"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*29/03/24 शुक्रवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *29. मार्च:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.4, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~विशाखा,
योग ~वज्र, करण ~बव,
सूर्योदय-06:58, सूर्यास्त-18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

29. *सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

29. *खाई त्याला खवखवे*
      *★ अर्थ ::~*
- अपराध्याच्या मनात अपराधाची सारखी जाणीव होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

29. *धिगाशा सर्वदोषभू ।*
             ⭐अर्थ ::~
सर्व दोषांस कारणीभूत असलेल्या आशा नामक दोषाचा धिक्कार असो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★29. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय नौका दिन
★ हा या वर्षातील ८८ वा (लीप वर्षातील ८९ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८२ : एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
●१९६८ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना
●१८५७ : बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.
●१८४९ : ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४८ : नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
◆१९३० : अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान
◆१९२९ : उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार
◆१९२६ : पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
◆१८६९ : सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
●१९७१ : धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी
●१९६४ : शंकर नारायण तथा ’वत्स’ जोशी – इतिहाससंशोधक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *ने मजसी ने परत मातृभूमीला*
         ●●●●●००००००●●●●●
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

29.  *❂ जयोस्तुते श्रीमहन्मंगले*
             *शिवास्पदे शुभदे !* ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
                शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
           त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥
                 –स्वातंत्र्यवीर सावरकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

29.   *❃ लहानसा ससा ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
        " एक लहानसा ससा होता. तो खूप भित्रा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.

      एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.

    मरता मरता ससा म्हणाला, ‘तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.’

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷 प्रेरणादायी विचार 🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

29.   *चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात*...
         *पण चूक का झाली*
    *आणि ती कशी सुधारायची हे*
*सांगणारे फार कमी असतात*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]  *🔴 सामान्य ज्ञान 🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

29. *✿महाराष्ट्र विषयी माहिती✿*
        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
◆  मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.

◆  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

◆  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

◆  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

◆  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

29. *❒ नागनाथ कोत्तापल्ले ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
जन्म :~ २९ मार्च १९४८;
             मुखेड, नांदेड

       हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. ते ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

       नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले.. त्यांनी १९८० मध्ये पीएच. डी. मिळवली.

                  *कारकीर्द*
    नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००४ पासून २००९ पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

      नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते.

      मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.

                 *पुरस्कार *
पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार.
ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२),
राख आणि पाऊस साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५),
राख आणि पाऊस साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५),
ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध साठी परिमल पुरस्कार (१९८५),
साहित्य अवकाश साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार,
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शुक्रवार~29/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment