटर

■➡  *मानवात अँटीजेनच्या आधारावर रक्ताचे किती प्रकार पडतात?*
🅰 रक्तगट A,B,AB,O.

■➡  *हिम(Heme)मध्ये लोहयुक्त कोणते घटक असते?*
🅰 हिमेटीन(hemetin)

■➡  *मणुष्याच्या रक्तात भिन्नता कशामुळे असते?*
🅰 ग्लायकोप्रोटीन मुळे

■➡  *प्लाझ्मामध्ये कोणकोणते घटक असतात?*
🅰 पाणी९०%,प्रोटीन ७%,मिठ ०.९% ग्लुकोज ०.१%
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *❒ ♦मा.मोरारजी देसाई♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म:~ २९ फेब्रुवारी १८९६ सुरत जिल्ह्यातील भदेली येथे.
●मृत्यु :~ १० एप्रिल १९९५

    भारताचे माजी पंतप्रधान मा.मोरारजी देसाई यांचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील रणछोडजी हे प्राथमिक शिक्षक, तर आई मणिबेन ही निरक्षर होती. मोरारजींचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले. ते १५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्याच वर्षी गजराबेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वडिलांच्या पश्चात कुटुंबाची सर्वच जबाबदारी ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांच्यावर पडली. १९१२ मध्ये मोरारजी मॅट्रिक व पुढे १९१७ मध्ये मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून बी. ए. झाले. १९१८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.
उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा देऊन ते गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. त्याबद्दल त्यांना पुढे तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते गुजरात काँग्रेस कमिटीचे चिटणीस झाले. मुंबई प्रांताचे महसूल, सहकार, कृषी आणि जंगल खात्यांचे ते मंत्री होते. ‘छोडो भारत’ आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना १९४५ पर्यंत पुन्हा तुरुंगात जावे लागले. मुंबई प्रांतात गृह व महसूल मंत्री म्हणून त्यांनी १९४६–५२ या काळात काम केले व पुढे ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. या काळात त्यांनी प्रथमच जमीनमहसुलाबाबत काही सुधारणा केल्या व मुंबई प्रांताची प्रशासनव्यवस्था अत्यंत कार्यक्षम केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापार व उद्योगमंत्री म्हणून प्रवेश केला. या वेळी त्यांनी भारताला कर्ज मिळवून देण्यासाठी विविध देशांना भेटी दिल्या.
१९५८ नंतर ते अर्थमंत्री असताना त्यांनी परराष्ट्रमदतीसाठी फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान वगैरे देशांचा दौरा केला आणि राष्ट्रकुल परिषद, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय चलन निधी परिषद यांना ते उपस्थित राहिले. कामराज योजनेनुसार त्यांनी राजीनामा दिला. मार्च १९६६–६७ या काळात त्यांनी प्रशासकीय सुधारणा आयोगाची धुरा सांभाळली. मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकपाल व लोक–आयुक्त यांची स्थापना करावी, अशी महत्त्वाची शिफारस मोरारजींनी याच काळात केली होती. १९६७ मध्ये ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री व उपपंतप्रधान म्हणून आले. त्यांनी जपान, इंग्लंड, कॅनडा वगैरे देशांचे सदिच्छा दौरे केले. पण १९६९ च्या काँग्रेस पक्षातील दुहीनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते संघटना काँग्रेसचे लोकसभेतील नेते झाले. ते १९६२, ६७ व ७१ मध्ये लोकसभेवर निवडून आले होतेच. गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू, नवजीवन ट्रस्टचे अध्यक्ष, हिंदी प्रचार सभेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, अखिल भारतीय दारूबंदी परिषदेचे सदस्य, गांधी स्मारक निधी, गांधी शांतता प्रतिष्ठान व कस्तुरबा ट्रस्ट यांचे विश्वस्त इ. नात्यांनी अनेक विधायक, सांस्कृतिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आला. संघटना काँग्रेसचे ते एक निष्ठावान कार्यकर्ते व नेते होते. २५ जून १९७५ रोजी सबंध देशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊन त्याच मध्यरात्री मोरारजींना अटक करण्यात आली. पुढे १८ जानेवारी १९७७ रोजी लोकसभेच्या निवडणुका घेण्यासंबंधीची घोषणा जाहीर झाल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर संघटना काँग्रेस, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल व समाजवादी पक्ष या चार पक्षांचे विलिनीकरण होऊन ‘जनता पक्षा’ची स्थापना झाली. या पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. मार्च १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला बहुमत मिळून ह्या पक्षाचे केंद्र सरकार स्थापन झाले आणि मोरारजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली.
एक निष्ठावंत व कडवे गांधीवादी कार्यकर्ते, शिस्तप्रिय, उत्कृष्ट प्रशासक, सत्य व अहिंसा यांचे निस्सीम पुरस्कर्ते, स्पष्टवक्ते, निःस्पृह व साध्या राहणीचे म्हणून मोरारजींचा लौकिक भारतात व परदेशांतही आहे.
मा.मोरारजी देसाई यांचे निधन १० एप्रिल १९९५ रोजी झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ शनिवार ~ 29/02/2020❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment